ओट्स चे धिरडे (फोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 17 July, 2010 - 06:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप रोल्ड ओट्स, अर्धा कप बारिक रवा किंवा पाऊण कप तांदळाचे पिठ, एक कप आंबट ताक,
एक चमचाभर हिरव्या मिरचीचे लोणचे, (किवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या वा मिरपूड.) एक चहाचा चमचा जिरे, हिंग, मीठ, आवडत असेल तर अर्धा चहाचा चमचा साखर, (थोडी साखर घातली तर सोनेरी रंग येतो ) तेल वा तूप.

क्रमवार पाककृती: 

आंबट ताकात ओट्स पंधरा ते वीस मिनिटे भिजवा. त्यात मिरचीचे लोणचे वा मिरच्या मिसळून, मिक्सरमधून फ़िरवून घ्या. मग त्यात बाकिचे जिन्नस (तेल सोडून) मिसळा आणि नीट ढवळून घ्या. साधारण इडलीच्या पिठाइतपत सैल असूद्या. लागल्यास पाणी वा रवा (वा तांदळाचे पिठ मिसळा)

नॉन स्टिक पॅनवर थोडेसे तेल वा तूप टाकून त्यावर या मिश्रणाचे धिरडे टाका. गॅस अगदी मंद असु द्या.
आधी झाकण ठेवा आणि मग झाकण काढा. उलटायची वा परतायची घाई करु नका. पॅन थोडेसे हलवून बघा,
जर धिरडे खालून सूटले असेल तरच उलटा. दोन्ही बाजूने, सोनेरी रंग आला पाहिजे.
वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असे धिरडे होते. यात हवा तर बारिक चिरलेला कांदा व आल्याचे तूकडे, कोथिंबीर पण टाकू शकता. सोबत जवसाची चटणी घ्या, म्हणजे आरोग्यपुर्ण अशी न्याहारी होईल.

रव्यापेक्षा, तांदळाच्या पिठामूळे जास्त कुरकुरीतपणा येतो. तसेच मिरच्यांच्या जागी लोणचे वापरले तर जास्त चांगली चव येते.
बाकी मी आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणाऱ्यांपैकी असल्याने लोणचे संपवायचे, असे वेगवेगळे उपाय शोधावे लागतातच.

वाढणी/प्रमाण: 
चार मध्यम धिरडी होतील.
अधिक टिपा: 

हा प्रकार मंद आचेवरच करायचा आहे. वेळ नसेल तर सगळे मिश्रण एकदम पॅनमधे घाला, व खाताना तूकडे करुन घ्या.
उद्या परवा फोटो टाकतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण हाच प्रक्रार जास्त आवडतो. ( खीरीपेक्षा सॉरी त्याला पॉरिज म्हणायचे नाही का ! ) ओट्स खायला तर हवेतच मला !

दिनेशदा

मस्त आहे प्रकार.
ओट्सच्या इडल्या आणि डोसे पण होतात ना ?

ही रेसिपी दिसतेय!!
मला वाटलं, परत कोणतरी नवीन सभासद आला रेसिपी दिसत नाही.क्ष क्ष ईतकंच दिसतंय असं सांगायला.

Pages