पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40

पिंपरी-चिंचवडमधली खादाडी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डांगे चौकात.
जर चाफेकर चौकातुन जात असाल तर डांगे चौकाच्या जस्ट अलिकडे डावीकडे आहे.
फक्त व्हेज आहे. तिथला पनीर कस्तुरी मसाला अफलातुन आहे. Happy

केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी चौकातच कोहिनुर आर्केड ह्या बिल्डिन्गमध्ये तळमजल्यावर आहे.
तिथे समोसा छान मिळतो. तिथले लांबट ड्राय गुलाबजामुन देखील छान आहेत.

तिथे समोसा छान मिळतो.<< तिथला सामोसा एकदम छानच
त्या शिवाय तिथली दुध मलई ची मिठाई खुप चांगली असते

भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच

प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले.:स्मित:

प्रदीप स्वीटस चिंचवडस्टेशनसमोरच्या रस्त्यावर पण आहे. अजून हिंजवडी की औंध अश्या ठिकाणी पण नवीन शाखा उघडलीय म्हणे.

काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज>>> पुना गेट हॉटेल मध्ये नॉनव्हेज चांगलं आहे अस मित्र म्हणतात.
मी नेहमीच व्हेज खाल्लय.. पण पार्टीत वै मित्र तिथल्या फिश वर खुश असतात.

रिया, चिन्चवड गावातील बस स्टोप जवळ अरिहन्त मिसळ एकदम मस्त !! एकदा खाल्ली कि प्रेमात पडतो आपण, मिसळिच्या !!

मिसळची ठिकाणं सांगा बर....>>>

दे धक्का
जयश्री

सगळीकडे सकाळी ११ च्या आत नंबर लावावा.
पैल्या धारेची मिसळ उत्तम असते.
नंतर कट / सॅम्पल तितके चवदार रहात नाही.

निशा बागुल , "मालवणी समुद्र" - चिन्चवड टाटा मोटर गेट समोर - मोरे सभाग्रुहा च्या अलिकडे .. दर वाजवी आणि मस्त चव !!

कविंची मिसळ कशीय?>>>>>>>>>>कविं म्हन्जे काय?

होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.

KSB चॉक ते Thermax चॉक मधे.

Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.

पण लॉन मधे जास्त जागा नाहि म्हणुन थोडी वाट पाहवी लागते.......

बाकी उत्तम...........

येस, कामाक्षी इज बेस्ट पण महाग आहे थोडंस!
मला लॉनपेक्षा आत हॉटेलात बसायला आवडलं Wink
फुल्ल प्रायव्हसी! वेटर्स पण जास्त डिस्टर्ब करत नाहीत पण हाकेच्या अंतरावर उभे असतात, बोलावलं की येतात.

प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले. >>>> +१११

निगडी चॉकात प्रदीप मधे उत्तम रसमलाई आणि अन्गुर मलाई आणि सोलकडी मिळते.....

रिया. >>> बरोबर आहे पण हॉटेलात बसल्यावर मोकळी हवा आणि गाणी याचा आनंद नाही घेता येत......

Pages