साहित्यः भात शिजवून (साधारण १ वाटी), १ मध्यम कांदा, १ टॉमेटो बारीक चिरून, १/२ गाजर (चौकोनी तुकडे करून), १ भोपळी मिरची (चौकोनी तुकडे करून), १ कप मटार, २-३ टी.स्पून पावभाजी मसाला, १ टी.स्पून लाल तिखट, तेल, जीरं, मीठ व वरून घालायला कोथिंबीर.
कृती: भात कूकरमध्ये शिजवून घेऊन मोकळा करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यावर जिरं घालावं. जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा लालसर रंगावर परतला की त्यावर भोपळी मिरची, गाजर, मटार घालून परतावं व ५ मिनीटे झाकण घालून एक वाफ काढावी. टॉमेटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे तो सगळ्यात नंतर घालावा. व्यवस्थित ढवळून त्यात पावभाजी मसाला व लाल तिखट घालावं. नंतर मोकळा केलेला भात घालावा, मीठ घालून ढवळून ५-७ मिनीटे झाकण टाकून एक वाफ काढावी. वाढताना वरून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावा.
**पावभाजी मसाला व तिखटाच्या प्रमाणात आपल्या चवीप्रमाणे फेरफार केला तरी चालेल.
कोणी जेवायला वगैरे येणार असेल त्यावेळेस हा भात केला तरी आवडेल. करायला कमी कटकटीचा व चवीलाही छान लागतो. बरोबर रायता केल्यास सोने पे सुहागा.
भाताचे प्रकार बरेच जण करत असल्याने, हा भात बर्याच जणींना माहित असण्याची शक्यता आहे.
थोडक्यात, मार्गरिन हे वेग
थोडक्यात, मार्गरिन हे वेग वेगळया ओइल पासून बनवतात आणि बटर हे दुधापासून .
ज्यांना lactose ची allergy आहे ते मार्गरिन वापरतात
Pages