गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते. शॉट्स ही असे की फिल्डर्स नी बॉल अडवायचे सोडून बघत राहावे, आणि बोलर ने "हा बॉल तिकडे कसा काय गेला" विचार करत रन अप कडे परत जावे...
वॉर्न च्या लेग स्पिनला विरूद्ध दिशेने मिडविकेट ला (ऑन साईड) सतत मारल्याने कंटाळून शेवटी स्टीव्ह वॉ तेथे एक फिल्डर लावतो. वॉर्न पुन्हा तसाच बॉल टाकतो. "आता काय करशील" असा विचार त्याच्या डोक्यात यायच्या आतच लक्ष्मण स्वत: लेग साईड ला मागे जाउन आता मोकळ्या झालेल्या ऑफ साईडला फोर मारतो. स्क्रीन वर वॉर्न चा हताश चेहरा आणि मागे "इडन गार्डन" वर ओरडणारे एक लाख लोक! परदेशी संघांच्या सगळ्या अभ्यासाला, कॉम्प्युटर, व्हिडीओ टेप्स अॅनेलिसिस ना एका अस्सल भारतीय कलाकाराने केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावर हरवल्याचे अविस्मरणीय दृश्य!
व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ने मार्क टेलर पासून ते आता पाँटिंग च्या संघांची अवस्था अशी केलेली आहे. एरव्ही लक्ष्मण संघात असून सुद्धा दिसत नाही. कधीकधी नसतो ही.
"Everytime he plays against us he comes up with something special and the next thing we read after the series is he is dropped! It leaves me completely bewildered."
अॅडम गिलख्रिस्टचे हे लक्ष्मणबद्दलचे वाक्य. स्थळ सिडने, जानेवारी २००४. सिरीज मधे आधी एकदा द्रविड बरोबर ३००+ रन्स ची भागीदारी करून झालेली. आता सचिन बरोबर आणखी ३५१. त्यात याच्या १७८ आणि क्वचित दिसणारे उदाहरण म्हणजे सचिन च्या २४१* पेक्षाही प्रेक्षणीय.
त्याआधी कलकत्त्याची द्रविड आणि त्याची ३७६ ची भागीदारी तर सर्वांना माहीतच आहे. ऑस्ट्रेलियाने १६ टेस्ट्स सलग जिंकलेल्या. "इडन" वर भारताला फॉलोऑन दिल्यावर तिसर्या दिवसअखेर शँपेन वगैरे मागवलेल्या. पण चौथ्या दिवशी भारताचे कोणीच आउट होणार नाही आणि पाचव्या दिवशी आपण सगळेच आउट होउ हे १६ मॅचेस मधे पराभव ठाउक नसलेल्या कांगारूंच्या स्वप्नात देखील आले नसेल.
लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाला हाणलेला मी पहिल्यांदा बघितला तो कलकत्त्याच्या मॅचमधे १९९८ ला, त्या "सचिन वि. वॉर्न" सिरीज मधे. आमच्या कंपनीला गुरूवारी सुट्टी असायची. आदल्या दिवशी चालू झालेल्या या मॅचमधे खास आमच्यासाठी ऑस्ट्रेलिया पहिल्याच दिवशी सर्वबाद झाले. पूर्ण दिवस भारताची बॅटिंग बघायला मिळणार, त्यात फॉर्मात असलेला सचिन, कलकत्त्याला नेहमीच चांगला खेळणारा (आणि तोपर्यंत आवडत असलेला) अझर यांच्या बद्दलची उत्सुकता जास्त. पण सिद्धू बरोबर सलामीला लक्ष्मण आला आणि तेथून ऑस्ट्रेलियाके बुरे दिन शुरू हो गये तेव्हा त्याने मारलेल्या ९५ रन्स ही पुढच्या गोष्टींची चुणूक होती याची कल्पना तेव्हा नव्हती.
पण तो खरा सलामीचा बॅट्समन नाही. आपल्याकडे सगळी मधली फळीच असल्याने बहुधा चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडत असावेत. पण जेव्हा लक्ष्मण ला मधल्या फळीत खेळता आले तेव्हा त्याचा खरा खेळ दिसू लागला. मग २००१ मधे कलकत्ता, २००३ मधे विंडीज, २००३ मधे पुन्हा ऑस्ट्रेलिया, २००४ मधे पाक अशा बर्याच वेळेस तो चांगला खेळला, पण ऑस्ट्रेलिया वगळता तो फारसा उठून दिसला नाही. बर्याच वेळा संघ अडचणीत असताना शेपटाबरोबर तो ६०-७० रन्स काढायचा पण इतरांच्या चमकदार शतकांपुढे त्या लक्षात यायच्या नाहीत.
२००१ च्या त्या प्रसिद्ध सिरीज मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याचे रन्सः २०, १२ ५९, २८१, ६५ आणि ६६.
नंतर लगेच झिम्बाब्वेविरूद्धच्या सिरीज मधे: २८, ३८, १५ आणि २०!
अशी बरीच उदाहरणे सापडतील. असा चाचपडत खेळत संघाच्या आत बाहेर चालू राहते. पाटा विकेट्स, ट्वेंटी २० वगैरेच्या अॅक्शन मूव्हीज मधे कलाकारांची गरज नसते, फक्त फाईटिंग करणारे लागतात. मग पुन्हा ऑस्ट्रेलिया सिरीज येते, चेंडू पिचवरून डोक्यापर्यंत उडू शकतो हे नव्याने कळते. कॉमेंटेटर्सच्या भाषेत सांगायचे तर "बॉईज" आणि "मेन" मधला फरक दिसू लागतो. आणि पुन्हा लक्ष्मण मॅच जिंकून देतो. नवीन ऑस्ट्रेलियन बोलर्स ना "मॅग्राथ किंवा वॉर्न म्हणत होते ते बरोबर होते" असे जाणवेपर्यंत मॅच हातातून गेलेली असते. लक्ष्मण बहुधा त्याची आर्टिस्ट्री दाखवायची वेळ निवडतो. त्या वेळेआधी मॅच धोक्यात असते आणि त्यानंतर जिंकलेली असते हे केवळ साईड ईफेक्ट्स!
त्याच्या २००३ मधल्या अशाच एका सुंदर शतकाचे वर्णन एका ऑस्ट्रेलियन पत्रकारा च्या शब्दातः
"Waving boundaries off both feet through cover, he transfixed the SCG crowd during the second session that revived India and the series. Mitchell Johnson was taken for 18 from five balls as Laxman split a crowded offside field and when he grew bored of hitting to cover, he worked towards square leg and mid-on with shots few Australians would have considered - or known how to play"
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा
ऑस्ट्रेलियाल हैद्राबादि तडका
ऑस्ट्रेलियाल हैद्राबादि तडका पचत नाहि कधिच...
ऑस्ट्रेलियाला हैद्राबादि
ऑस्ट्रेलियाला हैद्राबादि तडका पचत नाहि कधिच...
सुंदर लेख, एक 'अनसंग हिरो' चर
सुंदर लेख, एक 'अनसंग हिरो' चर चांगला लेख वाचायला मिळाला. त्याचे ऑस्ट्रेलिया दौर्यातील एकदिवसिय सामन्यातील शतके तर क्लासच.
टण्या, अगदी खरय, आमची पण तीच अवस्था
आजच लक्ष्मणबद्दलचे काही ट्विट्स मिळाले इ-मेल मधून.
Some funny tweets about laxman:
#Flash: Home Ministry has issued advisory for all people named Laxman against traveling to Australia
#I wont be surprised if Laxman is made honorary Australian citizen: better to have him on your side than a constant thorn in the flesh...
#I hereby declare that I am starting proceedings to find LaxmanJanmabhoomi so we can build a Laxman temple.
#Last week belonged to Ram. This week belongs to Laxman
#Lets demolish the hospital where Laxman was born n build a bhavya Laxman mandir!
#aussies will have answer for everyone but for vvs laxman(very very special) they crumble and cry like a child .
#Sydney se 50-50 kos door gaon me jab koi cricketer rota hai..toh uski maa kehti hai beta chup hoja nahi toh laxman aa jaega
#Dear Kalmadi, if u have an extra gold medal pls give it to VVS Laxman, he deserves!! And a Silver to Ishant & a Bronze to Raina for running
#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman'
#The day VVS LAXMAN retires from Test cricket, it will be a National holiday in Australia
अतिशय सुंदर लेख
अतिशय सुंदर लेख
मस्त लेख... सिडनी से
मस्त लेख...
सिडनी से पचास-पचास कोस दूर गाव मे जब कोई क्रिकेटर रोता है... तब उसे मा केहती है बेटा चूप होकर सोजा... नही तो लक्ष्मण आ जायेगा...!!!
फारेंडा... लै झकास बे, कस्लं
फारेंडा...
लै झकास बे, कस्लं भारी लिवलास बग ! आमच्या सोलापूरला अस्तास तर तुला सावरकर मैदानावर नेवून खंग्री पॅटीस खायाला घातलं आस्तं बग. न्हायतर मस्तमंदी सावजीची चिकन बिर्याणी खायाला घिवुन गेलो अस्तो.
<<पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा>>
शिपै, याला १०० गावं इनाम दिवून टाका, आमी लै खुश हें त्येच्यावर
काल मला आलेला एक समस... While
काल मला आलेला एक समस...
While many in India are busy pondering Where Shriram was born?
The Australians are wondering Why Lakshman was born?
सुंदर लेख!!! It was one of
सुंदर लेख!!!
It was one of all time greatest innings by VVS!
लै ब्येष्ट... नावाप्रमाणे
लै ब्येष्ट...
नावाप्रमाणे लक्ष्मणासारखा धावुन येणारा very very special laxman. ऑसीज विरुद्ध त्याच्यात काय संचारतं कळत नाही. एरवी चाचपडणार्या लक्ष्मणच्या चेहेर्यावर ऑसीजसमोर खेळताना एखाद्या ज्युनिअर टीमला ब्याटींग शिकवतोय अश्या थाटाचे भाव असतात.
फार मस्त लिहिले आहेस.
फार मस्त लिहिले आहेस.
मस्स्त लिहिलंय. शेवटची
मस्स्त लिहिलंय.
शेवटची बीसीसीआयला केलेली विनंती भन्नाटच.
mala ha lekh khup awdalaa
mala ha lekh khup awdalaa mhanun mi to majhya facebook a/c var share karat aahe.
mi direct hi http://www.maayboli.com/node/20244 link dileli aslyane i hope malaa koni hi chor mhananar nahi...
http://www.facebook.com/shailesh.narkar
हर्षा भोगलेंनी क्रिकइन्फो वर
हर्षा भोगलेंनी क्रिकइन्फो वर 'लक्खन' वर लेख लिहिलाय.
http://www.cricinfo.com/magazine/content/story/480388.html
फार सुन्दर लेख आहे
फार सुन्दर लेख आहे
भारताने नेहमी रडीचा डाव
भारताने नेहमी रडीचा डाव खेळणारया ऑस्ट्रेलियावर Whitewash विजय मिळवला म्हणुन बिचारया लक्ष्मणच कौतुक चाललय
असो सचिन, लक्ष्मण, द्रविड ने छान कामगीरी केलीय. बाकी ढोणी सारखे ऐतखावू असतातच आजुबाजुला आयत श्रेय लाटायला. 
ढोणी? ऐतखाऊ?? काहीतरी
ढोणी? ऐतखाऊ?? काहीतरी वैयक्तिक कारण असावे..
वार्ताहरः तुम्ही यष्टीरक्षक का झालात?
माधव मंत्री: मी लहानपणी मंद होतो...
(प्रत्येक चेंडूला किमान एक उठाबशी काढण्याची शिक्षा असते यष्टीरक्षकाला)
टेस्ट मॅच मधे : ४०+ सरासरी.
वन डे मधे: ५०+
त्याशिवाय कर्णधार. आणि एक चांगला कर्णधार..
टेस्ट मॅच मधे : ४०+
टेस्ट मॅच मधे : ४०+ सरासरी.
वन डे मधे: ५०+ >>> परदेसाई मला वाटले किती उठाबशा काढाव्या लागतात ते लिहीलंय
चुकलंच.. दोन विषय एक झाले
चुकलंच.. दोन विषय एक झाले
टेस्ट मॅच मधे १५० षटकं टाकली जातात एका डावात. एका मॅचमधे (१५० * ६ * २ = १८०० उठाबश्या).
वन्-डे मधे ५० षटकं टाकली जातात एका डावात (३०० उठाबश्या एका दिवसात).
ढोणीची कामगिरी:
टेस्ट मॅचः सरासरी धावा ४०+
वन डे: सरासरी धावा ५०+
तिन्ही संघांचा कर्णधार (टेस्ट, वन्-डे, २०/२०).
मस्त लेख .. मजा आलि
मस्त लेख .. मजा आलि वाचायला.
प्रतिसाद पण वाचनीय आहेत
फारेंड लै म्हंजे लैच भारी
फारेंड
लै म्हंजे लैच भारी रे
त्या बिच्चा-या लक्ष्मणला पत्रकारांनी कधीच न्याय दिला नाही.. तुझे शब्द अंगावर रोमांच उठवून गेले. तो थरार पुन्हा जिवंत केलास तू..
आमचा चहावाला म्हणतो.. लक्ष्मण येडा आहे येडा. येड फिरलं कि दहाव्या नंबरवर पण मॅच फिरवतो. अगदी खरंय
सगळे धुरंधर दोन्ही डावात
सगळे धुरंधर दोन्ही डावात सपशेल आपटले असताना लक्ष्मणने केलेली ९६ ची खेळी पण लाजवाब !
मस्त लेख आहे.
मागच्याच महिन्यात तो ९९ वर
मागच्याच महिन्यात तो ९९ वर बाद झाला ..त्या आधी एकदा ७६. आणि आता ९६. पण या सर्व खेळ्या मॅचविनर ठरल्या. ते ही तळाच्या फलंदाजांना घेऊन...केवळ त्याच्यामुळं हरभजन खुलला आणि दोन शतकं ठोकली.
पद्मश्री लक्ष्मण
पद्मश्री लक्ष्मण
लक्ष्मण आणि द्रविडच्या अजरामर
लक्ष्मण आणि द्रविडच्या अजरामर खेळीस आज १५ वर्षे झाली. हा सामना कालच घडल्यासारखे वाटते आजही!
सही टण्या! १५ वर्षे झाली असे
सही टण्या! १५ वर्षे झाली असे नक्कीच वाटत नाही. त्या मॅच चे हायलाईट्स कधीही बघताना कंटाळा येत नाही. मात्र त्या मॅच ला कलाटणी मिळण्याचे क्षण हायलाईट्स पॅकेज मधे नीट पकडलेले नाहीत. त्यातल्या त्यात लक्ष्मण चे फटके बघून मॅग्राथ वगैरे माना हलवत रन अप कडे परत जाताना दिसतात तेव्हा जाणवू लागते.
काय मॅच होती राव. हरभजन ने
काय मॅच होती राव. हरभजन ने हॅटट्रीक घेतली तेव्हा कसलं भारी वाटलं होतं. मग पहिल्या ईनिंग ला आपल्या बोर्या वाजला तेव्हा वाटलं, पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या होणार. आणी मग तो जादुई दिवस उजाडला. एकही विकेट न गमावता लक्ष्मण-द्रविड ने ३००+ ची पार्टनरशिप केली. स्वप्नवत च होतं सगळं. खरं सांगायचं तर मॅच जिंकणं हे चेरी ऑन द टॉप वाटावं, ईतका तो प्रतिकारच अद्भूत होता.
द्रविड बॅटींगला उतरला, तेव्हा लक्ष्मण ९५ वर होता (बहुतेक) आणी शेवटपर्यंत दोघांच्या स्कोर मधलं अंतर बरचसं तेच राहीलं (१८० आणी २८१). त्या मॅचमधलाच नव्हे, तर भारतीय क्रिकेटमधलाच एक मोठा टर्निंग पॉईंट होता तो.
तेव्हा रीडिफ वर प्रेम
तेव्हा रीडिफ वर प्रेम पाणिक्कर चे त्या त्या दिवसाच्या खेळाचे अत्यंत सुंदर अॅनेलिसीस केलेले आर्टिकल्स अगदी नेमाने वाचायचो. या सिरीज मधे त्याचे लेख अतिशय जबरदस्त विष्लेषण करणारे असत, नेहमीप्रमाणेच.
ज्या दिवशी या दोघांनी दिवसभर खेळून पारडे फिरवले, त्यादिवशीच्या खेळाबद्दलचा हा लेख.
http://www.rediff.com/cricket/2001/mar/14india.htm
या लेखात त्यांनी आदल्या
या लेखात त्यांनी आदल्या दिवशीच्या लेखाचे जे वर्णन केले आहे ते ही त्या आदल्या दिवशी वाचल्याचे लक्षात आहे
तेव्हा रीडिफ वर प्रेम
तेव्हा रीडिफ वर प्रेम पाणिक्कर चे त्या त्या दिवसाच्या खेळाचे अत्यंत सुंदर अॅनेलिसीस केलेले आर्टिकल्स अगदी नेमाने वाचायचो. या सिरीज मधे त्याचे लेख अतिशय जबरदस्त विष्लेषण करणारे असत, नेहमीप्रमाणेच >> +१. लग्नानंतरची पूजा होती ज्याचे टायमिंग आम्ही (भटजी नि मी) अॅडजस्ट करून घेतले होते
माझ्याकडे DVD आहे त्या सिरीजची त्यातही काही भाग वगळलाय असे वाटत राहते.
कॅस्प्रोविच हात खांद्यात
कॅस्प्रोविच हात खांद्यात जमिनीला समांतर करून पळत येत बोलिंग करत होता. गिलख्रिस्ट वगळता सर्वांनी बोलिंग केली त्या मॅचमध्ये. स्लेटर पण बहुतेक. गिलख्रिस्टची किंग पेअर फार मोलाची होती. पाँटिंग निष्प्रभ ठरणेदेखील.
पाँटिंगची सर्वात वाइट सिरीज. गिल्ली मुंबईच्या मॅच नंतर जाम ढेपाळला.
Pages