जय मराठी! जय महाराष्ट्र!!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
10
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झेंडा च बदलुन टाकलास? काय
झेंडा च बदलुन टाकलास? काय हे?
अर्थ उलगडुन सांग म्हणजे कळेल काय ते?
मला पण चंपकप्रमाणे प्रश्न
मला पण चंपकप्रमाणे प्रश्न पडला, ह्या झेंड्याचा काय अर्थ आहे ?
'झेंडा' चित्रपटात त्या म.न.से
'झेंडा' चित्रपटात त्या म.न.से च्याकार्यकर्त्याला जो हिरवा रंग खटकतो तो रंग वगळून केलाय बहुदा संकल्प नी :).
राज च्या इमेज ला शोभेल असा मराठी अभिमान झेंडा :).
बाकी संकल्प संगेलच अर्थ !
फक्त मराठ्यांचेच का बरं
फक्त मराठ्यांचेच का बरं अभिनंदन?
फक्त मराठ्यांचेच >>>>
फक्त मराठ्यांचेच >>>> महाराष्ट्रात राहतो तो मरहट्टा....मराठा.... मराठी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मयेकर : चंप्याने सांगितलेच
मयेकर : चंप्याने सांगितलेच आहे. मराठी बोलतो, मराठीला मायबोली आणि महाराष्ट्राला मायभूमी मानणारा माणूस = मराठा. शहाण्णवकुळी क्षत्रियांच्या संदर्भाने 'मराठा' संज्ञेचा आवाका सीमित करण्याची खोड आपल्या समाजाला आता-आताशा अधिक लागली आहे, असे वाटते. बाळ गंगाधर टिळकांनी चालवलेले 'मराठा' हे इंग्लिश वृत्तपत्र व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्र.के. अत्र्यांनी चालवलेले 'मराठा' हे मराठी वृत्तपत्र, यांच्या नावांतही व्यापक अर्थच अपेक्षित होता (त्यांचा दृष्टिकोन जर सीमित असता, तर स्वतः चालवलेल्या वृत्तपत्राला द्यायला 'चित्पावन' किंवा 'देशस्थ ब्राह्मण' अशी नावं त्यांना सुचली असती
). थोडक्यात जात, धर्म काहीही असो, मराठीची अन महाराष्ट्राची माळ गळ्यात मिरवणारा माळकरी मराठाच.
सिंडरेला व दीपांजली : या झेंड्याच्या संकल्पनेबद्दल चंपकाच्या विचारपुशीत मी माझी भूमिका मांडली होती; तीच पुन्हा येथे देत आहे -
१.
>>चंप्याभो, महाराष्ट्राला सध्या कुठलाही अधिकृत ध्वज नाही. मी जो झेंडा बनवला आहे, तो मराठी भाषावादाचे प्रतीक म्हणून ध्वज बनवला आहे. त्याच्या अर्थाविषयी थोडक्यात माहिती या पानावर लिहिली आहे : http://commons.wikimedia.org/wiki/File:Maharashtradhvaj.png
केशरी - महाराष्ट्रीयत्वाचा रंग.
पांढरा - समता व न्यायाचा रंग.
तांबड्या रंगातील महाराष्ट्रमुद्रा - शिवमुद्रेप्रमाणे अष्टकोनी मुद्राकार, ’म’कार ’मराठी’ व ’महाराष्ट्र’ यांचे एकात्मिक प्रतीक; तांबडा रंग म्हणजे महाराष्ट्रस्थापनेमागील हौतात्म्याचा, बलिदानाचा रंग.
<<
२.
>>
भगवा झेंडा तसं म्हटलं तर बर्याच काळापासून सनातन धर्माचे प्रतीक म्हणून वापरात असावा. शिवाजीराजांच्या काळी परक्या आक्रमकांविरुद्ध एतद्देशीय सत्ता उभारताना भगवा जरीपटका त्याच सूत्राने/वारश्याने वापरला गेला. सध्या शिवसेना अनधिकृतरित्या भगव्या झेंड्याचा वापर पक्षाच्या कार्यक्रमांत करते; तो 'हिंदुत्व' आणि 'महाराष्ट्रीयत्व' या संयुक्त हेतूने.
बाकी, छत्रपती शाहूंनंतरच्या मराठेशाहीत सातारकर भोसले (व पेशवे), ग्वाल्हेरकर शिंदे, बडोदकर गायकवाड, इंदूरकर होळकर, नागपूरकर भोसले, कोल्हापूरकर भोसले इत्यादी मोठ्या व अन्य छोट्या राजघराण्यांच्या आपापल्या जहागिरींचे ध्वजही भगव्या झेंड्याप्रमाणे होते. त्याबद्दल अधिक माहिती इकडे बघ :
http://commons.wikimedia.org/wiki/Category:Flags_of_Maratha_Confederacy
http://flagspot.net/flags/in-princ.html
मला मराठी भाषिकत्वाचा, महाराष्ट्राचा संकल्पित ध्वज बनवताना तो हिंदुत्वाशी जोडला न जाता मराठी भाषिकत्वाशी व मराठेशाहीच्या परंपरेशी जोडला जावा, असे वाटत होते. म्हणून मी केशरी वापरला. परंतु त्याएवढेच महत्त्व देऊन न्याय व समतेचे प्रतीक असलेला पांढरा रंगही वापरला. खेरीज मराठी भाषिकत्वाचे अन महाराष्ट्रीयत्वाचे अन्योन्य संबंध लक्षात घेऊन 'म'काराची अष्टकोनी (ज्यात पुन्हा मराठेशाहीचा वारसा गर्भित आहे) मुद्रा - महाराष्ट्रमुद्रा - वापरली.
अन्य देशांतील राज्यांप्रमाणे राज्या-राज्यांचे अभिमानदर्शक ध्वज असण्याची पद्धत दुर्दैवाने आपल्या देशात आजवर कधी सुरू झाली नाही. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आपल्या भाषिकत्वाचे काहीतरी दृक्प्रतीक (व्हिज्युअल प्रतीक) निर्मिण्याच्या हेतूने हा ध्वज रचला.
<<
मयेकर : चंप्याने सांगितलेच
मयेकर : चंप्याने सांगितलेच आहे. मराठी बोलतो, मराठीला मायबोली आणि महाराष्ट्राला मायभूमी मानणारा माणूस = मराठा. शहाण्णवकुळी क्षत्रियांच्या संदर्भाने 'मराठा' संज्ञेचा आवाका सीमित करण्याची खोड आपल्या समाजाला आता-आताशा अधिक लागली आहे, असे वाटते. बाळ गंगाधर टिळकांनी चालवलेले 'मराठा' हे इंग्लिश वृत्तपत्र व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्र.के. अत्र्यांनी चालवलेले 'मराठा' हे मराठी वृत्तपत्र, यांच्या नावांतही व्यापक अर्थच अपेक्षित होता (त्यांचा दृष्टिकोन जर सीमित असता, तर स्वतः चालवलेल्या वृत्तपत्राला द्यायला 'चित्पावन' किंवा 'देशस्थ ब्राह्मण' अशी नावं त्यांना सुचली असती ). थोडक्यात जात, धर्म काहीही असो, मराठीची अन महाराष्ट्राची माळ गळ्यात मिरवणारा माळकरी मराठाच.
मा. पुरुषोत्तम खेडेकरांना व श्रीमंत कोकाटेंना पटेल तो दिवस भाग्याचा.
माफ करा, हा माझ्या बुद्धीचा
माफ करा, हा माझ्या बुद्धीचा दोष असेल पण मला हे एक मार्मिक, विचार करायला लावणारे असे व्यंगचित्र वाटले होते.
मी काढलेला अर्थः
षटकोनातला म शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेशी जुळता वाटतो. त्यामुळे इतिहासाच्या पाठबळावर कुठेतरी अर्धी मराठी संस्कृती जी काय आहे ती टिकून आहे. उरलेल्या मराठीने, महाराष्ट्राने केंव्हाच परभाषेपुढे, परसंस्कृतीपुढे शरणागतीचे पांढरे निशाण उभारले आहे. आणि हळूहळू त्या लढाऊ वृत्तीचे शरणागतीत रुपांतर होत आहे.
'म' चा सध्याचा अर्थ
'म' चा सध्याचा अर्थ -मी,माझे,मला