हाफ राईस दाल मारके

Submitted by बेफ़िकीर on 27 April, 2010 - 18:55

असहाय्यता हे एकमेव भांडवल घेऊन जन्माला येणारी बालके जगात असतात याची कल्पना चार भिंतींच्या आड सुखेनैव जीवन व्यतीत करत असलेल्या कनिष्ठ, मध्यम, उच्च मध्यम व उच्च वर्गीयांना फ़क्त पेपर वाचल्यामुळे येते. ती कल्पना येते तेव्हा त्यांच्या हातात टोस्ट बटर असते व त्यांचा मुलगा टिपटॊप पोषाख घालून स्कूलव्हॆनमधून जाताना ’बाय’ म्हणत असतो. झोपडीत राहणारा मजूर असला तरी तोही त्यावेळेला मोफ़त वर्तमानतपत्र असलेल्या खांबापाशी तंबाखू चोळत इतरांशी त्या विषयावर गप्पा झोडून स्वत:तले संवेदनशील मन पुराव्यानिशी सिद्ध करत असतो.

आपण जेमतेम काही घटका जेथे थांबून पुन्हा हायवेला लागतो तो ढाबा, त्या ढाब्यावरील जीवन, आपण पुढे निघून गेल्यानंतर कसे असते व त्यात ’दिपू’सारखा मुलगा कसे जीवन व्यतीत करतो, याची ही कहाणी!

हाफ़ राईस दाल मारके!

प्रशासकांचे व प्रकाशकांचे मनापासून आभार! ही लेखमालिका एकत्रित स्वरुपात येथे दिल्याबद्दल!

-'बेफिकीर'!

बेफिकीर.... गेल्या ३ दिवसात ७-८ भाग दररोज वाचत कादंबरी संपूर्ण वाचली... अ..प्र..ती..म.. ह्याशिवाय अजून काय बोलू...
भटकंती निमित्ताने बऱ्याच धाब्यावर अधून-मधून जाणे होते. ह्यापुढे कुठेही गेलो तरी तुम्ही आणि ही कहाणी आठवल्याशिवाय राहायचो नाही... Happy

......... असेच लिहित रहा... शुभेच्छा....

Hats off to you for this wonderful story ...

बेफिकीरजी एखाद्या निर्मात्याला ही कादंबरी वाचायला द्या please ...यावर खूप छान सिनेमा होउ शकेल . ही कादंबरी पुर्ण वाचल्यावर हाच विचार पहिल्यानदा डोक्यात आला....आणि picture कस असेल याचे visualisation पण करुन झाले... ( धाब्याचा सेट कसा असेल, starcast वगैरे Happy )
super duper hit होइल
अभिनन्दन and All the Best

बेफिकीर,

हि संपूर्ण कथा वाचताना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. किती मार्मिक आणि detailed कथा आहे हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत!

रेल्वे स्थानका वरची मुले किंवा रस्त्यावर गोळ्या चोकोलेट विकणारी लहान मुले पाहिल्यावर कायम माझ्या मनात हे सर्व विचार आणि प्रश्न यायचे पण तुम्ही त्यांना जे शब्दांमध्ये रूपांतरित केलं आहे त्याला तोड नाही.

संपूर्ण कथा वाचताना सगळी पात्रं डोळ्यासमोर उभी राहिली. जरी हि एखाद्या पिक्त्चर ची स्टोरी वाटत असली तरी त्यावर पिक्त्चर बनविणे योग्य होणार नाही असा वाटते कारण या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती तशीच्या तशी पडद्यावर उतरू शकेल याची काय खात्री??

या लिखाणाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

marathit tayip karan farch kathin aahe bua.
dupari 4 vaje pasun aata paryant salag 23 bhag vachun kadhale. karan pahilya bhaga pasune lekhkani ju austukta tikvun thevali ti jabardast hito.
kuni eaka vachkala he lekhan-shaili vachun suhas shirvalkar yanchi aathavan zali. parantu mala tase vatat nahi. ulat mala baba kadam yanchi aathvan zali.
vishesh manje shri. na. pendse yanchya ' garmbicha bapu ' ya kadambarichi aathvan zali.
aso, sahaj -sundar-vachkala khilvun thevnari lekhamala (ektra kele tar kadambari ) dilya baddal lekhkache punshch aabhar.

जशि आज्ञा. आता नाहि वाचत. नन्तर. आपन इतके बारि लिहिले आह कि रिप्लय देने हे कामच आहे सर्व वचकन्चे.

Hi...
Mla tumchi katha khup avadli even me hi katha jagle
Feel keli...heart touching ani vichar krayla lavnari ..farch chhan..
Vachtana vatl...sampuch bye..amazing.. You are simply great..
I love it. Happy