जनुकं ?
सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-
"ऐकलं का ?"
"ऐकते आहे. बोला !!"
"बदाम आहेत का घरात ?"
"आहेत. का ?"
"शिरा कर मग"
"बदामाचा शिरा ? आज काय विशेष ?"
"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे"
"हो !! जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही"
"म्हणून तर सांगतोय, शिरा कर"
मग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.
"घ्या तुमचा शिरा" आई बाबांच्या हातात शिर्याची बशी ठेवत म्हणते.
"एवढा ? कमी कर..कमी कर"
"खा तेवढा. आवडतो ना तुम्हाला ?"
"आवडतो म्हणून एवढा खायचा का ? घास दोन घास दे फक्त"
"बदामाचा शिरा काही नेहमी होत नाही. केलाय तर खा"
"नको नको...कमी कर"
दुपारी जेवणात आईने खमंग लसणाची फोडणी घालून एखादी पातळ भाजी नाही तर पिठलं, लाल मिरच्यांची चटणी नाही तर ठेचा असे काही तरी केलेले असते. पोटभर जेवून तृप्त मनाने बाबा म्हणतात, "हे खरं जेवण. तो तुमचा (?) शिरा कसा चवीपुरता खायला. पोटभर जेवायचं तर भाजी-भाकरी-चटणीच हवी."
*****************************************************
शनिवार असूनही नेहमीप्रमाणे ईशानची आई सकाळी लवकर उठली आहे. आधुनिक आई असल्यामुळे स्वयंपाकघरात खुडबूड करण्याऐवजी ती की-बोर्डाचा खडखडाट करते आहे. एवढ्यात ईशानला जाग येते, तो आईची चाहूल घेत बाहेर बैठकीच्या खोलीत येतो.
"I don't want to drink milk"
"आं ?"
"Mamma, Can you please make brown shiraa ?"
"आज शिरा खायचाय मनीमाऊला ? बरं तू पटकन दात घासून घे. आपण शिरा करू."
कार्टं स्वतःहून काही तरी खायला मागतंय ह्या आनंदात मी शिर्यासाठी रवा भाजायला घेते. ईशान शिरा तयार होण्याची वाट बघत स्वयंपाकघरात खेळत बसतो.
"ईशान चल शिरा खाऊन घे"
"I don't want so much shiraa"
"आं ?"
"I don't want to eat so much shiraa"
"खा गुपचूप. तुला आवडतो, तू मागितलास म्हणून केलाय ना ?"
"...."
तरी फार फार तर अर्धी वाटी शिरा खाऊन तो स्वयंपाकघरातून धूम ठोकतो. दुपारी जेवणात पराठे किंवा भाजी-पोळी किंवा आमटी-पोळी असे काही तरी असते. पहिला घास पोटात गेल्या बरोबर ईशान म्हणतो,
"hmmmmmmmmm....yummy"
"आवडली आमटी ?"
"I don't like sheeraa"
"आं ?"
"Mamma, I like spicy. Can you make spicy every day ?"
"...."
(No subject)
मस्तच! माझा धाकटा पण उकळती
मस्तच! माझा धाकटा पण उकळती कॉफी / चहा पितो अन वरनं स्वतःच आय अॅम तातयगारू ( आजोबा) म्हणतो .
<'यात चिकन दिसत नाही' असं
<'यात चिकन दिसत नाही' असं म्हणून मला लाज आणली होती >

शिर्या इतक्याच प्रतीक्रिया
शिर्या इतक्याच प्रतीक्रिया पण स्वादीष्ट आहेत
आता फक्त वीस तास उरलेत मला
आता फक्त वीस तास उरलेत मला शिरा मिळायला.... अत्तापासुनच तोपासु
(No subject)
:)
अरेच्चा हे काय? मी
अरेच्चा हे काय? मी वेंधळेपणाच्या बीबीवर क्लिक करायला गेलो नि वेंधळेपणाने भलतीच लिंक क्लिक झाली तर लोक हसायची (पोष्ट्स वरुन) थाम्बेतनाच. मी म्हटले शिंच कोण एवढं वेन्धळ म्हणून वर स्क्रोल केल नि कळल की 'आपणच' ते वेन्धळे
असो पण त्यामुळे मला हा सिंडीचा मस्त लेख वाचायला मिळाला. 'जनुकं' बघून मला तरी त्यावर क्लिकवल नसतं
इकडे 'सब्स्क्रिप्शन' वगैरेची सोय हवी होती.
'आमच्या वेळी .....' हितगुजवर 'लास्ट डे' वर क्लिक केले की मागच्या दिवशी कोणी कोणी काय लिहीले ते त्या नावासकट नि थोड्या पोष्टींसकट दिसत असे म्हणजे रोजचा सिलॅबस किती हे लगेच कळत असे. आता काय तसे राहिले नाय ब्वॉ.
फचिनः तुझे मनातच एवढ्या मोठ्यांदा बडब्डतोस स्वगत?
मेधा: तुझा धाकटा तेलगु आहे का गं
किरण, लवकर अमृताला बोलावून घे
किरण, लवकर अमृताला बोलावून घे रे बाबा...तुझ्या पोस्टींची लांबी भलतीच वाढत चाललीये
आता तिच काम मला करायला नको
आता तिच काम मला करायला नको का?
ती आल्यावर होइल कमी 
अनुस्वार विसरणं हा फ्यामिली
अनुस्वार विसरणं हा फ्यामिली प्रॉब्लेम दिसतोय
लै भारी लिवलंया - आणि
लै भारी लिवलंया -
आणि प्रतिसादही मस्तच .....
Pages