भारतीय रेल्वे
मला भारतीय रेल्वेची एक गोष्ट अगदी लहानपणापासून आवडत आलेली आहे. ती म्हणजे त्यांना दिलेली नावे. नद्यांची नावे, ग्रंथांची नावे, इतिहासातील प्रसिद्ध घटनांची नावे, ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले अशा महान नेत्यांची नावे, कवींची नावे, लेखकांची नावे. देशातील एका गावातील लोकांना दुसर्या गावात पोचवताना रेल्वे आपल्या सोबत भाषा, संस्कृती, माणसे, धर्म, अन्नधान्य -- काय काय वाहून नेते!
मी इथे भारतीय रेल्वेवर एक कविता लिहित आहे जी अजून पुर्ण व्हायची आहे. मला वाटतं या कवितेत कडवे जमवायला मला तुमची देखील मदत मिळू शकेल. बघा प्रयत्न करुन. धन्यवाद!
पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा
इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'
टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी
बी, तो कंपुशाही बा.फ. तूच
बी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो कंपुशाही बा.फ. तूच उघडला होता काय?
....
....
.....
.....
....
....
रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर
रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध? उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची !
दिल्लीची राजधानी मी मी
दिल्लीची राजधानी मी
मी नेताजींची आझाद हींद
कोल्हापुरची महालक्ष्मी मी
मी गांधीजींची अहिंसा
बी, लिस्ट फ़ार मोठी आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा छान्.प्रकाशच्या चार ओळी पण
वा छान्.प्रकाशच्या चार ओळी पण छान.
कोकणची कोकणकन्या मी
सोलापुरी सिद्धेश्वर
उज्जैनची अवंतिका मी
एंम्.पी .यु .पी.फ्राँटीयर
कविता लांबलचक होईल, ट्रेन्स
कविता लांबलचक होईल, ट्रेन्स अॅट अ ग्लान्स घ्या विकत आता बी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर
>रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध? उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची !
या पानावर त्याने कंपुशाही बद्दल एक स्वगत (अॅडमिन ला तक्रार) लिहीलं होत, ते आता गायबलय.
ओ पाहुणं, हा चमत्कार कसा झाला ते बीलाच विचारा...
Prakasha, Chhaya, thanks a
Prakasha, Chhaya, thanks a lot![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ajoon kuNala kahi suchat kaa?
बोगद्यात घुसमटते जरी तरी
बोगद्यात घुसमटते जरी
तरी 'डेक्कन क्वीन'च मी
'रो-रो'कर हैराण जरी
'नेत्रावती ' अजूनही मीं
mastach re...
mastach re...