दुसरा आरसा
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago
0
रात्रीच्या कभिन्न काळोखात
प्रकाशाचा आधार न घेता
तो खरं प्रतिबिंबं दाखवितो,
ते इतकं प्रखर असतं की
पापण्या झुकुनं जाव्यात
मग त्याला विन्मुख होऊन
पुन्हा सवयीच्या आरशात
मी माझं नखशिखांत रुप
न्याहाळत बसतो.. पण छे!
खरं प्रतिबिंबं उमटतचं नाही!
सोन्याचांदीचा नसला तरी
लबाड.. फसव्या अशा
बाह्य जगापासून लपवून
मी त्याला अलिप्त ठेवतो,
साधासा ओरखडा उमटला
तरी भरपाई शक्य नाही!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा