साहित्यः भात शिजवून (साधारण १ वाटी), १ मध्यम कांदा, १ टॉमेटो बारीक चिरून, १/२ गाजर (चौकोनी तुकडे करून), १ भोपळी मिरची (चौकोनी तुकडे करून), १ कप मटार, २-३ टी.स्पून पावभाजी मसाला, १ टी.स्पून लाल तिखट, तेल, जीरं, मीठ व वरून घालायला कोथिंबीर.
कृती: भात कूकरमध्ये शिजवून घेऊन मोकळा करून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यावर जिरं घालावं. जिरं तडतडलं की बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा लालसर रंगावर परतला की त्यावर भोपळी मिरची, गाजर, मटार घालून परतावं व ५ मिनीटे झाकण घालून एक वाफ काढावी. टॉमेटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे तो सगळ्यात नंतर घालावा. व्यवस्थित ढवळून त्यात पावभाजी मसाला व लाल तिखट घालावं. नंतर मोकळा केलेला भात घालावा, मीठ घालून ढवळून ५-७ मिनीटे झाकण टाकून एक वाफ काढावी. वाढताना वरून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावा.
**पावभाजी मसाला व तिखटाच्या प्रमाणात आपल्या चवीप्रमाणे फेरफार केला तरी चालेल.
कोणी जेवायला वगैरे येणार असेल त्यावेळेस हा भात केला तरी आवडेल. करायला कमी कटकटीचा व चवीलाही छान लागतो. बरोबर रायता केल्यास सोने पे सुहागा.
भाताचे प्रकार बरेच जण करत असल्याने, हा भात बर्याच जणींना माहित असण्याची शक्यता आहे.
मला केव्हापासून करुन बघायचाय.
मला केव्हापासून करुन बघायचाय. बरं झालं इथे टाकलास.
हा फोडणीचा भात आहे.
हा फोडणीचा भात आहे.
अवंतिका, आमच्याकडे फोडणीच्या
अवंतिका, आमच्याकडे फोडणीच्या भातात आम्ही फोडणीत हिंग, हळद,मोहरी,मिरच्या, कढीपत्ता घालतो. त्यावर कांदा परततो आणि मग शिळा भात मोकळा करुन घालतो. वरुन कोथिंबीर.
तुमच्याकडच्या फोभा ची रेसिपीही लिहा.(वरच्या पेक्षा वेगळी असेल तर) तसंच तुमच्याकडे पुलावाला फो चा भात म्हणतात का?
पावभाजीमसाल्याचा भात कधी
पावभाजीमसाल्याचा भात कधी खाल्ला नव्हता. करून बघायला हवा.
सायो, दाणे राहिले मस्त कृती.
सायो, दाणे राहिले
मस्त कृती. करुन बघेन.
वा!!! पा भा मसाला घालून छान
वा!!! पा भा मसाला घालून छान चव येत असेल ना? वन डिश मिल.
उद्याच करते.
मस्त लागतो हा भात. मी
मस्त लागतो हा भात. मी खाल्लाय.
मस्त वाटतेय रेसिपी!
मस्त वाटतेय रेसिपी!
येस!! मस्त लागतो हा भात. मी
येस!! मस्त लागतो हा भात. मी करते नेहेमी. फक्त ह्याला तवा पुलाव म्हणते.
आता मी पण करुन बघते. नाहीतरी
आता मी पण करुन बघते. नाहीतरी सध्या काहीच काम नाहिये मला.
हो ना.. लेकीला पण आराम मिळेल
हो ना.. लेकीला पण आराम मिळेल जरा
मग काय. आज सकाळीच सांगुन
मग काय.

आज सकाळीच सांगुन गेली की आज तिचा डान्स क्लास आहे तर तुलाच करावे लागेल म्हणुन.
छान रेसेपी. करायला पाहीजे
छान रेसेपी.
करायला पाहीजे आता.
मला पुर्वी वाटायचे ते हॉटेल मध्ये तव्यावर पुलाव करतात म्हणुन तवा पुलाव वगैरे नाव देतात.
हो, मस्त लागतो.. एकदम कलरफुल
हो, मस्त लागतो.. एकदम कलरफुल , फ्लेवरफुल अन टेस्टी!!
होस्टेलात असताना कधी बाहेर खाल्ले तर बरेच्दा हाच मेनु असायचा एका ऑर्डरीत २-३ जण खपत त्यामुळे खिशाला परवडत असे .. रायता/लोणचे फ्री
अन सोबत मसाला पापड, फ्रुटज्युस /मील्कशेक घेतले कि पोट्भरिचे व्हायचे..
'तवा पुलाव' नाव होते तिथे.. पावभाजीच्या त्या मोठ्या तव्यावरच बनवत असत.. नुसत्या वासानेच पाणी सुटायचे तोंडाला !!
मस्त होतो पावभाजी मसाला घालून
मस्त होतो पावभाजी मसाला घालून भात मी नेहेमी करते. पण थोडा वेगळा. आता या रेसिपीने करून बघते.
सायो, मग आता एग करीची रेसिपी
सायो, मग आता एग करीची रेसिपी पण टाकू म्हणतेस?
मस्तच आहे ही रेसिपी. कालच
मस्तच आहे ही रेसिपी. कालच वाचली. आता करुन बघेन.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार पण केल्यावर फीडबॅक द्यायलाही विसरू नका.
अरे वा. आम्ही करतो हा नेहमी.
अरे वा. आम्ही करतो हा नेहमी. पावभाजी पुलाव असं बारसं केलय.
आज जेवायला तवा राईस आणि कढी.
आज जेवायला तवा राईस आणि कढी. मला आवडला चवीला. मसाले बिसाले करा नी परता कटकट नाही. सुटसुटीत आहे एकदम.
थांकू थांकू सायोबाई
थांकू थांकू सायोबाई
फोडणीच्या भाताबद्दल अनुमोदन
फोडणीच्या भाताबद्दल अनुमोदन दोघींना.
मस्त वाटतोय. पुण्यात एक पालक प्युरी घातलेला पण भात एकदा खाल्ला होता तो काय असेल बरे?
पालकराईस ए मस्त लागतो हा भात
पालकराईस
ए मस्त लागतो हा भात बरं!
कधी एकदा करुन पहाते असं झालय
कधी एकदा करुन पहाते असं झालय मला.......... मस्त वाट्टेय रेसिपी
मामी, माझ्या एका मैत्रिणीने
मामी, माझ्या एका मैत्रिणीने मला एकदा कोथिंबीर भातही खायला दिला होता. अर्थात तो ही चांगला वाटत होता.
@मंजू >>>>नक्की करुन बघ. कारण तसं ह्या भाज्या असतात आपल्याकडे आणि तयारीही फार नाही. भाज्यांच्या बाबतीत थोडा उन्नीस बीस झालं तर ठीकाय. म्हणजे माझ्याकडे नेहमी सिमला मिरची असतेच असं नाही, मग ती नेहमी घालतेच असं नाही. पण सिमला मिरचीचा स्वाद चांगला लागतो.
पण सिमला मिरचीचा स्वाद चांगला
पण सिमला मिरचीचा स्वाद चांगला लागतो >> हो ग, हॉटेलमध्ये पण सिमला मिरची घालतातच, उद्या करणारे मी
ह्यात लसूण नाही लागत का
ह्यात लसूण नाही लागत का घालायला? बाहेर रंगीबेरंगी असा छान दिसतो हा राईस...
माझा नवरा म्हणतो पावभाजीची भाजी उरल्यावर त्यात भात परतून देतात तो तवा राईस
मी काल रात्री केला होता जरा
मी काल रात्री केला होता
जरा झणझणीत बनवला होता.. मस्त लागत होता..
नाही मंजू, ह्यात लसूण घालायची
नाही मंजू, ह्यात लसूण घालायची अजिबात गरज नाही. असाच तो एकदम चविष्ट लागतो त्यामुळे वेगळं काहीच घालायची गरज नाही.
बाहेर कदाचित पावभाजीची भाजी नाही, पण पावभाजीच्या तव्यावरच करत असतील.
पण पावभाजीच्या तव्यावरच करत
पण पावभाजीच्या तव्यावरच करत असतील. >> हो पावभाजीची भाजी करायच्याच तव्यावर करतात, म्हणुन तो पण स्वाद त्यात मिक्स होतो
Pages