वेदनेचा चेहरा

Submitted by विजयकुमार on 1 September, 2010 - 08:01

अंतरीच्या वेदना जाणल्याचे
भास निर्माण करता येतात,
वेदना बनून,
वेदना वाहता येत नाहीत !

काटा रुतण्याइतकं
दुख सहज असतं तर
जगात फुलांपेक्षा
काट्यानीच स्वागतसंमारंभ
सजले असते !

पाठीला झाडू बांधून
गळ्यात मडके घेऊन
चालण्यातली आवहेलना
कुणालाच कळु शकत नाही !
मग दावा का करायचा
वेदना जाणविल्याचा ?

अत्याचाराच्या सगळ्याच
बाजू आत्याचाराइतक्याच
काळ्या असतात,
गौरत्वाला त्या रुतणार्‍या
फुटलेल्या काचेसम भासतात !
काळा गोरा भेदभाव करत मग
आम्ही काळ्या विठोबाला का कवटाळतो ?

मग कुणी हा दावा का
करायचा,
वेदना कळल्याचा ?
त्या जाणवाव्या लागतात
त्यांचे कधीच प्रदर्शन नसते,
बघे म्हणून तुम्हाला तसे वाटतही असेल !

माफ करा !
कडक इस्रीतील कपड्याना
उघडे स्तनही अश्लील वाटतात ?
मात्र
कमरेखाली झाकायला
काही तरी आहे !
ह्यातल सुख तुम्हाला कळणारच नाही !

निर्विकार चेहर्‍याने तुम्हास
वेदना दिसतीलही,
परंतु तिला उपभोगण्यासाठी
तुम्हास वेदनेचा चेहरा व्हावे लागेल !
तो काळा असतो एवढे मात्र लक्षात ठेवा !

विजयकुमार ...............

०९/०९/२००९, मुंबई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

>>> निर्विकार चेहर्‍याने तुम्हास
हे 'निर्विकार चेहर्‍याच्या तुम्हास' हवे होते काय?

मग कुणी हा दावा का
करायचा,
वेदना कळल्याचा ?
त्या जाणवाव्या लागतात
त्यांचे कधीच प्रदर्शन नसते,
बघे म्हणून तुम्हाला तसे वाटतही असेल !
>>>>>>>

!!!!!!!!!

!!!!!

आभार

!!

आभार