एक नवा विक्रम होतोय.
कारण, मास्टरब्लास्टर 'ट्विटर'वर आलाय.
काल सचिनने ट्विटिंग सुरू केले, आणि त्याच्या लाखो 'फॅन्स'मध्ये आनंदाच्या लाटा उसळल्या.
त्याच्या फॉलोअर्सचा क्षणाक्षणाला वाढत जाणारा आकडा न्याहाळणे, हेदेखील कालचे मोठ्ठे 'सुख' होते.
संध्याकाळपर्यंतच्या जेमतेम १८ तासांत सचिनच्या चाहत्यांची झुंबड गर्दी ट्विटरवर उसळली होती. रात्री जवळ्पास एक लाखांचा आकडा ओलांडला...
शिवाजी पार्कच्या मैदानावर, तिथल्या मातीत हुंदडून मोठा झालेल्या सचिनच्या चाहत्यांची एक विशाल सभा ट्विटरवर भरली, आणि प्रत्येकाने आपले मन मोकळे करीत सचिनला शुभेच्छा दिल्या.
एवढी मोठी सभा, पण, कसलाही गोंगाट नाही.
खरंच, 'ट्विटर' हा 'सायलेन्स झोन' आहे... तरीही इथे लाखोंची गर्दी होते, आणि सगळे काही सुरळीत, शिस्तीत, आखीवपणे पार पडते.
सुखवणारे!...
वेलकम सचिन... तुझ्या सामान्यांच्यात येण्यामुळे, असंख्यांच्या भावनांना शब्द फुटतील...
सामन्या'तून 'सामान्यां'कडे!...
Submitted by झुलेलाल on 5 May, 2010 - 23:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो ना... मी आज पर्यंत
हो ना... मी आज पर्यंत ट्विटरबद्दल ऐकुनच होतो. कधी नोंदणी करायचा विचारच नव्हता केला. पण तेंडल्याच्या अकाऊंटबद्दल ऐकले आणि पहिल्यांदा ट्विटर वर अकाऊंट उघडले.
http://twitter.com/sachin_rt
http://twitter.com/sachin_rt
चला सगळ्यांनी या इथे.
आय्ला, हे आहे होय, मला वाटले
आय्ला, हे आहे होय, मला वाटले "सामना" वृत्तपत्राबाबत आहे
तस तर मायबोलीपण ब्यान आहे 
आमच्यात ट्विटरबिटर समद ब्यान आहे