निरुत्तर

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आपल्यातील आपण जेंव्हा पोटचा गोळा म्हणून
जन्म देणार्‍या आईसारखे नसतो,
पालनपोषण करणार्‍या बापासारखे नसतो,
नऊ मास एकाच उदरात वाढलेल्या
सख्ख्या भावंडांसारखेही नसतो,
सगे-सोयरे-प्रियजन ह्यांच्या पैकी
कुणा-कुणाकुणाही सारखे नसतो,
तेंव्हा आपण नक्की कसे असतो?

केवळ प्राक्तन म्हणून अंगभूत गुणा-अवगुणातून
उपजलेली आपण एक व्यक्ती असतो?
समाजानी जशी घडवली त्याचे प्रतिनिधिक असतो?
पंचक्रोशीतील-दशक्रोशीतील व्यवहारातून
उमटलेल्या सवेंदनांचा ठसा असतो?
नक्की आपण कसे असतो..?

- बी

विषय: 
प्रकार: