अस्वच्छ राजकारण..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लाक्षागृहात शिजले तसे
खदखद शिजणारे,
पण पुर्णब्रम्ह नसून
संपूर्ण अमानुष असणारे

करपलेले अन्न बरे;
भ्रष्टाचाराचा दर्प पसरवून
नराधमांची भुक शमवणारे

अमर्याद सत्तेचे इंधन वापरून
विद्रोहाची भट्टी पेटवणारे,
समष्टीचे तारण करणारे नसून
मरुभुमी चेतवून टाकणारे

रक्ताच्या थारोळ्यात म्लान होऊन
चरित्रसंपन्न राहणारे;
धुतल्या तांदळासारखे नसून
समाजासाठी किड असणारे,
अस्वच्छ राजकारण!

- बी

विषय: 
प्रकार: