मी जिवंत आहे!
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
11
तर आज सकाळी मि उठलो तेंव्हा हात पाय हलत होते, माझेच! श्वास ही चालु होता.... म्हटले मी जिवंत आहे!.... संदर्भ- पु.लं.:)
पुण्यात स्फोट झाले (ते कुणी केले हे पण लगेच कळले) अन मग आमचे 'हात' कुठे गेले ते कळले नाही, पण 'दुसर्यांचे हात' आमच्या अंतर्वस्रांपर्यंत पोचले हे कळले.
मी मेलो नाही हे पाहुण आनंद वाटला.
***
भावनिक वाद उकरुन फुकाचा गोधळ घालणार्यांनी सुरक्षा यंत्रणेला त्यांचे काम करु दिले तर कदाचित मी अजुन बरीच वर्षे दररोज जिवंत राहील. पण कसले काय? धर्माच्या नावावर ते पेटवतात अन प्रांताच्या नावावर हे पेटवतात- शेवटी मरतो मीच! जिवंत असे पर्यंत!
एकदा मेलो कि सगळे प्रश्न सुटतील
***
काल एका मराठी कुटुंबाकडे जेवायला गेलेलो होतो. तिथे काल परवा च्या घटणेवर चर्चा झाली. ते म्हणाले, "कठीण आहे!" पण पुढे लगेच म्हणाले.. "अहो, हे नेहमीचेच आहे!"
विषय:
प्रकार:
शेअर करा
बॉम्बस्फोटातून बचावलो मी
बॉम्बस्फोटातून बचावलो मी भाग्यवंत आहे
मन केंव्हाच मेलेल तन मात्र अजुनही जीवंत आहे.
अजुनही जिवंत राहिल्याबद्दल
अजुनही जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन....
भावनिक वाद उकरुन फुकाचा गोधळ घालणार्यांनी सुरक्षा यंत्रणेला त्यांचे काम करु दिले तर कदाचित मी अजुन बरीच वर्षे दररोज जिवंत राहील.
काल दुरचित्रवाणीवर लोकशाहीच्या पाचव्या स्तंभाचा जो गोंधळ चालु होता तो पाहता हे सुख फार दिवस लाभायचे नाहीय असे वाटतेय.....
अभिनंदन!
अभिनंदन!
असलं जिवंत असणं काय नसणं काय
असलं जिवंत असणं काय नसणं काय सारखंच..
असलं जिवंत असणं काय नसणं काय
असलं जिवंत असणं काय नसणं काय सारखंच..
>> एकझॅक्टली!
मागच्या आठवड्यात एका पोलीस अधिकार्याशी बोलताना २०१० ला हल्ला 'ड्यु' आहे, असे बोललो होतो. तो हसला! काळजी घेतोय, सर्वांचीच मदत आवश्यक आहे असे त्याचे मत....मग आज त्याला आठवण करुन दिली. तो पुन्हा हसला.. असहायतेने.
<< तो पुन्हा हसला..
<< तो पुन्हा हसला.. असहायतेने. >>
असलं जिवंत असणं काय नसणं काय
असलं जिवंत असणं काय नसणं काय सारखंच.. >>>
======================
अरे ये जीना भी कोई जीना है लल्लू ... हा एं ...
अन मग आमचे 'हात' कुठे गेले ते
अन मग आमचे 'हात' कुठे गेले ते कळले नाही, पण 'दुसर्यांचे हात' आमच्या अंतर्वस्रांपर्यंत पोचले हे कळले.
आता जरा काळजी घेतली पाहिजे ...पाणी गळ्यांपर्यत आलं आहे ...
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म...
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म...
''भावनिक वाद उकरुन फुकाचा
''भावनिक वाद उकरुन फुकाचा गोधळ घालणार्यांनी सुरक्षा यंत्रणेला त्यांचे काम करु दिले तर कदाचित मी अजुन बरीच वर्षे दररोज जिवंत राहील. पण कसले काय? धर्माच्या नावावर ते पेटवतात अन प्रांताच्या नावावर हे पेटवतात- शेवटी मरतो मीच! जिवंत असे पर्यंत!''
हे अगदी खरं आहे. वर हे फुकाचा गोंधळ घाळणारे म्हणणार - सुरक्षा यंत्रणा नको त्या कामात व्यस्त आणि चुस्त असते. देशावर सतत अतिरेकी हल्ल्यांचे सावध असताना पुन्हा सुरक्षा यंत्रणेवरील ताण आणखी वाढवू नये हे या जहाल देशभक्तांना कसे कळावे? मुळात देशातील सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीची तोडफोड हेच ज्यांचे एकमेव कार्य आणि भारतीय संस्कृतीचे गोडवे गात त्यात न बसणारी अर्वाच्य भाषा वापरणे हा शूरपणा; स्वतः फक्त देशभक्तच नाहीत तर सगळ्यांसाठी देशभक्तीचे नियमही तेच ठरविणार. (नियम म्हणजे काय काय करायचे नाही ते; काय करायचे ते कुठे माहीत आहे?). टीव्ही मालिकांचा कंटाळा आला की बातम्या बघणार्यांचा, ज्यांना ना याची झळ पोचत, ना त्यात उतरावे लागत,खुर्चीत बसल्या बसल्या पाठिंबा.
चम्प्या, अस्ले लेख
चम्प्या, अस्ले लेख लिहीण्यापेक्षा तत्काळ नजिकचे लाईफ इन्श्युरन्सचे दुकान शोध वा बान्गड्यान्चे दुकान तरी शोध!
साल्या तु "चम्प्याच" शेवटी! आयडीच तशी घेतलीस!
दारच्या मारुतीपुढे मी एकच भिक्षा रोज मागतो, साला जगतोय फुकट्/फाकट भणन्गासारखा, निदान मरण तरि फाल्तुमधे नको रे देऊस, किमान धाविस शत्रून्ना खपविल्याशिवाय मला मरण नको, तसे खपवायची इर्षा सतत जिवन्त राहूदे माझ्यात! जशी ती "तुकाराम ओम्बळेमधे" शेवटच्या क्षणापर्यन्त होती!
हत्त तुमची साल्यो! बान्गड्या भरा असली रडगाणी गाण्यापेक्षा!