![rava idli sambar chutney](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/10/25/rava-Idli%20sambar%20chutney.jpg)
रवा २ वाट्या (उपम्यासाठी वापरतो तो गव्हाचा मध्यम जाडसर रवा),
उडीद डाळ १ वाटी,
तेल १ छोटा चमचा,
मिठ चविप्रमाणे,
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर),
२ वाट्या रवा (उपम्यासाठी वापरतो तो जाडसर रवा) बंद डब्यात ठेऊन कुकरमध्ये कोरडाच वाफवून घ्यायचा. ( मी वरणभाताच कुकर लावतानाच रव्याचा डबा पण ठेवते)
१ वाटी उडद्डाळ साधारण चार तास भिजवून वाटून घ्यायची. पाणी फार वापरायचे नाही.
रवा थोडा थंड झाल्यावर पाण्याने धूउन घेउन वाटलेल्या डाळीत मिक्स करायचा.
रवा वाफवून नंतर धूउन घेतल्याने हलका होतो.
चविपुरते मिठ घालून बॅटर रात्रभर (किंवा सहा सात तास) ठेउन द्यायचे. मस्त पिठ फुगते.
इडल्या करण्याआधी एक चमचा तेल आणि एक चमचा पाणी मिक्स करून ते त्या बॅटर मध्ये घालून इडल्या बनवायच्या. मस्त स्पॉन्जी जाळिदार इडल्या होतात.
इडलीचे पिठ चांगले येण्यासाठी ...
उडिद डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचे नाही.
पण डाळ भिजवलेले पाणी फेकुन न देता रवा मिक्स करून बॅटर तयार करताना वापरायचे. म्हणजे पिठ छान येते ( फुगते/ आंबते). पिठ पळीवाढे असावे. म्हणजे सहा सात तासानी चांगले फुगते.
वाटीभर भात( उरलाच असेल आणि संपवायचा असेल तर) वाटून ह्या पिठात मिक्स केला तरी चालतो.
काहीवेळा थंडीमुळे पिठ आले नाही किंवा इडल्या लवकर बनवायच्या असतिल तर चिमुट्भर सोडा चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल मिक्स करून पिठात घालायचे.
ज्यांना तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डॅफो,फोटो ?
डॅफो,फोटो ?
फोटो टाकते लवकरच
फोटो टाकते लवकरच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कृती इथे टाकल्याद्दल धन्यवाद
कृती इथे टाकल्याद्दल धन्यवाद
करुन बघेन आता.
ट्राईड आणि टेस्टेड
ट्राईड आणि टेस्टेड रेसिपी..एकदम मस्त!!
डॅफो धन्यवाद. नक्की करून
डॅफो
धन्यवाद. नक्की करून बघणार.
छान वाटतेय रेसिपी. करुन बघेन
छान वाटतेय रेसिपी. करुन बघेन एकदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लवक्क्कर फोटो टाकला नै ?
लवक्क्कर फोटो टाकला नै ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कित्ती मस्त दिसतात त्या
कित्ती मस्त दिसतात त्या इडल्या!! लगेच उचलून तोंडात टाकाविशी वाटते...
मस्त फोटो:-) इडली रवा हा
मस्त फोटो:-)
इडली रवा हा तांदळापासुन बनतो
मस्त फोटो! एकदा करून बघेन
मस्त फोटो!
एकदा करून बघेन नक्की.
एक प्रश्न - तुम्ही लोकं रवा कसा धुता?
आहा! फोटोत सुद्धा कळतंय इडली
आहा! फोटोत सुद्धा कळतंय इडली एकदम लुसलुशीत, मस्त झालिये!
मस्तच, करुन बघण्यात येईल
मस्तच, करुन बघण्यात येईल
ईडली कृती मस्तच सोपी आहे. आता
ईडली कृती मस्तच सोपी आहे. आता सांबार आणि चटणी विषयी लिहा.
फोटो मस्त. मी कायम तांदूळ
फोटो मस्त.
मी कायम तांदूळ भिजत घालूनच इडल्या करते. गव्हाच्या रव्याने इडल्या कधी केल्या नाहीत.
धन्यवाद ! इडली रवा हा
धन्यवाद !
इडली रवा हा तांदळापासुन बनतो>>> :)अगदी बरोबर आश. पण मी इथे गव्हाचा रवा वापरला आहे. ज्यांना मधुमेह वगैरे कारणाने जास्त तांदळाचे पदार्थ वर्ज्य किंवा काही पथ्य असते अश्या लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे. ह्या इडली सोबत भरपूर भाज्या घातलेले सांबार आणि कमी खोबरे जास्त डाळ, कोथींबिर घातलेली चटणी केली म्हणजे एकदम हेल्दी फुल्ल मिल डाएट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजुडी >>> रवा वाफवलास की तो घट्ट होतो (ढिकळं बनतात ति मोकळी करण्यासाठी ) रव्यात पाणी टाकून क्षणभर थांबलीस की रवा तळाशी राहिल मग वरचे पाणी हळूच काढून टाक. भात लावताना तांदुळ धुतो तसेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
=)) मस्त आहेत! तेव्हा केल्यास
=)) मस्त आहेत! तेव्हा केल्यास नंतर आता केल्यास का एकदम?
मस्त आलेत फोटो. गव्हाचा रवा
मस्त आलेत फोटो. गव्हाचा रवा असूनही एकदम पांढर्याशुभ्र दिसत आहेत.
मस्त दिसतायत इडल्या. फार खटपट
मस्त दिसतायत इडल्या. फार खटपट नसल्याने करुन बघण्यात येतील.
हो डॅफो, मी खरंतर असाच धुते
हो डॅफो, मी खरंतर असाच धुते रवा, पण खाली बसला तरी पाण्याबरोबर बर्यापैकी वाहूनही जातो (सिंकमधे कण कण दिसतात
), म्हणून म्हटलं काही यशस्वी ट्रिक असली तर विचारावी.
या इडल्या करून बघणार नक्की.
३ वर्षानंतरही सुंदर दिसताहेत
३ वर्षानंतरही सुंदर दिसताहेत इडल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुनिधी छान दिसतायत.
सुनिधी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान दिसतायत.
व्वा!!! एकदम लुसलुशीत दिसतायत
व्वा!!! एकदम लुसलुशीत दिसतायत इडल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुनिधी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कसली मस्त रेसिपी आहे..आईला
कसली मस्त रेसिपी आहे..आईला त्वरित कळवली तिला मधुमेह असल्यामुळे तांदूळ चालत नाही.
व्वा! सही आहे रेसिपी. किती
व्वा! सही आहे रेसिपी. किती शुभ्र दिसतायेत इडल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा..सुंदर ,मऊ मऊ दिस्त आहेत..
वा..सुंदर ,मऊ मऊ दिस्त आहेत.. अश्या पद्धतीने कधीच करून पाहिलेल्या नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुनिधी..![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मस्त दिसताहेत इडल्या.
मस्त दिसताहेत इडल्या. गव्हाच्या रव्याच्या कधीच केल्या नव्हत्या. आता नक्की करून बघेन.
शांकली आणि
शांकली आणि बिल्वा+१.
गव्हाच्या रव्याच्या इतक्या छान शुभ्र इडल्या होत असतील असे वाटले नव्हते.
थँक्स डॅफो. नक्की करणार.
मस्त रेसिपी आहे...
मस्त रेसिपी आहे...
धन्यवाद ! ३ वर्षानंतरही
धन्यवाद !
३ वर्षानंतरही सुंदर दिसताहेत इडल्या >>>> सुनिधी अगं मायबोली समृद्ध वगैरे वगैरे होतेय ना त्यामुळे ....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages