विसरण्याला मद्यप्याला....

Submitted by अ. अ. जोशी on 2 October, 2010 - 06:32

विसरण्याला, मद्यप्याला ओठ हे धरतात का रे?
अन नशा आल्यावरीही अश्रु ओघळतात का रे?

ज्या फुलांना पाहिले की त्या मिठीचा गंध येतो
नेहमी गंधाळण्या कोमेजली असतात का रे?

पाखरे येतात काही आजही घरट्यात माझ्या
आठवांचे वेचुनी दाणे... पुन्हा उडतात का रे?

देह, घरटे एक झाले; वाटते होईल मनही...
या जशा जमतात आशा, त्या तशा उरतात का रे?

आजही साधेपणाने गात आहे 'अजय' गीते
ऐकणारेही तसे साधे कुणी मिळतात का रे?

गुलमोहर: 

कैलास,
तुमची 'वाहवा' मी बर्‍याच दिवसांनी गझल लिहिल्याबद्दल आहे असे मी समजतो.
माझ्यामते ही गझल फार उत्कृष्ठ नाही.

गंगाधर,
धन्यवाद!

मनकवडे आहात झालं...... पण गझल उत्तम आहे यात शंकाच नाही अजयराव.... विशेषतः मतला व मक्ता. Happy