प्राचीन काळविहीरीच्या तळाशी
निळ्याशार पाण्यात
आठवांच्या शेवाळ्याखाली
जाणीवांचे मीन तडफत असताना,
तू आरसा होऊन
जीवनदायी प्रकाशाचे कवडसे
पोहचवू नकोस !
कण कण जळुन आता
फक्त राख उरली आहे,
कुठेतरी ठिणग्या पुरल्यात
त्या उकरुन तू स्फुल्लिंग
चेतवु नकोस,
थोडी धग जपून ठेव
ह्या नश्वर शरीरासाठी
लगेच पेट घेईल
हे प्राण त्यागले शरीर
कात टाकल्या सर्पानी वेढलेले !
अंधार्या माजघरात हातानी
डोळे गच्च दाबून तू
पिशाश्चयोनीतील भयरंगाना जागे
केले असतानाच,
हळूच हात काढून, मिठीत घेऊन
गळ्यातील फास सैल केलास,
आज हे शक्य नाही !
फासांचे अजगर बनून
मला विळखा घालताहेत,
श्वास कोंडून, आत्म्याला शरीरापासून
वेगळे करताहेत,
तू फक्त शरीर सांभाळ,
आत्मा अविनाशी आहे,
त्याला पुन:प्रवेशासाठी वाट मोकळी ठेव !
सांजकळ्या मिटल्या तरीही
जिवघेणे सुगंध तसेच आहेत,
नव्या प्रभातकळ्याही त्याच सुगंधाचा
प्रतिपाळ करतील !
तू मात्र त्या हरविलेल्या संध्याकाळच्या
रंगछटा सांभाळ
त्याच फुलांना रंग देतात,
शरीर पांढरेफटक पडले असले तरी
आत्मा वावरतोय हे विसरू नकोस !
एकच भीती आहे
माझा रंग चोरून गंधाळलेल्या कळ्या
तुला धुंद करतील
माझे कलेवर पानगळीने झाकतील
मग मात्र
माझा आत्मा तुझ्या आणि माझ्या
शरीरसुगंधासाठी भटकत राहील !
विजयकुमार............................
27 / 01 / 2009
मस्त
मस्त
आवडलीही आणि नाहीही....
आवडलीही आणि नाहीही.... वाचनानंतर ठाम भुमिका ठरवू शकलो नाही. शब्दबंबाळ वाटली पण दर्जेदारही आहे. शुभेच्छा!!!
ह बां ना अनुमोदन... पण तरीही
ह बां ना अनुमोदन... पण तरीही खुप खुप आवडली...!!!!!!!!!!!!!!!!!!
आभार
आभार
अप्रतिम
अप्रतिम आहे......................