सुस्ती..
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
4
घड्याळात बाराचे ठोके
दिवे अजून न विझलेले
वाहणार्या रस्त्यावरचे
निऑन आकाशात पोचलेले
हे शहर दाटीवाटीने भरलेले
चोवीस तास व्यस्त-व्यापलेले
सर्द दुलईतील झोप सोडून
कागदांच्या ओझ्यानी वाकलेले
येईल हळूच जरा वेळानी
लगबगीची ती प्रभात रोजची
अन सुरू होईल वर्दळ पुन्हा
चेहर्याचेहर्यावर दिसेल सुस्ती!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
बी, एकदम
बी, एकदम साधी आहे कविता. पण "कागदांच्या बोजानी वाकलेले" याच्यात कागदांचा relevance कळला नाही.
कागदाच्या
कागदाच्या बोजानी... म्हणजे पैश्याच्या असे म्हणायचे आहे का?
बी,
बी, छोटेखानी साधी साधी कविता आवडली
कागदाच्या
कागदाच्या बोजा = कार्यालयीन कामं अस मला म्हणायचं आहे.