Submitted by दीप्स on 8 January, 2010 - 00:21
भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला
मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लग्नाला आता पाच वर्षं झाली
लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>> या वाक्यासाठी आगाऊला पाच गावे इनाम!!!
छान बीबी!! मी पण नंतर लिहेन. वेळ मिळाला की!!
आता कोनाकोनाच्या पांचट
आता कोनाकोनाच्या पांचट श्टोर्या वाचाव्या लागणार काय की !
आगाऊ, अरे भावा, <<<ती पुण्यात
आगाऊ, अरे भावा,

<<<ती पुण्यात शिकलेली, त्यातही एसपीत,त्यात कोकणस्थ,त्यात एकारांत >>
म्हणुनच तिला तू एकट्याने आईस्क्रीम खाल्लंस त्याचं काही वाटलं नसेल. इंप्रेस झाली असणार ती प्रचंड
दीप्स, छान बाफ. मी पण लिहितेच माझी श्टोरी वेळ मिळाला की.
टीप: माझा नवरा पण एकारांत कोकणस्थ आहे.
छानच लिहलय...... <<<<लग्नाला
छानच लिहलय......
...
<<<<लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>>
ओ सक्षम दळवी, तुम्हाला आवडत
ओ सक्षम दळवी,
तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही इथे येता कशाला? इथे कोणीही पांचटपणा करत नाहीये. स्वतः वरुन जगाची परीक्षा करु नये ...
<<आता कोनाकोनाच्या पांचट
<<आता कोनाकोनाच्या पांचट श्टोर्या वाचाव्या लागणार काय की ! >>
मला सरदारजीचा केळ्याची साल बघून "साला आज फिरसे गिरना पडेगा" वाला डायलॉग आठवला....:फिदी:
अम्या भाग्या लिहिच.
अम्या
भाग्या लिहिच.
देसाई, सह्ही! दिपड्या, नविन
देसाई, सह्ही!
दिपड्या, नविन वर्षात चांगलं काम केलस हो हा बाफ सुरु करून!
बाकी प्रेमवीर, विवाहशूर, अभिनंदन :फिदी:!
असुदे...... पडून बघुदे
असुदे...... पडून बघुदे त्याला!

>>>>> <<<ती पुण्यात शिकलेली, त्यातही एसपीत,त्यात कोकणस्थ,त्यात एकारांत >>
>>>>>म्हणुनच तिला तू एकट्याने आईस्क्रीम खाल्लंस त्याचं काही वाटलं नसेल. इंप्रेस झाली असणार ती प्रचंड <<<<< अगदी अगदी!
दिप्या, भन्नाट, नशिबवान आहेस लेका!
>>>>>>दिप्या, भन्नाट, नशिबवान
>>>>>>दिप्या, भन्नाट, नशिबवान आहेस लेका!

खरं आहे लिंब्या.. पण दिप्याच्या बायकोच्या नशीबाच काय?? बिच्चारी..
धन्स लोकहो. काल जेव्हा
धन्स लोकहो. काल जेव्हा बायकोला मी हे पोस्ट करणार आहे असं सांगितलं तेंव्हा ती जाम आश्चर्यचकित झाली कारण तो माझा स्वभाव नाही पण माबो नक्कीच एक अशी जागा आहे जिथे माझ्यासारखा इंट्रोव्हर्टदेखील मोकळा होऊन या गोष्टी आरामात सांगू करु शकतो.

म्हणुनच तिला तू एकट्याने आईस्क्रीम खाल्लंस त्याचं काही वाटलं नसेल. इंप्रेस झाली असणार ती प्रचंड >>> इंप्रेस वगैरे नसलं तरी मला 'पोरी फिरवायचा' काहीही अनुभव नाही हा निष्कर्ष मात्र तिने नक्कीच काढला.
नंदिनी, पाच गावांची लिस्ट पाठवत आहे
(No subject)
<<माबो नक्कीच एक अशी जागा आहे
<<माबो नक्कीच एक अशी जागा आहे जिथे माझ्यासारखा इंट्रोव्हर्टदेखील मोकळा होऊन या गोष्टी आरामात सांगू करु शकतो. >>
तुला मोदकांची फ्याक्टरी बक्षीस ह्या वाक्यासाठी मित्रा...
स्वतःवर विश्वास असल्याखेरीज दुसर्यावर विश्वास ठेवत नाही माणूस, या साईटवर मात्र मैत्रीसाठी पुठे केलेला हात कधीच झिडकारला गेला नाही किंवा खर तर हात आपणहूनच पुढे आले ....
सगळ्यांचे अनुभव वाचून खूप छान
सगळ्यांचे अनुभव वाचून खूप छान वाटलं.
<<<<लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>>
हे वाक्य खूपच आवडलं.
थोडावेळ झाला की मी पण लिहिते माझा अनुभव.
लिही की लवकर
लिही की लवकर
थोडावेळ झाला की मी पण लिहिते
थोडावेळ झाला की मी पण लिहिते माझा अनुभव.
>>>>>>>>
अजुन थोडा वेळ वाट्ट पहा.
मला पण लिहायचय. माझ लग्न ८ दिवस चालु होत. ते लिहायला मला पन्नास दिवस लागतील.
आगाउ तुमचे पोस्ट खूप आवड्ले.
आगाउ तुमचे पोस्ट खूप आवड्ले.
हौसा फकस्त लग्नाचचं लिव्ह
हौसा फकस्त लग्नाचचं लिव्ह नायतर भलतचं लिव्हशील
, आन त्या मालाकाकु परत म्हणत्याल " मला नाही आवदले फाल्तु "
दाजीबा आस काहुन बोलुन राह्यले
दाजीबा आस काहुन बोलुन राह्यले वो तुमी तुमची गोश्ट सांगा की आवडीन वाचीन म्हंते आमच्या आक्काला लै तरास देता बावा तुमी
छान श्टोर्या
छान श्टोर्या
आगाउ, मस्तच
आगाउ, मस्तच पोस्ट.
<<<<लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>>
हे वाक्य खूपच आवडलं.
अरे वा दहा वर्षानीसुद्धा मी
अरे वा दहा वर्षानीसुद्धा मी सुरु केलेला हा बीबी तन्दुरुस्त आहे तर! दीपूर्झा जुन्या मायबोलीवरून ह्याचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद! रमणी आणि आगाऊ - सहीच आहेत अनुभव!
आणि हो मायबोली साइट्च अशी आहे की जिथे अनोळखी चेहर्याचे पण अत्यन्त दुर्लभ विश्वासू मित्र्-मैत्रिणी भेटतात!
<<<<लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>>
आगाऊ! गुड प्वाइण्ट! तुला १०० पैकी १०० मार्क
मी जेव्हा माझ्या तेव्हा होणार्या (आणि आत्ता झालेल्या! हो उगीच गैर्समज नको:)) बायकोला पहिल्यांदा प्रत्यक्ष तिच्या ऑफीसमध्ये भेटलो तेव्हा जर का सिक्युरिटी कॅमेरे असते तर ते फूटेज पाहून बघणारा हसून हसून फुट्ला असता
दृष्य असे की ती मला तिच्या ऑफिसच्या खाली भेटणार होती पण वेळ झाली तरी ती येइना (किन्वा मला धीर धरवेना) मग मी सरळ तसाच आत गेलो. विचारत विचारत शेवटी इष्ट जागा सापडली. तेव्हा त्यान्च्या ऑफीसमध्ये construction चालु होते त्यामुळे तिथे एका लहानशा रुममधेच ४-५ जण बसत होते. शेवटी मला ते दार दिसले की जे मी उघडल्यावर मला 'ती' दिसणार. छातीत डबल स्पीडने धडधड वाढलेली. मी दार उघडले आणि समोरच ती दिसली. काहितरी कलीगला सान्गून कटण्याच्याच तयारीत असलेली. तिने मला पाहिले नी मी तिला. तिच्या चेहर्यावर भूत बघितल्यावर होतात असे भाव आणि माझी तर बोबडी वळलेली! शेवटी त्या कलीगनेच मला बसायला खुर्ची दिली. मी फक्त पाणी एवढेच बोललो. कोणी दिली आठवत नाही पण मी आक्खी बिसलेरीची बाटली ढोसली (अन्य बाटल्या मी ढोसत नाही..) तरी माझी तहान थाम्बली नाही पण आणखी मागावे तर वाइट दिसेल म्हणुन मी तसाच राहिलो.
आमचे ह्याअगोदरचे बोलणे मायबोली आणि याहूने सुसह्य केले होते म्हणुन बरे नाहीतर ह्या आगाऊसारखाच काहीतरी आगाऊपणा ... सॉरी ... वेन्धळेपणा केला असता!
असो तर अशी ही कथा! आता अमृताला हा प्रसन्ग किती आणि कसा आठवतो कोणास ठाऊक
अरे वा! म्हण्जे अमृता-किरण
अरे वा! म्हण्जे अमृता-किरण जोडी आहे का.
अरे वा छान.
आँ, हौसाक्का? हे काय झालं हो?
आँ, हौसाक्का? हे काय झालं हो? एकदम 'सुद्द' भाषेत आलात? तथाकथित ग्राम्य मराठीत बोलायचं बेअरिंग सुटलं की 'हौस' भागली?
मला सगळ्या भाषा येतात. जाळ
मला सगळ्या भाषा येतात. जाळ काढायची भाषा पण येते म्हटलं.
-------------------------------
भटुड्यला चिंता दक्षिणेची.
अरे वा, मजा येतेय सगळ्यांचे
अरे वा, मजा येतेय सगळ्यांचे अनुभव वाचायला. माझा अनुभव लिहायचा तर गेल्या सात जन्मांची कथा लिहावी लागेल.:) सहज चेष्टा करत होते.
पण आमच्या लग्नाची कथा लिहायची तर लग्नाची नऊ वर्षं आणि लग्नाआधीची सात वर्षं लिहायला लागतील्.(आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखून आहोत बरं:)) तेव्हा निवांत लिहीन कधीतरी.
अभिनंदन दिपुर्झा! छान आहे
अभिनंदन दिपुर्झा! छान आहे तुझ्या लग्नाची गोष्ट!
हे काय आक्का, भाषेबरोबर इनोदी
आणि जाळ वगैरे काढण्याच्या गप्पा तुम्ही करु नका ते हास्यास्पद वाटतं.
तूला घृणास्पद म्हणायचय का
तूला घृणास्पद म्हणायचय का आगावा ?
जाउदेत रे, जे मुळात नसत ते फळात येत नाही. फोलपटं गळायला लागली आहेतच.....
प्राची होऊन जाउदे की वाट
प्राची होऊन जाउदे की वाट कशाची बघतेयस? उणे सात वर्षांपासून चालू कर!
Pages