न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कुठल्या कुठल्या लेखकांबद्दल मी 'चांगलच' बोललं पाहिजे त्याची यादी काढून ठेवा.. >
उगाच लेखक नि कवि यांच्याबद्दल चर्चा करून आपआपसात भांडणे कशाला?

टण्या, तुम्हाला कवि, लेखक यांच्याबद्दल बोलायचे असेल तर माझ्याशी वाटेल तेव्हढा वेळ, वाटेल ते बोला. मला कुणि लेखक माहित नाहीत, कवि तर माहित असणे दूरच. तर त्यांना चांगले, वाईट, मध्यम असे काहीहि बोललात तरी मी 'हो ना, अगदी बरोब्बर, मलाहि असेच वाटते,' असेच म्हणीन. मग आपण पुनः एकदा बीअर नि चिप्स चा समाचार घेऊ.

<सांस्कृतिक कार्यक्रम कोण आणि काय करणार ?>

म्हणजे कसला कार्यक्रम? जुनी भारतीय संस्कृति, नवी भारतीय संस्कृति, अमेरिकन संस्कृति, अमेरिकन महाराष्ट्रियनांची संस्कृति की नक्की कुठली?

म्हणजे श्लोक, सुभाषिते, की छैय्यां छैय्यां, मौज्जा हि मौज्जा, की पियानो की उ.उ. वि. व 'वाजले की बारा' गाणे?

लेटेस्ट लिस्ट काय झाली?
मृण कुठे लॅन्ड होणार आहे?
बुवा, बसचं काय झालं?

मेनू काय फायनल झाला? कोण काय आणणार आहे?
ड्रेसकोड काय ठरवून पाळायचा नाहीये?

ही यादी बरोबर नसेल तर अपडेट करा :

स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१)
सिंडी (१)
वैद्यबुवा (१)
मैत्रेयी (१)
देसाई (१)
झक्की (१)
भाई (१)
पन्ना (१)
फचिन (१)
नात्या (१)
लालू (अनिश्चित)
रूनि (अनिश्चित)
मृण्मयी (अनिश्चित)
केदार (अनिश्चित)

एकूण : ११ निश्चित, ४ अनिश्चित.

उद्या चौकशी करुन सोमवार- मंगळवार पर्यंत फायनल करुन टाकेन. बारातून येणार्‍यांना थोडा वेळ मिळेल म्हणुन लगेच बुक नाही केली.

नात्या येणार आहे ना ?
अमॄता, किरण , असामी यांचं काही ठरतंय का ?

कॉर्न , भोपळी मिरच्या, ब्रुस्केटा, अस्पॅरॅगस, पनीर, चिकन , श्रिंप, चालत असल्यास बार्बेक्यू रिब्स, मुलांकरता हॉटडॉग्ज, नंतर ग्रिल्ड पायनापल अन आइसक्रीम. शिवाय भेळ, चिप्स-डिप्स हा होता न मेनू.

हे सगळं दिवसभरासाठी पुरणार नाही. मै, भाकरी आण. बाई, ह्यावेळी अंबाडी नको मसाले भात चालेल. सायो, तुझ्या हातची पनीत माखनी चालेल. त्याबरोबर भाकरी चालणार नाही पोळ्या हव्यातच. झक्कींसाठी शेपू आणा कुणी तरी. बाकी नॉन-व्हेज काही नसलं तरी चालेल. फार ताण पडतो करणार्‍याला.

Proud

७ पॅसेंजर : ७९.९९ पर डे , २०० मैल फ्री (३९ सेंट पर माईल)
८ पॅसेंजर: ११९.९९
१२ पॅसेंजर : १४९.९९
१४ पॅसेंजर : १६९.९९

बारातून सध्या ५ जणं निश्चित आणि २ जणं अनिश्चित आहेत ना? कुठली करु बुक?

बारातून येणार्‍या लोकांची यादी
निश्चित: बुवा, मै, स्वाती, झक्की, भाई, पन्ना
अनिश्चितः सायो, देसाई

आमच्या पार्सिपेनीत 'मिर्च मसाला'कडे चिकन बिर्याणी मस्त मिळते. आणू का? (मला ताण पडणार नाही. :P)
शोनू, बार्बेक्यू वेदर नसेल तर बॅकअप प्लॅन काय? (बिर्याणी कुठल्याही वेदरला आणि मेन्यूला चालेल. :P)

मेधा, आमचं अनिश्चित आहे. निघायचा दिवस जवळ असेल म्हणुन तेव्हाच ठरवु येता येइल कि नाही ते. Happy

चिकन बिर्याणी नको व्हेज बिर्याणी आणा. करणार्‍याला ताण नको>>>> आणि मरणार्‍यालाही ताण नको. Proud
मी कधीपर्यंत फायनल केलं तर चालू शकेल?

सायो, मला केंव्हाही चालेल. बुवांचं माहित नाही .
मसाले भात अन व्हेज बिर्याणी - नको नको . स्वाती चिकन बिर्याणी आणणार असेल मसाले भात कोणीतरी आणा. किंवा मी बिसिबेळे भात करीन.

बॅकअप प्लान मधे अचारी चिकन किंवा कोल्हापुरी चिकन, कढी गोळे, पोळ्या , एखादी भाजी , आमटी/ वरण, कोशिंबीर असं करता येईल.

सध्या तरी गाड्या उपलब्ध आहेत सगळ्याच पण जितका उशीर होईल तसे ऑप्शन्स कमी कमी होत जातील. येत्या सोमवर पर्यंत लॉक ईन करुन टाका. बारातून नाही तरी सायो आणि देसाईच राहिले आहेत त्यामुळे सात पॅसेंजर की आठ पॅसेंजर हाच प्रश्न राहणार. अर्थात अजून कोणी नवीन अ‍ॅड झाले तर माहित नाही. असो, लवकरात लवकर कळवा.
सोमवार, दिनांक ६ सप्टेंबर बशीत शिट बुक करायची मरणरेषा!!!

मी नक्की बशीतून जाणार. सकाळी लवकर उठून जायचे असेल तर उरलेली झोप नि येताना पण थोडी झोप घ्यावी म्हणतो. तेव्हढाच इतरांना त्रास कमी!!

पन्ना, तुम्ही म्हणे आमच्या जवळपास रहायला आलात. नक्की कुठे?

असाम्या, वाचल्या पुस्तकांना जागून ये Happy वाटल्यास मी टच्याआलेंच्या (अगदीच म्हणत असशील तर वपुंच्या पुस्तकातलेसुद्धा पाठ करेन हो) पुस्तकातला एखादा उतारा पाठ करुन येईन..

तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक - टण्या

देसाई, सायो, खरच जमवा यायचं. मेंब्रं नसले की बोअर होतं! Sad
टणू, टेणेसीतून फिली ला कुठल्या एअरलाईननी जाणार?

स्वाती_आंबोळे (१)
टण्या (१)
सिंडी (१)
वैद्यबुवा (१)
मैत्रेयी (१)
विकु(१)
झक्की (१)
भाई (१)
पन्ना (१)
फचिन (१)
नात्या (१)
मृण्मयी (१)
लालू (अनिश्चित)
रूनि (अनिश्चित)
केदार (अनिश्चित)
असामी (अनिश्चित)
सायो (अनिश्चित)
चमन (अनिश्चित)

एकूण : १२ निश्चित, ६ अनिश्चित.

देसायांचा निषेध. Angry

मी डायरिक शोनुच्या गावची तिकिटं काढतेय. तेव्हा तुमच्या बशीतली माझी जागा दुसर्‍या कुणाला दिली, किंवा पिशव्या, गाठोडी ठेवायला वापरली तरी चालेल. Proud

लै झक्कास!!! विकु येणार म्हणजे बशीतून येणार ना?
तात्या, जमवच आता यायचं! तू आणि विकुंना मागचं सगळं शीट देऊन टाकू! निसता कल्ला!!! Proud

मी पण येणार आहे पण सध्यातरी अनिश्चितमध्येच नाव राहूदेत.
एक आठवडा आधी निश्चितीचं नक्की सांगेन.

मेनू झाला का फायनल? मी चिली चिकन किंवा तत्सम काहीतरी चायनीज पदार्थ आणू का ? बाकीच्यांच्या मेनु मधे राइस वगैरे असेल तर अर्थात.

Pages