"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

Submitted by निमिष_सोनार on 5 October, 2010 - 22:31

गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर म्हटल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता. अर्थात तो मी बघितला नव्हताच.
पण, रोबोटचा दक्षिणेकडचा "शंकर" हा निर्माता असल्याने व तो हिंदित डब असल्याने थोडे हायसे वाटत होते.
कारण त्याचे पूर्वीचे काही चित्रपट बऱ्यापैकी कल्पनाशक्ती वापरून बनवले गेले होते. उदा. जीन्स, हिंदुस्तानी वगैरे.
तसा सायन्स्स फिक्शन क्रीश हीट झाला होताच. पण त्यात स्पेशल इफेक्टस हातचे राखून वापरले होते आणि त्याची कथा पाच पाच जणांनी लिहीली होती आणि बरीच मोठी आणि क्लीष्ट होती.
रोबोटचा लेखक एकच आहे. शंकर.
कथा सोपी आहे. जास्त क्लिष्ट नाही.
आणि कल्पनाशक्ती म्हणाल तर अद्भुत, अद्वितीय.
दक्षिणेत तर रजनिकांतच्या फॅन्स नि सकाळी दोन वाजल्यापासून सकाळी चार च्या शो साठी रांगा लावल्या होत्या अशी बातमी टाईम्स ला होती. आणि एकेक तिकिट ५००० रु ना काळ्या बाजारात विकले गेले होते, असे वाचनात आले.
खरोखरच चित्रपट बघण्यासारखा आहे, यात वादच नाही.

कथा :
डॉ. वशी याने एक रोबोट (नाव: चिट्टी) बनवला असतो जो त्याला (त्याच्या सारखे अनेक रोबोट बनवून) सैन्यात शत्रूविरुद्ध वापरायचा असतो. त्याचा प्रतिस्पर्धी आणि गुरू डॉ. व्होरा याला तसाच रोबोट बनवता येत नाही. तो चिट्टीकडून त्याची न्युरोटीक संरचना चोरण्याच्या बेतात अस्तो. त्याला तसाच रोबोट बनवून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना घातक कामासाठी त्याला विकायचा असतो. पण तो बनवता येत नसल्याने डॉ. वशी च्या रोबोटला तो विविध कारणांनी सैन्यात घेण्यासाठी नाकारतो.
काही चुका रोबोटकडून ही अशा घडतात (आगीतला "तो" प्रसंग) की व्होराच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. मग तो वशीला रोबोट मध्ये भावना निर्माण होईल असे करायला भाग पाडतो, म्हणजे रोबोट स्वतः काही निर्णय घेवू शकेल.
रोबोटमध्ये भावना येतात आणि अघटीत घडते. रोबोट मध्ये वशीच्या मैत्रीणिवद्दल (ऐश्वर्या) प्रेमभावना निर्माण होते आणि त्यासाठी तो वशीच्या विरोधात जातो.
मॅन. मशीन. मोहब्बत.
वशी त्याला तोडून टाकतो. डिसमॅण्टल करतो. पण तोडलेला रोबोट पुन्हा बनवून व्होरा त्यात विध्वंसक चीप बसवतो.....
पुढे काय?
चित्रपट जावून पाहाच.

स्पेशल ईफेक्टस बद्दल :
- चित्रपटात स्पेशल ईफेक्टस ची अगदी सुरुवातीच्या दृश्यापासून इतकी रेलेचेल आहे की काय सांगावे.
- सगळे इफे़क्टस जागतीक दर्जाचे आहेत. त्यासाठी चित्रपट कोठेच कमी पडत नाही.
- क्लायमॅक्सचा सीन तर या सगळ्यांवर कडी आहे. कळस आहे. त्यातली कल्पनाशक्ती आणि इफे़क्टस आजपर्यंत कोणत्याच चित्रपटात आपण यापूर्वी बघितले नाहियेत. अगदी हॉलीवूडच्या चित्रपतात सुद्धा नाही. बरं!
एकदम ओरिजीनल आणि क्लास.... झकास.

अॅक्शन दृश्ये :
- अद्वितिय, अप्रतिम.
- रेल्वेचा मारामारीचा आणि पाठलागाचा सीन ग्रेट (महान)
- रोबोट स्वरूपातला रजनीकांत (चिट्टी) ऐश्वर्याला लग्नाच्या मंडपातून पळवून नेत असतांना रस्त्यावरची अॅक्शन दृश्ये लाजवाब, थरारक.
- चित्रटातली इतर सगळी अॅक्शन दृश्ये थरारक.

इतर वैशिष्ट्ये:
- सैन्यात घेण्या आधी एका मिटींग मध्ये डॉ. व्होरा रोबोटला "सैन्यात वापरण्यास अयोग्य" आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीने काही सूचना रोबोटला देतो, त्यातले स्पेशल इफेक्ट आणि कल्पना अगदी खासच.
- इलेक्ट्रो मॅग्नेटिक मोड मध्ये गुंडाची सगळी शस्त्रे ओढली जातात आणि तो अवतार काली सारखा दिसतो, आणि अडानी स्त्रीया लगेच अंगात येवून घुमायला लागतात. विनोद निर्मीती, अॅक्शन, स्पेशल इफेक्ट, अंधश्रद्धेचा पगडा.. सगळे कल्पकतेने एकाच दृश्यात दाखवले. वा!
- मच्छरा सोबतचा रोबोतचा संवाद. छान आणि ओरिजीनल विनोद.

अभिनय :
- रजनिकांतने डॉ. वशी आणि पहीला रोबोट, तसेच दुसरा व्होराचा रोबोट दोघांची ही भूमीका उत्तम साकारली आहे.
- रोबोटने अभिनय छान केला आहे.
- काही दृश्य मनाला चटका लावून जातात.
गाणी:
- गाणी मात्र खास लोकप्रिय आणि श्रवणीय नाहीत.
- मात्र गाणी प्रेक्षणीय आहेत.
(हिंदुस्तानी मधील "माया मच्छींद्र "गाणे आठवतेय? )

हा चित्रपट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा. दुप्पट पैसे वसूल.
ज्यांनी बघीतला त्यांनी आपले मत व्यक्त करावे.

- NIMISH SONAR, PUNE

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिक्षण आहे. पैसे देऊन पहावा अशी इच्छा होत आहे. हितगुज मधल्या सिनेमा विभागात हलवावे ही नम्र विनंती.

नक्कीच नावावरुन बघु नये अस माझ ठाम मत मी बनवल होत पण आता तुमच्या परिक्षणावरुन मत बदलायचा मोह होतोय. तरीही इंडियन सिनेमा + सायन्स फिक्शन हे गणीत कै बरोबर सुटेल अस वाटत नाही. असो

१०० % सहमत . शनिवारी ४५० रू च तिकिट घेऊन बंगलोर आयनॉक्स मधे पाहिला . त्या पब्लिकच्या रजनीच्या प्रत्येक एन्ट्री ला (अगदी स्त्री वेशातील सुद्धा) टाळ्या आणी शिट्ट्या पाहून चेन्नईतल्या सिंगल स्क्रीन्स मधे काय होत असेल याची कल्पना आली . Happy
एक मात्र खर , तुम्ही -आम्ही रजनी च्या लोकप्रियतेची कल्पना ही करू शकत नाही .आपण त्याची कितीजरी चेष्टा केली (SMS Jokes etc) तरी केवळ चित्रपटाच्या सुरुवातीला SUPERSTAR RAJNI आल्यावर जो दंगा होतो त्याला तोड नाही .
पण हा चित्रपट म्हणजे फक्त रजनीकांत नाही . त्याच्या फॅन्सच्या मतेच हा शंकर चा चित्रपट जास्त आहे .
Surprisingly इथला माणूस रजनी एकाच Sad गुंडाला घाबरतो . (हाच रजनी सिवाजी मधे computer engineer असून एकच वेळी १०० जणाना झोपवतो)

वरती म्हटल्याप्रमाणे स्पेशल इफ्फेक्ट्स Hollywood levels . पण रोबोट सगळ्यात जास्त स्कोर करतो रोबोच्या Emotional level वर . ज्यावेळी स्वतःला dismantle करताना अ‍ॅश कडे बघून boyfriend no ; toyfriend म्हणतो त्यावेळचा सीन तर कळस आहे ,अगदी AI ची आठवण करून देणारा .
सर्वात महत्वाचे म्हणजे मला तमिळ चा एकही शब्द कळत नसतानाही रोबो बघण्यात काहीच अडचण येत नाही .
निमिष ने म्हट्ल्याप्रमाणे नक्की पहा . पैसे वसूल १००% होतील Happy

दक्षिणेकडचे सिनेमे, आणि त्यातून रजनीकांतचा म्हणून थोडा साशंक होतोच. आता बघायला पाहिजे.

हा सगळा काळ्याचे पांढरे करायचा धंदा. २G चे पैसे वापरुन बनवला आहे. पिक्चर चे costing सहज २५० कोटि च्या वर असेल.

निमिष, मी हा धागा कसा काय मिसला, कोण जाणे... पण बरं झालं पाहिला... नाहीतर रोबोची मी एकटीच जबरदस्त फॅन असलेली मराठी मुलगी आहे या भ्रमात राहिले असते.रोबो हा सिनेमा मला इतका आवडला, की आता त्यावर बोलणे हा माझा जिव्हाळ्याचा विषय बनून गेला आहे. ह्या धाग्यावर तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशी मी १००००% सहमत आहे. Happy
इ-सकाळ मधलं रोबोचं परिक्षण इतकं खास नाहीये, जितकं तुम्ही इथे लिहिलंय...अतिशय परिपूर्ण. सर्व अँगल्सनी विचार केलाय तुम्ही या सिनेमाचा...अगदी माझ्याचसारखा Happy

अभिमानाने सांगते, मी ह्या सिनेमाचा "फर्स्ट डे फर्स्ट शो" तोही तमिळमधे पाहिला... भली मोठ्ठी स्क्रिन, बेस्ट साउंड एफ्फेक्ट्स आणि त्या जोडीला रजनीचे तमिळ फॅन्स यांच्याबरोबर हा सिनेमा पाहणे ही एक अत्यंत आनंददायी अनुभूती होती. मला तमिळ बर्‍यापैकी समजते, पण तरीही इंग्लिश सबटायटल्स असल्याने सिनेमाचा १००% आस्वाद घेऊ शकले... Happy

गाण्यांविषयी म्हणाल, तर ही गाणी तमिळ मधे अतिशय गोड वाटतात ऐकायला... भाषा समजत असेल तर त्याची गोडी काय वर्णावी... अहाहाहा... मी रोजच्या रोज ह्या गाण्यांचे पारायण करतेय... Happy

शिवाय, सिनेमा मूळ तमिळ असल्याने त्यातले काही जोक्स, जे भाषेवर आधारित होते, त्यांचा हिंदीत व्यवस्थित अनुवाद होऊ शकला नाही... (मी हिंदी आवृत्ती पण पाहिली Happy ) जसे सुरुवातीला डॉ. वसिगरन यांची आई चिट्टीला टिव्ही लावायला सांगते, ते हिंदीत "टिव्ही खोलो" असं काहितरी आहे आणि तो टिव्ही खाली फेकतो, म्हणजे खोलतो... यात काहीच विशेष विनोद होत नाही...
मूळ तमिळ जोक असा आहे... "टिव्ही पोडं(पोडु)" याचा लिटरली अर्थ टिव्ही लाव आणि दुसरा अर्थ "टिव्ही पाड" असाही होऊ शकतो. म्हणून चिट्टी तो टिव्ही खाली पाडतो... आणि थिएटरमधे हास्यकल्लोळ होतो...

याशिवायही काही विनोद जसे डॉ. वसि रोबोला स्पिच ट्रेनिंग द्यायला लावतात, त्यावेळेचे "चेन्नई तमिळ" भाषेतले संवाद, म्हणजे शिव्या जे संतानाम देतो आणि रोबो रिपिट करतो... "ए मच्चा रिपिट" असं म्हणून जी मज्जा सुरु होते, ती तमिळ भाषेत अल्टिमेट आहे. ती हिंदीत पहातांना अजिबात येत नाही. कारण जसे आपल्याकडे बिहारी हिंदी, कोल्हापुरी मराठी अशी वैशिष्ट्ये आहेत तशीच तिकडे चेन्नई तमिळ, मदुराई तमिळ, तिरुनलवॅली तमिळ असे डायलेक्ट आहेत...

थोडक्यात, हा सिनेमा शंकरचा असल्याने आणि "डॉ. सुजाता" यांचे लेखन असल्याने त्यांनी त्यात जो तमिळ भाषेचा फ्लेव्हर दिला आहे, तो हिंदी डबिंग मधे लोप पावला आहे...

रोबो या सिनेमाचं मूळ तमिळ नाव "एन्दिरन"... एन्दिर म्हणजे यंत्र या शब्दाचे पुल्लिंगी रुप. "एन्दिर" म्हणजे नपुंसकलिंगी रुप... असो, तमिळ भाषेचा क्लास नाहीये हा, तेंव्हा आवरतं घेते Proud )

तर लोकहो,या सिनेमाचा नीट आस्वाद घ्यायचा असेल, तर आता तमिळ शिका Proud

तर लोकहो,या सिनेमाचा नीट आस्वाद घ्यायचा असेल, तर आता तमिळ शिका>>>>>>>

हा हा हा, इथे आधी मराठी शिकायची गरज जास्त आहे, मग बघु तमिळचं Wink

त्यापेक्षा गुलजार साहेबांना भाषांतर करायला लावायचे होते, त्यांनी तितक्याच तोडीचे हिंदी संवाद लिहून दिले असते. (शिवाय त्यांनी पैसे पण फार नसते घेतले !!!)

मला पण आवडला रोबो.

इ-सकाळ मधलं रोबोचं परिक्षण इतकं खास नाहीये, जितकं तुम्ही इथे लिहिलंय...अतिशय परिपूर्ण. सर्व अँगल्सनी विचार केलाय तुम्ही या सिनेमाचा...अगदी माझ्याचसारखा>>>>>> अगदी बरोबर

सानी मला पण असंच वाटत होत की मी एकटीच रोबोची जबरदस्त फॅन आहे.:)

मस्त वर्णन. बघायचाच आहे हा. आपण काहीतरी गंभीर, मोठा चित्रपट काढतो आहोत असा आव न आणता काढलेले चित्रपट अचाट आणि अतर्क्य असले तरी चांगले वाटतात.

(निमिष, चित्रपट विभागात टाक (करता आले तसे तर), नाहीतर अ‍ॅडमिनना विनंती कर.)

सानी - तमिळ चित्रपटातील संवादांबद्दल धन्यवाद. पाहिजे तर तू तमिळ व्हर्जन चा स्वतंत्र रिव्यू अशा माहितीसकट लिही. आवडेल वाचायला.

सानी
इतकी भरभरुन सांगतीये म्हणजे मी पण आता बघायचं ठरवलं आहे, कुटुंबासकट !!
या रजनीकांत कडुन आपल्या मराठी नटांनी जरा तरी (निदान ५% तरी) शिकावं ,पुणे-मुंबई सारखी शहरं, तिथले लोक, त्यांच राहणीमान, स्टाईल सोडुन जरा अस्सल गावाकडच्या लोकांना आवडेल असं काहीतरी करायला शिकावं
Happy

ஹ ஹ ஹா, ரோபோட் கில்லஸ் ஹிம்செல்ப் ஜஸ்ட் லைக் தேர்மினடோர் டிச்த்ராய் ஹிம்செல்ப் அட் எண்டு
donald-duck-022007-3.gifdownload (1).jpg

प्रसिक@
तमिळ लिपित इंग्रजी कशाला? एकतर तमिळ भाषेतच लिहायच होत नाहीतर इंग्रजीतच.
ha ha haa, Robot kills himself just like termindor destroys himself. यातील termindor या शब्दाचा अर्थ मला नाही कळला. आणि रजनीकांत तमिळ प्रमाणे हिंदी, मराठी कन्नड व इंग्रजी ही छान बोलतो.

वा वा काय मस्त धागा आहे. मस्त आहे चिट्टी चिट्टी रोबो!
गाणी मला तर फारच आवडली, श्रवणीय पेक्षा प्रेक्षणीय नक्की आहेत. भाषांतराचा डाव साफ फसलेला आहे. मला नैना मिले हे गाण एतका आवडल की काय सांगु ?? अह्हहा.... ते थिएअटरात तर नुसतं धमाल वाटलं !! बाकी ते पागल अनुकण गाण ही बघायला मस्त आहे़!! किलिमांजारो लडकी परबत की यारो.... म्हणजे टंग ट्विस्टर!! Rofl
खरं सांगायचं तर मी फारश्या काही अपेक्षा न ठेवताच गेले होते..
पण एकदम निखळ मनोरंजन करणारा सिनेमा आहे !!! बाकी सिनेमातले अनेक सीन्स म्हणजे वा वा वा!! तो कालीमातेचा सीन, रेल्वेच्या बाजुने पळताना त्या पान थुंकणार्‍याच्या तोंडावर पाय देऊन पळणारा चिट्टी!! Biggrin आणि शेवटचा सीन तर सांगण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे. रोबो हा खर तर पाहण्यापेक्षा किंवा सांगण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे.

अगदी " आमच्या रजनिकांत चा रोबो पाहायचा बर का !!" असं आग्रहाच निमंत्रण देऊन मी माझे हे दोन शब्द संपवते!!

अरे १३ मार्च ला रोबोट आहे ... टी व्ही वर.. बघायला विसरु नका.... ४८ एंची टी व्ही असलेल्या मित्राला आधीच पटवुन ठेवले आहे.... बघायला विसरु नका....

Pages