Submitted by दीप्स on 8 January, 2010 - 00:21
भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला
मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिप्या एकदम फिल्मी श्टाईल,
दिप्या एकदम फिल्मी श्टाईल, माझी शंका खरी होती तर (कॉलेजातली )
रमणी एकदम व्ह्युजवलाईज केल
दिप्या हा धागा उघडलास ते
दिप्या हा धागा उघडलास ते अब्रच केलस रे.
मी ह्याआधीही एकदा लिहिल होत पण ते वाहत्या बीबीवर होत. शिवाय जुन्या मायबोलीत.
थोडा वेळ मिळुदे. मी नक्की लिहितो रे.
प्रयोग, रमणी
मस्त आहे हा धागा. लग्न
मस्त आहे हा धागा. लग्न जमण्याच्या वेगवेगळ्या गमती जमती वाचायला मिळतील. माबोकर मित्र मैत्रिण म्हणून शेअरकरण्याजोगे अनुभव वाचायला मिळू शकतात इथे
>>>माझे लग्न पन लव्ह मॅरेज पन
>>>माझे लग्न पन लव्ह मॅरेज पन मी असं लिहु धजनार नाही चारचौघात
सक्षम, मग एकटे बसुन लिहा ना
दक्षिणा ला मोदक
रमणी दक्षे, तुला माझ्याकडून
रमणी
दक्षे, तुला माझ्याकडून सर्व प्रकार्चे (म्हंजे उकडीचे, तळ्णीचे, खव्याचे वगैरे) मागिशील तेवढे मोदक
पोट भरलं मोदक खाऊन, आता
पोट भरलं मोदक खाऊन, आता आपापल्या ष्टोर्या लिहा...
सख्या, माला दाते, तुम्ही नका
सख्या, माला दाते, तुम्ही नका वाचु हा बाफ! आणी ज्यांना आवडला नाही ते लोक सांगतील ना!
आमच्यासारख्यांना आवडला आहे.
प्रयोग, तुमच्या लग्नाची गोष्ट छान साधी सरळ आहे. एकदम प्रामाणिक्!उडवायची नव्हती ती पोष्ट. दीपुर्झा, छान विषय सुरु केलात. रमणी :))
हा सच्या वाचकांसाठी आणि
हा सच्या वाचकांसाठी आणि सच्च्या लेखकांसाठी आहे, दिप्या मनापासुन आहे रे पण जरा जपुन, काही अति व्यक्तीगत जाहीर करत नाहीस ना ह्याची खबरदारी घे, सगळ एक्सारखे नसतात
मस्त आहे हा धागा !! मला पण
मस्त आहे हा धागा !!
मला पण माझी स्टोरी सांगायला आवडेल ... ( वेळ मिळाला कि लगेच टाकीन.....)
" एका लग्नाची गोष्ट" सह्ही
" एका लग्नाची गोष्ट" सह्ही आहे . अगदी पिक्चर स्टाईल . आवडलं रे दीपुर्झा .
योगेश मी तुझी पोस्ट मिसली रे .
ज्यांना हा बी बी आवडला नाही त्यांना कुणीतरी जुन्या मायबोलीवरचा " क्रश " चा बी बी भेट द्या .
'एका लग्नाची गोष्ट' हा बाफ
'एका लग्नाची गोष्ट' हा बाफ जुन्या हितगुज वर माझ्या नवर्याने किरणने उघडलेला.. आमच इथेच माबोवर लग्न जमल. त्याने अगदी साग्रसंगित गोष्ट लिहण्यास सुरवात केली पण तेव्हा नविन नविन लग्न झाल्याने मला काही ते योग्य वाटल नाही नी मी त्याला टोकुन न लिहिण्यास भाग पाडल. पण आता काही वाटत नाहिये तुमच्या गोष्टी वाचायला मजा येइल. मी पण वेळ झाला कि टाकेनच.
>>ज्यांना हा बी बी आवडला नाही
>>ज्यांना हा बी बी आवडला नाही त्यांना कुणीतरी जुन्या मायबोलीवरचा " क्रश " चा बी बी भेट द्या >> श्री क्रशचा बीबी काहीच नाही.... पहिल्या चुंबनाचा बीबी पण होता जुन्या हितगुजावर..
दिप, शेवटी 'लक्ष्मी आली घरा'
दिप, शेवटी 'लक्ष्मी आली घरा' छान लिहिला आहेस आयुष्यातला खराखुरा प्रसंग. रजिस्टर्ड पद्धतीचा तुंम्हा दोघांचा आग्रहहि मला एकदम बरोबर वाटला.. थाटामाटात लग्न म्हणजे पैशाचा खरा अपव्ययच. अशे प्रसंग इतरहि मायबोलीकरांचे वाचावयास जरुर आवडतील.. त्यातुन कुणाला घेता येण्यासारख्या गोष्टीहि असतील नक्कीच.
भागो शी सहमत. इथल्या सगळ्या
भागो शी सहमत. इथल्या सगळ्या गोंधळात आणि मोदक खाण्याच्या नादात
दिप्याच्या ष्टोरीला कौतुकाचे ४ शब्द बहाल करायचे राहून गेले.
श्री क्रशचा बीबी काहीच
श्री क्रशचा बीबी काहीच नाही.... पहिल्या चुंबनाचा बीबी पण होता जुन्या हितगुजावर..<<
तो बीबी पण सुरूवातीला चांगल्या नोट वर होता मग 'एकसारख्या' नसलेल्या काही लोकांनी राडा केला त्याचा.
नीदी, मला वाटलंच होतं तु इथे
नीदी, मला वाटलंच होतं तु इथे नक्की चक्कर टाकणार ते..
अगं तुला म्हण माहित नाहि का? निंदकाचे घर असावे शेजारी?
गरजू घेतीलच...
दिप्याचा किस्सा मस्तच आहे,मला
दिप्याचा किस्सा मस्तच आहे,मला रमणीचा किस्साही आवडला माझ्या सासर्यांची आणि माझी पहिली भेट आठवली!
रमणी आगावा सगळ्यांनी "आता
रमणी
आगावा सगळ्यांनी "आता तू लिहि" असा आग्रह करावा असं तुला वाटतय का ?
आगाउ, मग ती भेटपण येउद्यात की
आगाउ, मग ती भेटपण येउद्यात की इकडे!
लिहीतोय,लिहीतोय उद्या नक्की
लिहीतोय,लिहीतोय उद्या नक्की टाकेन!
मी पुण्यात पोस्ट्ग्रॅड करत
मी पुण्यात पोस्ट्ग्रॅड करत होतो, आणि फ़र्स्ट इअरला पहिला वगैरे आल्याने सॉलीड नाक वर करुन चालायचो! त्यामुळे सेकंड इअरच्या पोरींकडे ल़क्ष देणे एकदम नामंजूर होते.वर्ष संपतासंपता आस्मादिकांना अशी लख्ख जाणिव झाली की आता शिक्षण संपलं आणि आपण एवढ्या वर्षात एकाही पोरीबरोबर 'एकटे' साधे आईस्क्रिमदेखील खायला गेलो नाही (ग्रुपमधे भरपूर पण हे असं मात्र जमले नव्हते). आणि एकदम आत्तापर्यंत कधीही न लक्षात आलेली ती दिसली. माझ्या स्नॉबिश वागण्याचा या पोरीला जाम राग यायचा. आणि बिलिव्ह इट ऑर नॉट पण आख्या वर्षात आम्ही एकमेकाशी एक शब्दही बोललो नव्हतो. ती पुण्यात शिकलेली, त्यातही एसपीत,त्यात कोकणस्थ,त्यात एकारांत म्हणजे देशस्थांच्या दृष्टिने जाम अवघड काँबिनेशन! आमच्या सेंडऑफ़च्या दिवशी मी अत्यंत ब्लंटली तिला संध्याकाळी फ़िरायला येणार का म्हणून विचारलं आणि नकार पूर्ण अपे़क्षीत असतानाही ती हो म्हणाली. आता आली का पंचाईत! कारण ती नाही म्हणणार हे मी इतकं गृहीत धरलं होतं की पुढचा काही प्लॅनच नव्हता; मग धावपळ! रुमवर परत येऊन जास्त ’अनुभविक’ मित्रांकडून चांगल्या आइस्क्रिम पार्लरची माहिती काढली आणि गेलो एकदाचा.एवढं सगळं झाल्यावर मी अगदी टेचात तिला विचारलं 'कोणतं आइस्क्रिम खाणार?' त्यावर ही मुलगी मला चिल्लरमधे काढत शांतपणे म्हणते ’मी कधीच आइस्क्रिम खात नाही’ आता यावर कोणताही शहाणा मुलगा पोरीला दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेला असता पण मी मात्र, ओके! असं म्हणून तिच्यासमोरच बसून शांतपणे माझं आइस्क्रिम संपवलं. व्हॉट अ डेट!
पण या पहिल्याच दणदणीत सलामीने काही गोष्टी दोघांनाही स्पष्ट कळल्या जसे की- ह्याचे सोशल एटीकेटस शून्य आहेत आणि हा जसा आहे तसाच वागतो,नो प्रिटेन्स,नो मास्क. ही मुलगी खमकी आहे,स्वतःच्या डोक्याने चालते,नो नॉनसेन्स, इंपॉसिबल टू ओव्हरव्हेल्म.
त्यामुळे एवढं सगळ होऊनही आम्ही भेटतच राहिलो आणि जवळजवळ ५ महिन्यांनी लग्नाचा निर्णय झाला,त्यातच एकदा मी काहीही न कळवता धडक तिच्या घरी गेलो,माझ्या सासर्यांनी माझा हा आगाऊपणा सहन तर केलाच पण त्यावेळी कवड्या कमवणार्या मला पूर्ण विश्वासाने त्याच दिवशी त्यांच्या घराचा सदस्य करुन टाकले. माझ्या आई-बाबांचेही लव्ह मॅरेज त्यामुळे पिताजी तर माझ्यापे़क्षाही एक्सायटेड! लग्नाचा निर्णय माझा मी घेतल्याने ते तसेही खूश होते कारण ’तुझ्यासारख्या पोरासाठी मुलगी शोधणं मला जमलं नसतं’ असा त्यांचा स्पष्ट निर्वाळा आहे! हा माझ्या आयुष्यातला मी घेतलेला एकमेव योग्य निर्णय आहे असेही त्यांचे खाजगीत मत आहे!
प्रत्यक्षात लग्न व्हायला पुढे चार वर्षे लागली.त्याकाळात आम्ही शिक्षण- नोकरीच्या मागे वेगवेगळ्या गावात होतो. पण त्या अंतरांनी आमची जवळीक आणि अंडरस्टँडींग जास्त वाढवलं. त्याचवेळी लग्नात दोन्हीकडच्या लोकांचे एकमेकाशी पटणे किती क्रिटीकल असू शकते ते ही कळले. आमच्याकडे म्हणजे ’लग्न ठरलेय’ हे एवढ्यात कुठे सांगू नका हा आग्रह तर तिच्या घरी कधी एकदा आख्या गावाला कळवतो अशी धांदल! कल्चरली, शैक्षणिकदृष्ट्या आमची घरं एकदम वेगळी. टीपिकल देशस्थ-कोकणस्थ मेंटालीटीचे वाद अर्थातच होते.पुन्हा तिच्या पालकांना मी आणि माझ्या पालकांना ती एकदम पसंद! त्यामुळे मोठ्यांमधले घोळ मिटवायला आम्हीच! पण तेंव्हापासून शक्यतो दोन्ही बाजूंना सुरक्षीत अंतरावर ठेऊन ’गुटोंकी मुटभेड’ टाळण्याचाच आम्ही प्रयत्न करतो. तरीही लग्न करताना कमी खर्चाचा आमचा हट्ट दोन्ही बाजूंनी बर्याच प्रमाणात पुरवला हे ही खरेच.
लव्ह अॅट फर्स्ट साईट असं होत असेलही कदाचित पण मला विचाराल तर त्याच व्यक्तीच्या प्रेमात वेगवेगळ्या कारणासाठी पुन:पुन्हा पडण्यात जास्त मजा आहे, लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!
वाह! आगाऊ! भाग्यवान आहेस..
वाह! आगाऊ! भाग्यवान आहेस.. निदान तू तरी.. तिला शेप्रेट भेटलं पाहिजे.. पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम खाणार्या मुलावर प्रेम कसं बसलं विचारायला..
पण त्या अंतरांनी आमची जवळीक
पण त्या अंतरांनी आमची जवळीक आणि अंडरस्टँडींग जास्त वाढवलं.<<<
डिट्टो!!
लव्ह अॅट फर्स्ट साईट असं होत
लव्ह अॅट फर्स्ट साईट असं होत असेलही कदाचित पण मला विचाराल तर त्याच व्यक्तीच्या प्रेमात वेगवेगळ्या कारणासाठी पुन:पुन्हा पडण्यात जास्त मजा आहे, लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो >> अगदीच
मस्त लिहिलयस.
पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम खाणार्या मुलावर प्रेम कसं बसलं विचारायला.. >>
पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम
पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम खाणार्या मुलावर>>>
कळाली कळाली आगाउची उत्पत्ती कळाली.
पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम
पहिल्याच भेटीत एकटा आईस्क्रीम खाणार्या मुलावर प्रेम कसं बसलं विचारायला.. >>
आशुडे, तुझ प्रश्न मलाही पडलाय.
आगाऊ,
>>त्याच व्यक्तीच्या प्रेमात वेगवेगळ्या कारणासाठी पुन:पुन्हा पडण्यात जास्त मजा आहे, लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!>>
एकदम मनापासुन पटलं!
>>त्याच व्यक्तीच्या प्रेमात
>>त्याच व्यक्तीच्या प्रेमात वेगवेगळ्या कारणासाठी पुन:पुन्हा पडण्यात जास्त मजा आहे, लग्नाला आता पाच वर्षं झाली आणि मी अजूनही दररोज परत तिच्या प्रेमात पडतो!
छान लिहिल आहेस, आगाऊ.
(अरे पण तुला आगाऊ म्हणायला कसतरीच वाटतं. )
छान झाली 'डेट' साजरी. त्यातुन
छान झाली 'डेट' साजरी. त्यातुन एकमेकांना हव्या असणार्या स्वभावाची तरी ओळख झाली.. इथे आगाऊ (हो खरच म्हणायला कसतरीच वाटतं) च्या लग्नातहि पैशाचा अपव्यय टाळला.. छान लिहिलय नेटकं.
आगाउ छान आहे हे. मलाही माझ्या
आगाउ छान आहे हे. मलाही माझ्या लग्नाची गोस्ष्ट लिहायला आवडेल.
मस्त लिहिलय रे आगाउ
मस्त लिहिलय रे आगाउ
Pages