मृत्युदंड

Submitted by विजयकुमार on 5 September, 2010 - 09:08

होय
हि सजाच आहे
तिच्या शृंगारसुखाला
अजगरी वेटोळे दिल्याची
तिच्या रात्रींच्या चांदण्या
हिरावल्याची ...

भोगतो आहे
हि सजा
म्हणून तो आजही
फाटकी छत्रीच नेतो
खूपच पाउस आला कि
वळचणीला जातो
भिजून आला कि
मला टाळतो...

सजेचे भांडवल
करू नये
ती शरीराचा
तळतळाट करून मेली
तिचा नासला गर्भ
ओट्यात टाकून गेली
आणि हि
प्रतारणेच्या आगीत
होरपळत आहे
व्याभिचाराचे आसूड
अंगावर फोडून
चामडीची लक्तरे
लोंबकळवत
माझ्याकडे निराशेने
बघत.............

रोज भोगतोय
सजा
ती डोळ्यात प्राण
आणून वाट भिजवते
पण
मदिर नासले नरडे
ओले होत राहते
तिच्या पदरातून पूर
वाहतो
पण भोग पाठ
सोडत नाहीत.......

होय हि
गेल्या शंभर जन्मांची
सजाच आहे
सगळ्यांची जेवणे
कावळ्याला घालायची,
जुन्या जीर्ण आठवणी
कुरवाळत जगायची
तिने रक्ताचे पाणी करून
जगवलेल्या तुळशीला
मरताना बघायची,
त्याने सोडलेल्या इस्टेटीवर
भुजंग म्हणून बसायची ...

शंभर मृत्यदंड
शंभर योनी
शंभर भोग
शंभरी भरेपर्यंत
भोगायचे ...

होय सजाच आहे ही
मृत्युदंड दिलेल्या कैद्याला
मृत्यूची वाट बघण्याची..........

विजयकुमार.........
०४ / ०९/ २०१०, मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: