Submitted by विजयकुमार on 27 August, 2010 - 08:41
संयमवेशीवरील लावण्यतडागात,
कौमार्यकळ्याना
वासनेचे स्थलांतरीत पक्षी
जेव्हा हुंगायला लागले
तेव्हा तू
आससक्तीच्या वैराग्य जलचक्रात
स्वप्न त्यागल्या मीनांना
धुंडाळत होतास !
स्थलांतरीत पक्ष्यानी
कळ्यांचे फूल केल्यानंतरही
तू वाट चुकलेल्या स्वप्नमीनांचे माग
सोडले नाहीस,
तळे गोठले,
पक्षी मार्गस्थ जाहाले तरी
तू तसाच तळ्याकाठी
निशब्द राहिलास
का ? कशासाठी ?
कळफुललेल्या पाकळ्यानी
गोठिव तळमंच
फुलारून गेला तरी
तुझी वैराग्यजाळी गोठणतळ्याखाली
तशीच विहरत होती ,
गोठल्या तळ्याबरोबर तुही
कसा गोठलास ?
ह्या वसंतात बलात्कारी
पक्ष्यानी तडागच त्यागला,
कळ्यान् शिवाय तडागही
भरलाय,
तू मात्र
जाळे तसेच ठेउन तळ्याकाठी
विसावलास
स्वप्नत्यागल्या मिनांनी
ना जाळे धरले
ना तू वैराग्य त्यागले
तळे विरक्ताप्रमाणे भरतच आहे !
विजयकुमार.................................
13 / 01 / 2009
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चालायचंच मालक... असं निशब्द
चालायचंच मालक...
असं निशब्द राहणं परवडत नाही कधीकधी.. पण पर्याय नसतोच ना तेव्हातरी!
एकदम भन्नाट, उत्कृष्ट... आवडेश!!!!!!!!!!
वेगळीच अनुभूती दिलीत या
वेगळीच अनुभूती दिलीत या कवितेने
सुंदर! अतिशय सुंदर! अभिनंदन!
सुंदर! अतिशय सुंदर! अभिनंदन!
मुद्देसूद, खरोखर सुंदर!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
आभार !!!
आभार !!!
!!!!!!!!!
!!!!!!!!!