शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ५

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:38

आजोबांच्या खिशातले पॉकेटवॉच, राजाभाई टॉवरवरचे मोठे घड्याळ, जेम्स बाँडच्या घड्याळासारखे रोलेक्सचे घड्याळ. ही काही उदाहरणे आहेत आजच्या झब्बूच्या विषयाची. चला तर खेळूया घड्याळांच्या फोटोचा झब्बू.

हे लक्षात ठेवा:
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - घड्याळे

कोणत्याही प्रकारचे वेळ मोजण्याचे साधन इथे अपेक्षित आहे. एखादे सुंदर पॉकेटवॉच किंवा एखाद्या इमारतीवरचे घड्याळ अशासारखे काही.

201_MB_Zabbu_Watches_Poster.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Custom House Tower, Boston
DSC01424_0.JPG

घड्याळाचा हा एकमेव फोटो आहे माझ्याकडे. या झब्बूला मी फक्त प्रेक्षक Happy

अनकॅनी घरातल घड्याळ काय क्युट आहे.
प्रसिक Lol
आता माझ्याकडे काही नाहीए वाट्ट. आठवतच नाहीए घड्याळाचा फोटो. असला तर रात्रि टाकेन.

.

आता माझ्याकडे काही नाहीए वाट्ट>>>> सावली शोधा म्हणजे सापडेल.. हे घड्याळ नाही म्हणू शकत पण वेळ जरूर दाखवतय.
watch_0.jpg

माझा पहिलाच पण जबरदस्त झब्बू.
हा रिओ दि जानेरो (उच्चार हिओ दे हेनेरो), ब्राझिल येथील घड्याळ महोत्सव याने के ३१ डि. नाईट.
आम्ही सहकुटुंब सह परिवार (बच्चे कंपनी सह,(त्यांनाच जास्ती मजा आली))
वेळ ००.०५
ता. १ जा. २००९
स्थळ : कोपाकबाना बीच , ब्राझिल.
rio 31st watch.jpg

तळ टीपा : १. या चित्रात आम्ही नाही. २. तरी घड्याळारच लक्ष केंद्रीत करावे. Happy

विक्रम, राग मानू नका. वरच्या छायाचित्रात घड्याळापेक्षा बाकीच्याच गोष्टी जास्त दिसतायत. तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये वेळ लिहिली आहेत म्हणून त्या चित्रातली ती वेळ आहे हे लक्षात येतंय.

आडो - घड्याळाबरोबरच घड्याळाचा आसमंतावर होणारा परिणाम दाखवायचा प्रयत्न होता. मला अस वाटल की या फोटोत घडाळ्यातल्या वेळेमुळे होणारा आनंद आणि जल्लोश छान टिपला गेलाय.
तुमच्यासाठी हा दुसरा फोटो.watch.jpg

Pages