रवा इडली

Submitted by डॅफोडिल्स on 1 September, 2010 - 09:38
rava idli sambar chutney
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा २ वाट्या (उपम्यासाठी वापरतो तो गव्हाचा मध्यम जाडसर रवा),
उडीद डाळ १ वाटी,
तेल १ छोटा चमचा,
मिठ चविप्रमाणे,
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर),

क्रमवार पाककृती: 

२ वाट्या रवा (उपम्यासाठी वापरतो तो जाडसर रवा) बंद डब्यात ठेऊन कुकरमध्ये कोरडाच वाफवून घ्यायचा. ( मी वरणभाताच कुकर लावतानाच रव्याचा डबा पण ठेवते)

१ वाटी उडद्डाळ साधारण चार तास भिजवून वाटून घ्यायची. पाणी फार वापरायचे नाही.

रवा थोडा थंड झाल्यावर पाण्याने धूउन घेउन वाटलेल्या डाळीत मिक्स करायचा.
रवा वाफवून नंतर धूउन घेतल्याने हलका होतो.

चविपुरते मिठ घालून बॅटर रात्रभर (किंवा सहा सात तास) ठेउन द्यायचे. मस्त पिठ फुगते.
इडल्या करण्याआधी एक चमचा तेल आणि एक चमचा पाणी मिक्स करून ते त्या बॅटर मध्ये घालून इडल्या बनवायच्या. मस्त स्पॉन्जी जाळिदार इडल्या होतात.

idli.jpg

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात २२-२४ इडल्या होतात.
अधिक टिपा: 

इडलीचे पिठ चांगले येण्यासाठी ...

उडिद डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचे नाही.
पण डाळ भिजवलेले पाणी फेकुन न देता रवा मिक्स करून बॅटर तयार करताना वापरायचे. म्हणजे पिठ छान येते ( फुगते/ आंबते). पिठ पळीवाढे असावे. म्हणजे सहा सात तासानी चांगले फुगते.

वाटीभर भात( उरलाच असेल आणि संपवायचा असेल तर) वाटून ह्या पिठात मिक्स केला तरी चालतो.

काहीवेळा थंडीमुळे पिठ आले नाही किंवा इडल्या लवकर बनवायच्या असतिल तर चिमुट्भर सोडा चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल मिक्स करून पिठात घालायचे.

ज्यांना तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

माहितीचा स्रोत: 
मावशी :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्त.

मी कायम तांदूळ भिजत घालूनच इडल्या करते. गव्हाच्या रव्याने इडल्या कधी केल्या नाहीत.

धन्यवाद !

इडली रवा हा तांदळापासुन बनतो>>> :)अगदी बरोबर आश. पण मी इथे गव्हाचा रवा वापरला आहे. ज्यांना मधुमेह वगैरे कारणाने जास्त तांदळाचे पदार्थ वर्ज्य किंवा काही पथ्य असते अश्या लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे. ह्या इडली सोबत भरपूर भाज्या घातलेले सांबार आणि कमी खोबरे जास्त डाळ, कोथींबिर घातलेली चटणी केली म्हणजे एकदम हेल्दी फुल्ल मिल डाएट. Happy

मंजुडी >>> रवा वाफवलास की तो घट्ट होतो (ढिकळं बनतात ति मोकळी करण्यासाठी ) रव्यात पाणी टाकून क्षणभर थांबलीस की रवा तळाशी राहिल मग वरचे पाणी हळूच काढून टाक. भात लावताना तांदुळ धुतो तसेच. Happy

हो डॅफो, मी खरंतर असाच धुते रवा, पण खाली बसला तरी पाण्याबरोबर बर्‍यापैकी वाहूनही जातो (सिंकमधे कण कण दिसतात Wink ), म्हणून म्हटलं काही यशस्वी ट्रिक असली तर विचारावी.

या इडल्या करून बघणार नक्की.

मस्त दिसताहेत इडल्या. गव्हाच्या रव्याच्या कधीच केल्या नव्हत्या. आता नक्की करून बघेन.

शांकली आणि बिल्वा+१.
गव्हाच्या रव्याच्या इतक्या छान शुभ्र इडल्या होत असतील असे वाटले नव्हते.
थँक्स डॅफो. नक्की करणार.

धन्यवाद !

३ वर्षानंतरही सुंदर दिसताहेत इडल्या >>>> सुनिधी अगं मायबोली समृद्ध वगैरे वगैरे होतेय ना त्यामुळे .... Wink

Pages