भुकेला बंडू -

Submitted by विदेश on 24 September, 2010 - 07:00

लाडू चिवडा करती लढाई
दोघेही मारती बढाई
`मी आवडता `-`आवडता मी `
चवीत सा-या मीच नामी !
तिखटाशिवाय फराळ कसला !
गोडाविण तो फराळ कसला ?
तिखट गोड ते भांडु लागले
मदतीसाठी ओरडू लागले-
शेव चकली दोघी धावल्या
जामुन बर्फी करंज्या आल्या
ताटामध्ये सुरू जाहली
तू-तू मी-मी गंमत झाली
बंडू जवळी आला दिसता
पदार्थांमधे वसे शांतता !
...चव नसते गोडा-तिखटाला
जेव्हा असतो बंडू भुकेला !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: