हॅमिल्टन गार्डन, क्रिष्टल माऊंटन, पीहा बीच वगैरे
न्य़ू झीलंड ला, गेल्या जूनमधे गेलो होतो, त्यावेळी तिथे कडाक्याची थंडी होती. घरीच हीटरसमोर शेकत बसावे लागत असे. म्हणून मग यावेळी त्यांच्या उन्हाळ्यात, म्हणजे डिसेंबरमधे गेलो होतो. ऑकलंड ला जायला, आपल्याकडून थेट फ़्लाईट नाहीच. यावेळी कोरियन एअरलाइन्स ने व्हाया इंचॉन असे गेलो होतो. तो विमानतळ मस्तच आहे. तिथे बराच वेळ थांबलो होतो. बाकी खरेदी वा खाण्यापिण्यापेक्षा, मला तिथले (विमानतळावरच) सतत होत असलेले, नृत्य संगीताचे कार्यक्रम जास्त आवडले. इथे तिथे फ़िरण्यापेक्षा, मी या कार्यक्रम बघण्यातच वेळ घालवला.
यावेळेस ऑकलंडला सराईतासारखा बाहेर पडलो. (गेल्यावेळी बॅगेज उघडावे लागले होते.) बाहेर आलो, तर कसला उन्हाळा, थंडीच होती. माझ्या मित्रमंडळीना पण मी इतक्या लवकर बाहेर येईन असे वाटले नव्हते. त्यामूळे मलाच वाट बघत, बसावे लागले. उतरलो तो दिवस, ऐन नाताळाचा, थेट एका श्रीलंकन मित्राकडे गेलो. त्याच्या घरच्या गोकूळात जेवणखाण आटपून, मग आणखी एका मैत्रिणीकडे गेलो. तिथे गेलो, कि प्रत्येक मित्र मैत्रिणीकडे, एकदातरी जेवायला जावेच लागते. त्यामूळे फ़िरण्याची वेळ कमी होते. पण त्यांचा प्रेमळ आग्रह मोडवतही नाही.
गेल्या वेळेस, फ़ूले जरा कमीच होती. ती हौस यावेळी भागली. माझी आवडनिवड माहीत असल्याने, यावेळेस मैत्रिणीने आणि लेकीने, मला भरपूर फ़िरवले. चिमुरडी लेक माझी गाईड होती, आणि अगदी हात धरुन, मला सगळीकडे ती फ़िरवत असे. साधे बाजारात जाऊ, म्हणालो तर नेटवरुन बसचे टाईमटेबल वगैरे बघून, मला नेत असे ती.
न्य़ूझीलंड हा पूर्ण देशच इतका, छान आहे कि, कुठल्याही दिशेला कॅमेरा रोखला, आणि क्लिक केले कि मस्त फ़ोटो येतो. यावेळेस मि कोरियाहून गेल्याने, त्यांचे नॉर्थ आयलंड मला वरच्या टोकापासून दिसले.
पहिल्या दिवशी, तिथल्याच एका टेकडीवर गेलो होतो. तिथे माझ्या ओंजळीतदेखील मावणार नाहीत, एवढ्या मोठ्या आकाराची फ़ूले दिसली.
दुसया दिवशी, मैत्रिण, लेक आणि तिची मैत्रिण, असे मिळून हॅमिल्टन गार्डन बघायला गेलो. वाटेत बऱ्याच ठिकाणी रस्ता चुकलो. तरीपण स्थानिक किवी लोकांची मदत घेत घेत, शेवटी एकदाचे मुक्कामाला पोहोचलो. प्रवास रम्य होता, तरी त्यात बराच वेळ गेला होता, त्यामुळे त्या गार्डन मधे जास्त वेळ फ़िरता आले नाही. ते गार्डन फ़ारसे मोठे नसले तरी, खूप सुंदर आहे. माझ्यासारख्या फ़ूलवेड्याला तर तिथे
दोन तीन दिवसही कमी पडतील. पावलापावला वर तिथे निरनिराळी फ़ूले होती. पण त्यातही अनेक थीम्स होत्या. जपानी, चिनी, अमेरिकन इंग्लीश, इतालियन अशी अनेक प्रकारच्या थीम्स प्रमाणे बागा सजवल्या होत्या. भारतीय बागही होती. विस्तार मोठा नसला, तरी एखादे वळण घेतले, कि वेगळी बाग दिसत होती. शेजारच्या नदीत राफ़्टींगही चालले होते.
किंवी लोकांसारखे रांगडे, किवी गार्डनही होते. पण मला आवडले ते भाजीपाल्याचे आणि फ़ळफ़ळावळीचे गार्डन. तिथे मिरची, कोथिंबीर, कांदा, भोपळा, हरभरा, फ़नेल अश्या अनेक भाज्यांचे वाफ़े होते. आर्टिचोक हि भाजी आपल्याकडे फ़ारशी प्रचलित नाही. पण मी मिळाली तर खातो. ती भाजी म्हणजे, झाडाची कळी (खरे तर कळाच म्हणायला हवा). आर्टिचोक उमललेले मी कधी बघितलेच नव्हते, ते इथे
बघायला मिळाले. तसेच अंजीर, डाळींब, सफ़रचंद, पीच, द्राक्ष अश्या फ़ळांचे वाफ़े पण होते. किवीचे मांडव होते. आपल्याकडे इतके महाग मिळणारे फ़ळ, तिथे मात्र मुबलक मिळते. आपण खातो त्या हिरव्या गराच्या किवीपेक्षा, वेगळ्या पोपटी गराची एक जात तिथे गोल्डन किवी म्हणून मिळते. ती तर चवीला खासच असते. तिथले आणखी एक खास फ़ळ म्हणजे, फ़िजीओहा. हे फ़ळ मी फ़क्त चित्रातच बघितले होते. पण सीझन नसल्याने, तिथेही केवळ कळी बघण्यावरच समाधान मानावे लागले होते. तसे मी त्याचे पेय आणि चॉकलेट खाल्ले, पण प्रत्यक्ष ते फ़ळ नाही़च दिसले.
ही अशी फ़ळांनी लगडलेली झाडे बघितली, कि माझे मन ताब्यात रहात नाही. तिथे तर बहुतेक घरांच्या अंगणात अशी झाडे दिसायची.
पण असे फ़ळ तोडले तर २५० डॉलर्स पर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती लेकीने दिल्याने, मन आवरावे लागत होते. तरीपण मैत्रिणीच्या अंगणातल्या, प्लम्सने लगडलेल्या झाडाच्या अर्धाअधिक भार मी, तिथल्या वास्तव्यात कमी केला.
आम्ही गेलो होतो, त्या हॅमिल्टन गावापासून थोडे दूर, रोटोरुआ नावचे प्रेक्षणीय स्थळ आहे. आपल्या मायबोलीकर भाग्यश्रीने त्याची सचित्र ओळख करुन दिलीच होती. पण तिथपर्यंत जाण्याइतका वेळ नव्हता.
पुढच्या वीकेंडला, सगळे मित्रमैत्रिणी मिळून, क्रिश्टल माउंटन आणि पीहा बीच वर जायचे ठरवले. रस्ता अत्यंत रम्य.
मी आणि मैत्रिण एका गाडीत होतो, आणि गप्पांच्या नादात रस्ता चुकलो. बर्याच पुढे गेल्यावर आपण चुकलो हे लक्षात आले. तोवर दुसर्या गाडीत असलेल्या, लेकीने, दोन तीन टेक्स्ट मेसेज पाठवले होते.
हा समोर दिसतोय तोच क्रिश्टल माउंटन असणार, अशी समजूत करुन घेत, आम्ही दोघे तिथेच गप्पा मारत थांबलो. आजूबाजूचा परिसर अत्यंत रम्य, पण माणूस वा गाडी दिसतच नव्हती. शेवटी घोड्यावरून रपेट करणारी, एक सुंदर युवती दिसली. तिनेच आम्हाला मार्गदर्शन केले.
तिथे बाकिचे सगळे आधीच पोहोचले होते. आम्हाला कुठे चुकलात, असे विचारायचे कष्ट कुणी घेतले नाहीत.
क्रिश्टल माऊंटन वर पोटात स्फ़्टीक असलेले, अनेक दगड मिळतात. तिथे त्या सगळ्य़ांचे आणि त्या दगडांपासून केलेल्या वस्तूंचे शोरुम आहे. अनेक सुंदर वस्तू आहेत तिथे. सगळ्या छोट्या मोठ्या मैत्रिणींसाठी त्या वस्तू घेतल्या मी. मित्रांसाठी मात्र तिथे फ़ारसे काहि नव्हते.
मग तिथून त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो. तिथे एक धबधबा आहे. पण माझ्या कॅमेराने मात्र कधी नव्हे तो दगा दिला. (खरे तर दगा त्याने नाही, मीच त्याला दिला होता. बॅटरी चार्जच केली नव्हती मी.) तिथे समोरच काहि गुफ़ा आहेत. मी, आणि काहि मित्रमैत्रीणी तिथली खडतर वाट चढून त्या गुहांपर्यंत जाऊन पण आलो. वाट बहुतेक रुळलेली नव्हती. बरीच झाडेझुडुपे होते. पण नेटाने वर चढलो. समोरच धबधबा होता. त्या धबधब्याच्या पाण्याचा एक ओहोळ, तिथून समुद्रात जात होतो. मस्त थंडगार पाण्यात थोडा वेळ खेळलो.
मग सगळ्यांनी पीहा बीचवर जायचे ठरवले. इथे जायचाही रस्ता रम्य. हा बीच वरच्या एका वळणावरुन मस्त दिसत होता. खाली पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय होती. तसा प्रत्यक्ष बीच धोकादायकच वाटत होता. पण किनायावर एक छोटेसे लगून होते. तिथे लेकीनी आणि तिच्या मैत्रिणींनी बसकण मारली. काहि मित्र बीचच्या दिशेने गेले, पण मोठ्या लाटेमूळे परत फ़िरले. किनार्यावर एक टेकडी दिसत होती. तिला लायन रॉक म्हणतात. त्यावर कधीकाळी किवी लोकांची वस्ती होती म्हणे. चढायला मध्यम अवघड अशी वाट होती. मी अर्थातच वर जाऊन आलो. बाकिच्यांनी मात्र धाडस केले नाही. लेकिशी गप्पा मारत, मीपण पाण्यात बसकण मारली.
शेवटी भूक लागल्याने, सगळे बाहेर पडलो. माझ्या शाकाहारी पणाची सगळ्यांना कल्पना असल्याने, प्रत्येकाने माझ्यासाठी घरुन खाऊ आणला होता. पण तिथे एक बर्यापैकी दुकान दिसल्याने सगळे तिथे वळलो. मैत्रिणिने आधी जाऊन तिथे शाकाहारी कायाकाय आहे, ही चौकशी केली.
आणि नवल म्हणजे, माझ्यासाठी बरेच पदार्थ तिथे उपलब्ध होते. तिथेच सगळ्या मित्रमैत्रीणींचा (लिसा, टेरेन्स, श्रुतिका, तुषारा, शिकारा, देवी, बाला, सुक्कू आदी ) निरोप घेतला. अर्थातच परत भेटीचे बेट ठरवतच !!!
हे आहे माझ्या ओंजळीएवढे फूल
एक रम्य नदीकिनारा
आता नुसती फुले बघा
गुलाबी स्वप्न !!
बेशिस्त वर्ग !
वेगळीच छटा !
हॅमिल्टन मधले चिनी गार्डन
बाजूने वाहणारी नदी.
तिथली "भारतीय" बाग !
तिथली इतालियन बाग.
तिथलीच किवी बाग
"उमललेले" आर्टीचोक.
टॉयलेटही देखणे !
आणखी एक देखणे फूल !!
अजून बरेच फोटो आहेत, सवडीने पोष्टतो !!
पीहा बीच आणि लायन
पीहा बीच आणि लायन रॉक
क्रिस्टल माउंटन वरच्या शोरुममधले स्फटीक.
साधेपणातले सौंदर्य !
केवळ रंगाची करामत !

समुद्रकिनार्यावर अक्षरशः पायतळी हि फुले होती !!
छान वर्णन फोटो मस्तच,
छान वर्णन

फोटो मस्तच, फुलांचे खासच
सुंदर वर्णन फोटो.
सुंदर वर्णन फोटो.
मस्त फोटो आणि वर्णन दिनेश..
मस्त फोटो आणि वर्णन दिनेश..
मस्त फोटो. लायन रॉक जबरी आहे!
मस्त फोटो. लायन रॉक जबरी आहे!
बीच वर जाणारा ओहोळ एकाच
बीच वर जाणारा ओहोळ
एकाच झाडाला दोन प्रकारची फूले !!
तिथलीच जपानी बाग.
किवी फळांचा मांडव
नेहमीचेच फूल, पण छान मोतिया रंग
जरा वेगळ्या रंगाची कमळे
आणि शेवटि एक कोलाज !!
खुप मस्त वाटलं सगळी चित्रे
खुप मस्त वाटलं सगळी चित्रे पाहून
अमोल केळकर
सुपर्ब!!!!
सुपर्ब!!!!

छान! गोल्डन किवी इथेही
छान!
गोल्डन किवी इथेही मिळतात. ते चवीला गोड असतात. हिरवे किवी आंबट लागतात. किवीचे गर काढण्यासाठी एक चमचा मिळतो. त्यानी गर अलगद वर निघतो. कच्चे किवी पण मिळतात. त्याला वेगळे नाव आहे. मी विसरलो.
आर्टिचोकबद्दल मला आणखीन वाचायला आवडेल. मी एकदाच खाल्ले आहे.
वाह! गुलाबी फुलं कित्ती नाजुक
वाह! गुलाबी फुलं कित्ती नाजुक आहेत!
आर्टिचोक डीप यम्मी यम्म!! या फुलाचा फोटू पोष्टल्याबद्दल थांकु.
बेशिस्त वर्ग
बेशिस्त वर्ग
छान मला बेशिस्त वर्ग खूप
छान

मला बेशिस्त वर्ग खूप आवड्ला
व्वा!!!!!!! तबियत
व्वा!!!!!!! तबियत खुश!!!!!!!!!
सही फोटो काढलेत.
सही फोटो काढलेत.
वा दिनेशदा! सुंदर फोटु आणि
वा दिनेशदा! सुंदर फोटु आणि वर्णन सुद्धा.
फोटो अतिशय सुंदर आणि नयनरम्य
फोटो अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहेत. तुमचे वर्णन वाचून छान वाटले.
खुप सुंदर फोटो, दिनेशदा!
खुप सुंदर फोटो, दिनेशदा! आयुष्यात कधी न्युझीलंडला गेलो तर ही बाग पहायलाच हवी
फार सुरेख फोटोज !
फार सुरेख फोटोज !
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
व्वाव ! सही फोटो आहेत .
व्वाव ! सही फोटो आहेत .
झक्कास दिनेशदा ! एकदम सही !!
झक्कास दिनेशदा ! एकदम सही !!
दिनेशदा, फोटो फारच सुंदर आले
दिनेशदा, फोटो फारच सुंदर आले आहेत. वर्णन पण छान आहे. १-२ वर्षात जायचा विचार आहे. तुमच्या काही टिप्सचा नक्की उपयोग होइल.
सुंदर. वर्णन आणि फोटो
सुंदर. वर्णन आणि फोटो दोन्हीही.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
सुंदर फोटो!!! आर्टिचोक चे फूल
सुंदर फोटो!!!
आर्टिचोक चे फूल पहिल्यांदाच पाहिले बहुतेक मी.
सुंदर! "गुलाबी स्वप्न"वाली
सुंदर!
"गुलाबी स्वप्न"वाली फुले तर खुपच आवडली!
दिनेश.. मस्तच. तुम्ही नुसते
दिनेश.. मस्तच.
तुम्ही नुसते फिरायला जायचे म्हणुन अश्या ठि़काणांना भेट देता की कामानिमीत्त? तुम्हाला अश्या बर्याच सुंदर सुंदर ठिकाणी नेहमी जाता येत त्याचा मला खरच हेवा वाटतो
पण जेव्हा कुठेही जाता तेव्हा त्याच चीज करता व आम्हा मायबोलिकरांना तिथली सैर करवुन आणता.. त्याबद्दल धन्यवाद!
आभार मित्रानो. इथे दिलेत
आभार मित्रानो. इथे दिलेत त्यापेक्षा बरेच जास्त फोटो काढले आहेत. न्यू झीलंड देश सुंदर असला, तरी बराच दूर आहे, (आणि महागही आहे.)
बराच दूर असल्याने, तिथला निसर्ग वेगळाच आहे. फुले, फळे इतकेच काय प्राणीपक्षीही वेगळे आहेत. तिथे सरपटणारे, किंवा हिंस्त्र प्राणीच नाहीत. पक्ष्याना एवढे सुरक्षित वाटते, कि अनेक पक्षी उडणेच विसरले आहेत (किवी पक्षी उडत नाही.)
मी अश्या ठिकाणी भेटी देतो, ते निव्वळ मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी. ती ठिकाणे सुंदर आहेत, हा केवळ योगायोग !!!
न्य़ूझीलंड हा पूर्ण देशच इतका,
न्य़ूझीलंड हा पूर्ण देशच इतका, छान आहे कि, कुठल्याही दिशेला कॅमेरा रोखला, आणि क्लिक केले कि मस्त फ़ोटो येतो.
--- १०० % सहमत... मी वेलिंग्टन ला २०००-०२ काळात होतो.
सर्व फोटो छान आले आहेत.
फोटो खूप आवडले.
फोटो खूप आवडले.
Pages