नवं काही खरडेपर्यंत....
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
20
नमस्कार मंडळी!
इथे लिहिताना किमान १० शब्दांचं बंधन आहे हे माहिती नव्हतं. झाले वाटतं१० !
नवं काही खरडेपर्यंत ह्या जुन्या लिंक्स......
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/110324.html?1149576006
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/114694.html?1155578556
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/116638.html?1158570190
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119225.html?1163672449
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/119944.html?1165686633
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/123064.html?1172074729
http://www.maayboli.com/hitguj/messages/75/124942.html?1177660423
विषय:
प्रकार:
शेअर करा
मृ,
मृ, अभिनंदन आणि नविन लिखाणासाठी शुभेच्छा!
मृण,
मृण, पुन्हा एकदा सगळ वाचुन काढल. कित्ती छान लिहितेस तू. एक तक्रार आहे, आताशा लिहित नाहीस तू. आता पटकन नवीन काहीतरी खरड
किती दिवस आम्ही जुन्यावरच समाधान मानायचे.
-प्रिन्सेस...
मृण्मयी,
मृण्मयी, पहिली लिंक वाचली. जेव्हा लिहिलंस तेव्हाही वाचलं होतंच. पण प्रतिसाद दिलाय की नाही काही आठवत नाही. रडगाणं तर नाहीच उलट वाचून तुझं खूप कौतुक वाटलं. परक्या देशात आल्या आल्या असं पूर्ण घर शेअर करणं काही सोप्प नाही. मी स्वतला तुझ्या जागी ठेवून विचार केला तर ते आजही जमेलसं वाटत नाही.
बाकीच्या लिंक्स वेळ मिळेल तशा परत वाचून काढेन.
नमस्कार
नमस्कार ,
खरेच खुप छान लिहिलेय. प्रत्येक व्यक्तिचित्रण वाचताना डोळ्यातुन पाणी आले . आता नविन लिखाणाची अगदी मनापासुन वाट बघत आहे.
आता लवकर
आता लवकर लिही पाहु
बी,
बी, धन्यवाद! तूच पहिला मला रंगीबेरंगीच्या ह्या पानाबद्दल शुभेच्छा देणारा!
पण तुझी पोस्ट पाहून खरंच पुन्हा काही तरी लिहिण्याचा हुरुप आला.
) मला व्यक्तीचित्रणं फार आवडतात. वाचायला आणि ल्याहायलापण! माणसातली माणुसकी, साधेपणा, भाबडेपणा जसा भावतो तसेच स्वभावातल्या खाचाखोचापण! नवं लिखाण नक्की सुरु करीन.
प्रिन्सेस, 'मी लिहिलेलं पुन्हा वाचून काढण्यासारखं आहे असं मला स्वतःलाच वाटलं नव्हतं!
सायो, 'आजही जमेलसं वाटत नाही'.. 'कसं राहिलो?' आता वाटतं, तेव्हाही वाटलं होतं, 'जमेल?'. पण खरं सांगु? वेळ आली की आपण सगळे थोड्या फार फरकानं निभाऊन नेतो. तु पण जपानमधे काढलेच नं दिवस? मला तर त्याचं जास्त कौतुक वाटतं.अमेरिकेत तर बरंच सोपं म्हणेन मी! त्या दिवसात स्वतःला (आणि आम्ही दोघं एकमेकांना) सारखं बजवत असायचो.. "ही पासिंग फेज आहे. कायमची अरेंजमेंट नाही!' (तीन विंग्रजी शब्द! झक्की तर नाहीत नं आजुबाजुला?)
आस, धन्यवाद! (तुम्ही बहुतेक पहिलून वाचताय!
चिन्नुताय, आपका हुक्म सर आंखोपर!
मॄण्मयी, अह
मॄण्मयी,
अहो ! खूपच छान लिहीतात तुम्ही, मी आज पहील्यांदाच सगळं वाचून काढलं !
असेच लिहीत रहा.
संदिप.
परत एकदा
परत एकदा चिकाको वाचून काढलं. पुन्हा एकदा तिच्या निर्णयाचा आनंद झाला. अगं तू नर्मदा का निर्मलाचं व्यक्तीचित्रण लिहिलं होतस त्याची लिंक कुठेय? मस्त जमलं होतं ते ही. वाचायला आवडेल पुन्हा.
संदीप,
संदीप, मनःपूर्वक धन्यवाद!
लिंक शोधते. मला पण पुन्हा वाचायचंय.
सायो, 'नर्मदा' सारखं अप्रतीम व्यक्तिचित्र 'दाद' खेरीज आणखी कोणी लिहु शकेल?
बाय द वे, चिकाको खुष आहे रिसर्च आणि नव्या मित्रात!
मॄण्मयी, आत
मॄण्मयी,
आता पहिला लेख वाचला, मस्त आहे. छान आहे तुझी सांगण्याची शैली.
आता एकेक लेख वाचून काढते, तू नवीन लिहून काढेपर्यंत.
लवकर लिही.
-अनिता
मॄण्मयी,
मॄण्मयी, आता 'तू' च म्हणते.
खुपच छान लिहीले आहे सगळेच. इतक्या अडचणींवर मात करून रहिलीस म्हणजे खरेच कौतुक वाटतं. आणि इथे लिहिल्यामुळे आम्हाला समजले लोक किती धीराचे असतात. नाही तर अडचण म्हणले की आमची नवर्याकडे कुरकुर सुरु :).
मृ. अग मस्त
मृ. अग मस्त लिहिलयस ग. आत्ताच पहिली लिंक वाचली. खरच खुप सोसलस. मला नसत जमल हे सगळ.
पण आताच तुझ फोटोत पाहिलेल सुरेख घर पहायला नक्की येणार मी.
सगळी
सगळी व्यक्तीचित्रण वाचुन काढली. खुप छान लिहिलयस, मला तर माहितच नव्हत तु लिहितेस ते. आता लिहु लाग बर नियमित.
सगळ लिखाण
सगळ लिखाण वाचलं.
लाल्या गँगच्या करामती आणि त्याच बाबात झालेल रुपांतर हे वाचताना खुप हसलो.
सहज आणि
सहज आणि सुंदर!!!! तुझं लिखाण वाचलं ना की मला हेच शब्द सुचतात

फार थोड्या लोकांना जमतं असं भिडणारं लिहायला...
पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत,
-रवीशा
इतकं छान लिहिलयं की एका
इतकं छान लिहिलयं की एका बैठकीत सगळं वाचुन काढलं.
'तरिही'
'चिकाको'
' अजब रसायन'
'लाल्याची गादी'
'मृदुला आणि मी'
'रंगसंगती'
लेखनशैली आवडली.
मृ हळू हळू वाचून काढीन
मृ हळू हळू वाचून काढीन सर्वच.. चित्रे बाई मनात उतरल्यात गं .. धन्स..
वा, मोठाच खजिना मिळाला. वाचते
वा, मोठाच खजिना मिळाला. वाचते आता एकेक.
सगळ्या लिंक्स वाचल्या. मस्त
सगळ्या लिंक्स वाचल्या. मस्त लिहिलयस
खरंच, लिहित रहा नेहमी.
आणि अगो ला स्पेशल धन्यवाद हे वर आणल्याबद्दल
मृ, सगळंच आज पहिल्यांदाच
मृ, सगळंच आज पहिल्यांदाच वाचलं. खूप मस्त लिहिलंय.
आजकाल का लिहित नाहीस तू काही?