Submitted by विजयकुमार on 24 August, 2010 - 02:27
धुक्यात माळलेला
संधीप्रकाश अन्
वाट पावसात
ओघळलेली
जुन्या वास्तूत
भयाण भूते
दडलेली !
जहरातुनी बनवती
उतारे जहराचे
मनात मेले साप
बहराचे,
रस्ता आडवुन
एक कात
पसरलेली !
चाहुल रात्रीची
अन् वेध
मद्यधुंद सहवासाचे
पसरलेले,
निरागस चेह-यात
नजर व्याकुळ
अडकलेली !
जगणे नव्हे
शाप पुर्वजन्मीचे
भोगतो,
कासावीस
चर्चची घंटा
घणघणते मनात
कोंडलेली !
जीर्ण वास्तूत
सरपटती सर्प
अघोरी वासनेचे,
पारधी माग
काढ़ती
हरणे माळरानी
चुकलेली !
विजयकुमार.........
०४.०९.२००९,मुंबई
हाफकिन संस्थेचे आवार
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पारधी माग काढ़ती हरणे
पारधी माग
काढ़ती
हरणे माळरानी
चुकलेली !>>>> ..!
कधीतरी असवस्थता तुमच्यावर
कधीतरी असवस्थता तुमच्यावर स्वार होतेच होते....