एक कप रोल्ड ओट्स, अर्धा कप बारिक रवा किंवा पाऊण कप तांदळाचे पिठ, एक कप आंबट ताक,
एक चमचाभर हिरव्या मिरचीचे लोणचे, (किवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या वा मिरपूड.) एक चहाचा चमचा जिरे, हिंग, मीठ, आवडत असेल तर अर्धा चहाचा चमचा साखर, (थोडी साखर घातली तर सोनेरी रंग येतो ) तेल वा तूप.
आंबट ताकात ओट्स पंधरा ते वीस मिनिटे भिजवा. त्यात मिरचीचे लोणचे वा मिरच्या मिसळून, मिक्सरमधून फ़िरवून घ्या. मग त्यात बाकिचे जिन्नस (तेल सोडून) मिसळा आणि नीट ढवळून घ्या. साधारण इडलीच्या पिठाइतपत सैल असूद्या. लागल्यास पाणी वा रवा (वा तांदळाचे पिठ मिसळा)
नॉन स्टिक पॅनवर थोडेसे तेल वा तूप टाकून त्यावर या मिश्रणाचे धिरडे टाका. गॅस अगदी मंद असु द्या.
आधी झाकण ठेवा आणि मग झाकण काढा. उलटायची वा परतायची घाई करु नका. पॅन थोडेसे हलवून बघा,
जर धिरडे खालून सूटले असेल तरच उलटा. दोन्ही बाजूने, सोनेरी रंग आला पाहिजे.
वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असे धिरडे होते. यात हवा तर बारिक चिरलेला कांदा व आल्याचे तूकडे, कोथिंबीर पण टाकू शकता. सोबत जवसाची चटणी घ्या, म्हणजे आरोग्यपुर्ण अशी न्याहारी होईल.
रव्यापेक्षा, तांदळाच्या पिठामूळे जास्त कुरकुरीतपणा येतो. तसेच मिरच्यांच्या जागी लोणचे वापरले तर जास्त चांगली चव येते.
बाकी मी आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणाऱ्यांपैकी असल्याने लोणचे संपवायचे, असे वेगवेगळे उपाय शोधावे लागतातच.
हा प्रकार मंद आचेवरच करायचा आहे. वेळ नसेल तर सगळे मिश्रण एकदम पॅनमधे घाला, व खाताना तूकडे करुन घ्या.
उद्या परवा फोटो टाकतो.
मला पण हाच प्रक्रार जास्त
मला पण हाच प्रक्रार जास्त आवडतो. ( खीरीपेक्षा सॉरी त्याला पॉरिज म्हणायचे नाही का ! ) ओट्स खायला तर हवेतच मला !
दिनेशदा मस्त आहे
दिनेशदा
मस्त आहे प्रकार.
ओट्सच्या इडल्या आणि डोसे पण होतात ना ?
कापोचे, हा डोश्याचाच प्रकार
कापोचे, हा डोश्याचाच प्रकार म्हणता येईल. इडल्या फार चिकट होतील.
मी नेहमी करते असे
मी नेहमी करते असे डोसे...पीठामधे
गाजर / पालक घालते
स्वप्नाली, येऊ द्यात मग
स्वप्नाली, येऊ द्यात मग बाफ.
दिनेशदा धन्यवाद.
दिनेशदा रिक्षा आणते आहे
दिनेशदा रिक्षा आणते आहे
ओट्सचे आप्पे मस्त होतात. रेसिपीची लिंक इथे आहे- http://www.maayboli.com/node/57152
मस्त झाले, धन्यवाद
मस्त झाले, धन्यवाद
मी आज केले. मस्तच झालेले.
मी आज केले. मस्तच झालेले.
Thank u Dinesh da. Mi banvun
Thank u Dinesh da. Mi banvun pahile. Sarvana khup awadale.
ही रेसिपी दिसतेय!!
ही रेसिपी दिसतेय!!
मला वाटलं, परत कोणतरी नवीन सभासद आला रेसिपी दिसत नाही.क्ष क्ष ईतकंच दिसतंय असं सांगायला.
Pages