खात्रीत स्वातंत्र्य

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...'

'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी

एकुणच आजच्या जगात आपण खात्री शोधत असतो.पण हळुहळु जगात खात्रीदायक काहिच राहिलेल नाहिये. पुर्वी लोकांना पगार मिळत असे तोही खात्रीदायक्,त्या पगारात काय काय मिळेल हेही खात्रीदायक असे. निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल याचीही खात्री असेच. पण आता तसे नाही.सर्व गोष्टींच्या किमती वाढतच आहेत आणि काहीकाही तज्ञ म्हणतात की त्या वाढणारच आहेत.१० वर्षापुर्वी जो पगार चांगला मानला जायचा तो आता कमी वाटू लागलाय.कम्पन्यांमधे पेन्शनही नसत्.आणि चिदंबरमबाबा तर म्हणत आहेत की सरकारी नोकरीवाल्यांच पेन्शनही कधी ना कधी बंद होणार आहे.घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत्.अजुन १०-१५ वर्षांनी पुण्या-मुंबईत घर घेण तरी शक्य होईल का नाही कोण जाणे.अर्थव्यवस्था वाढतेय्.डॉलर कमी होतोय तेंव्हा डॉलर अजुन कमी झाल्यास २०लाख लोक बेकार होतील असेही मंत्री म्हणत आहेत्.अर्थव्यवस्था वाढल्याने अजुन १०-१५ वर्षांनी म्हणे आयटी कम्पन्या भारतातुन पळ काढतील कारण भारतातला रोजगार त्यांना परवडणार नाही.गल्फ देशांमधे तसच झाल होत म्हणे. व्यवसाय करत असाल तर त्यातही फारशी खात्री नाही.उद्या मल्टीनॅशनल कम्पन्या कुठल्या क्षेत्रात घुसतील सांगता येत नाही.आणि त्या जिथे घुसतील तिथे छोट्या-मोठ्या उद्योजकांना पैशाच्या जोरावर संपवतील.ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगाच्या तापमानात बदल होत आहे.तज्ञ म्हणत आहेत की आपल्याला आपला ग्रह वाचवायला काहीच वर्षे राहीलेली आहेत.आत्ताच काही केले नाही तर विनाश अटळ आहे.सार्‍या जगाला केवळ सहा ते आठ आठवडे पुरेल इतकेच खाद्यान्न भूतलावर शिल्लक आहे. जगाच्या राजकारणात समस्या कमी होण्याऐवजी क्लिष्ट होत आहेत.एकुणच परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की कशाचीही खात्री नाही.

मग कशाचीच खात्री नाही तर स्वातंत्र्य कसल्???इथे स्वातंत्र्य म्हणजे काहीही खा-प्या,कसेही वागा,काहीही विचार करा अशा अर्थानी नाहीये. अथवा पर्यायी शब्द सापडला नाहीये म्हणा(कुणाला माहीत असल्यास कळवावा).

पण या जगात खात्रीदायक काहीच नाही हाच तर या जगाचा नियम आहे.उद्या काय होईल हे सांगता येण कठीण आहे.मग या खात्रीत स्वातंत्र्य शोधायच कशाला??या जगात खात्रीदायक काहीही नाही , हे जाणुन त्यातच स्वातंत्र्य मानणाराच खरा हुशार म्हणावा लागेल.थोडक्यात म्हणजे उद्या काय होईल याचा विचार करण्यात आज वाया घालवुन उपयोग नाही. ते म्हणतात ना की 'भुतकाळ हा बाउंस झालेला चेक आहे,भविष्यकाळ हा पोस्ट्डेटेड चेक आहे आणि फक्त वर्तमानकाळ हीच तुमच्याकडे असलेली रोख रक्कम आहे जिचा तुम्हाला काहीतरी उपयोग आहे'.उद्या काय होईल याचा फार विचार केला की टेन्शन येत्.मुळात टेन्शन म्हणजेच आज सोडुन उद्याचा विचार करण आहे.anxiety म्हणजे वर्तमानात राहुन भविष्यात रहाण आहे.काहीकाहींच्या मते अशा परिस्थितीत कामं चांगली होतात पण मला वाटत की चिंतामुक्त वातावरणात होणारे काम सर्वोत्कृष्ठ असते.कारण टेन्शनमधे केलेले काम हे फक्त जितकी गरज आहे तितकेच असते.शेवटी चिंता हीही एक प्रकारची भितीच असते.भितीमधे स्वातंत्र्य नसतेच.त्यामुळे आज ,आत्ता मधे जगण्याचा प्रयत्न करणेच सर्वोत्तम.

प्रकार: 

चिन्या,
सही,
आधी भविष्याचे एकदम विदारक चित्र तयार करायचे आणी मग वरुन सान्गायचे वर्तमानात जगा म्हणून, Happy
असो पण फारच छान लिहीले आहेस,
टाटा.

धन्यवाद आयटे आणि संदीप. अहो लेख तितकासा जमला नाहीये भविष्यातील विदारक चित्रामुळेच वर्तमानात जगायला सांगितलय.

नाहि जमला हा लेख, येकाच वेळी अनेक प्रश्नाना हात घालयचा प्रयत्न केलायस. Inflation हा चिंतेचा विषय असला तरी सरसकट inflashion वाईट असा त्याचा अर्थ होतं नाही. जर वाढत्या क्रयशक्ती मूळे इनफ्लेशन (मॉडरेशन मधे) तर ते चांगले मानले जाते. डॉलर खर तर गेले काही दिवस स्ट्राँग होतोय. तरीही रुपया ऍप्रिशीएट झाल्याने आपल्या एक्स्पोर्ट प्रधान उद्योगावर परिणाम होईल पण त्याच बरोबर इम्पोर्ट स्वस्त होइल, आपली डॉलर मधली कर्ज स्वस्त होतील. याच कारणामुळे रिझर्व बँक यात फारसा हस्तक्षेप करत नाही.
राहिता राहिला प्रश्न पेंशनचा. पेंशन देण्याकरता अप्रत्यक्षपणे तुमच्या पगारातलाच पैसा जातो त्यामुळे तुम्ही स्वतः ती तरतुद करणे केव्हाही चांगले त्यात जास्त ऑप्शन्स असतील.
शिक्षण, त्यानंतर नोकरी ला चिकटणं आणी रिटायरमेंट नंतर पेंशन ही सुरक्षीततेची व्याख्या नाहि होऊ शकत तर डोळसपणे याची तरतुद करायला पाहिजे. अगदी नंदन निलकेणी च वाक्य बघशील तर त्यांनीही शंभर वर्षाची तर्तुद करायचं म्हटलय . जर पंचविस वर्षानी येक पिढी या हिशेबाने त्यांना चार पिढ्यांची तरतुद कराय्चीय मग आपण फक्त पेंशन पर्यंत का थांबायचे? Happy

are he asa kaay disatay????kaahi ghol aahe kaa???

barobar aahe ajai.mala jara lihaayacha vegala hota pan titakasa jamala naahi.

ajai,ani bhausaheb,pratikriyesaathi dhanyavaad

चिन्या, माझ्या अल्पबुद्धिला लेख काहि झेपला नाही. पण पहिला परिच्छेद मात्र छान. जर भविष्य विदारक असेल तर मग आजच मनासारखे जगा असे काहि आहे का? आणि आपले भविष्य विदारक असेल तर ती आपल्याच वर्तमान काळातिल पापाची फळे असतील ना? मग आजच भविष्याची का़ळजी करुन भविष्याची तरतुद करावी म्हणजे उद्याचि खात्री मिळेल, हो ना?
खरेतर चिंतामुक्त वातावरणात काम हि कल्पनाच थोडी स्वपनवत वाटतेय. असो, पण एका जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातलास ते बरे केलेस.

नितिन दिगुले ,सोडुन द्या.फारस महत्वाच नाहीये.मला अस म्हणायच आहे की उद्या तर संकटमयच असणार आहे ना मग आज कशाला त्याच्या भितीत राहुन बर्बाद करा??माझ म्हणन अस आहे की आज जितक होइल तितक काम प्रामाणिकपणे ,लक्ष देउन करा पण फार टेन्शन घेउन करु नका. त्याचे अनेक तोटे आहेत. स्ट्रेसमुळे होणार्‍या आजारांवर पुन्हा कधीतरी लिहिन्.उद्याची खात्री मिळणार नाहीये अस मला वाटत.
चिंतामुक्त काम जरा अवघड आहे पण तसे काम केल्यास ते चिंताग्रस्त कामाहुन खुप चांगले होते. ए.पी.जे.अब्दुल कलामही तेच सांगतात की कुठलेही काम चिंतामुक्त मनाने केल्यास त्या कामाला सर्वोत्तम देता येते.अर्थातच हे बर्‍याचदा अवघड आहे.मलाही हे नेहमी जमतेच असे नाही(मुख्यत्वे परिक्षेच्या काळात जमत नाही)
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद

चिन्मय, लेखाने मध्यंतरी वेगळेच वळण घेतले. सुरवात खुपच छान झाली. माझ्या मते खात्री ही पुर्वीही नव्हती (जरी तु पहिल्या काही वाक्यात तसे लिहिले आहे) आताही नाही व पुढेही नसणार. नैसर्गिक संकटे, आपल्याकडुन झालेल्या चुका इ. कारणांमुळे खात्रीची काहीच खात्री नसते. खात्रीची तमा न बाळगणारेच खरे स्वातंत्र्य उपभोगतात. असो, एका वेगळ्या विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन.

धन्यवाद किशोरजी!!!
**खात्रीची काहीच खात्री नसते. खात्रीची तमा न बाळगणारेच खरे स्वातंत्र्य उपभोगत**
बरोबर आहे हेच मला सांगायचे होते.

पुर्वीही खात्री नव्हती पण relatively परिस्थिती बरी होती असे वाटते.