"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

Submitted by निमिष_सोनार on 5 October, 2010 - 22:31

गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर म्हटल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता. अर्थात तो मी बघितला नव्हताच.
पण, रोबोटचा दक्षिणेकडचा "शंकर" हा निर्माता असल्याने व तो हिंदित डब असल्याने थोडे हायसे वाटत होते.
कारण त्याचे पूर्वीचे काही चित्रपट बऱ्यापैकी कल्पनाशक्ती वापरून बनवले गेले होते. उदा. जीन्स, हिंदुस्तानी वगैरे.
तसा सायन्स्स फिक्शन क्रीश हीट झाला होताच. पण त्यात स्पेशल इफेक्टस हातचे राखून वापरले होते आणि त्याची कथा पाच पाच जणांनी लिहीली होती आणि बरीच मोठी आणि क्लीष्ट होती.
रोबोटचा लेखक एकच आहे. शंकर.
कथा सोपी आहे. जास्त क्लिष्ट नाही.
आणि कल्पनाशक्ती म्हणाल तर अद्भुत, अद्वितीय.
दक्षिणेत तर रजनिकांतच्या फॅन्स नि सकाळी दोन वाजल्यापासून सकाळी चार च्या शो साठी रांगा लावल्या होत्या अशी बातमी टाईम्स ला होती. आणि एकेक तिकिट ५००० रु ना काळ्या बाजारात विकले गेले होते, असे वाचनात आले.
खरोखरच चित्रपट बघण्यासारखा आहे, यात वादच नाही.

कथा :
डॉ. वशी याने एक रोबोट (नाव: चिट्टी) बनवला असतो जो त्याला (त्याच्या सारखे अनेक रोबोट बनवून) सैन्यात शत्रूविरुद्ध वापरायचा असतो. त्याचा प्रतिस्पर्धी आणि गुरू डॉ. व्होरा याला तसाच रोबोट बनवता येत नाही. तो चिट्टीकडून त्याची न्युरोटीक संरचना चोरण्याच्या बेतात अस्तो. त्याला तसाच रोबोट बनवून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना घातक कामासाठी त्याला विकायचा असतो. पण तो बनवता येत नसल्याने डॉ. वशी च्या रोबोटला तो विविध कारणांनी सैन्यात घेण्यासाठी नाकारतो.
काही चुका रोबोटकडून ही अशा घडतात (आगीतला "तो" प्रसंग) की व्होराच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. मग तो वशीला रोबोट मध्ये भावना निर्माण होईल असे करायला भाग पाडतो, म्हणजे रोबोट स्वतः काही निर्णय घेवू शकेल.
रोबोटमध्ये भावना येतात आणि अघटीत घडते. रोबोट मध्ये वशीच्या मैत्रीणिवद्दल (ऐश्वर्या) प्रेमभावना निर्माण होते आणि त्यासाठी तो वशीच्या विरोधात जातो.
मॅन. मशीन. मोहब्बत.
वशी त्याला तोडून टाकतो. डिसमॅण्टल करतो. पण तोडलेला रोबोट पुन्हा बनवून व्होरा त्यात विध्वंसक चीप बसवतो.....
पुढे काय?
चित्रपट जावून पाहाच.

स्पेशल ईफेक्टस बद्दल :
- चित्रपटात स्पेशल ईफेक्टस ची अगदी सुरुवातीच्या दृश्यापासून इतकी रेलेचेल आहे की काय सांगावे.
- सगळे इफे़क्टस जागतीक दर्जाचे आहेत. त्यासाठी चित्रपट कोठेच कमी पडत नाही.
- क्लायमॅक्सचा सीन तर या सगळ्यांवर कडी आहे. कळस आहे. त्यातली कल्पनाशक्ती आणि इफे़क्टस आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात आपण यापूर्वी बघितले नाहियेत. अगदी हॉलीवूडच्या चित्रपतात सुद्धा नाही. बरं!
एकदम ओरिजीनल आणि क्लास.... झकास.

अॅक्शन दृश्ये :
- अद्वितिय, अप्रतिम.
- रेल्वेचा मारामारीचा आणि पाठलागाचा सीन ग्रेट (महान)
- रोबोट स्वरूपातला रजनीकांत (चिट्टी) ऐश्वर्याला लग्नाच्या मंडपातून पळवून नेत असतांना रस्त्यावरची अॅक्शन दृश्ये लाजवाब, थरारक.
- चित्रटातली इतर सगळी अॅक्शन दृश्ये थरारक.

इतर वैशिष्ट्ये:
- सैन्यात घेण्या आधी एका मिटींग मध्ये डॉ. व्होरा रोबोटला "सैन्यात वापरण्यास अयोग्य" आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने काही सूचना रोबोटला देतो, त्यातले स्पेशल इफेक्ट आणि कल्पना अगदी खासच.
- इलेक्ट्रो मॅग्नेटिक मोड मध्ये गुंडाची सगळी शस्त्रे ओढली जातात आणि तो अवतार काली सारखा दिसतो, आणि अडानी स्त्रीया लगेच अंगात येवून घुमायला लागतात. विनोद निर्मीती, अॅक्शन, स्पेशल इफेक्ट, अंधश्रद्धेचा पगडा.. सगळे कल्पकतेने एकाच दृश्यात दाखवले. वा!
- मच्छरा सोबतचा रोबोतचा संवाद. छान आणि ओरिजीनल विनोद.

अभिनय :
- रजनिकांतने डॉ. वशी आणि पहीला रोबोट, तसेच दुसरा व्होराचा रोबोट दोघांची ही भूमीका उत्तम साकारली आहे.
- रोबोटने अभिनय छान केला आहे.
- काही दृश्य मनाला चटका लावून जातात.
गाणी:
- गाणी मात्र खास लोकप्रिय आणि श्रवणीय नाहीत.
- मात्र गाणी प्रेक्षणीय आहेत.
(हिंदुस्तानी मधील "माया मच्छींद्र "गाणे आठवतेय? )

हा चित्रपट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा. दुप्पट पैसे वसूल.
ज्यांनी बघीतला त्यांनी आपले मत व्यक्त करावे.

- NIMISH SONAR, PUNE

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages