गुरुद्वारा म्हणजे रेल्वेलाईन क्रॉस करायला हवी >> गुरुद्वारा कमानीतून आत चालत रहायचे. तिथे डाव्या हाताला तुम्हाला एक नंदनवन सोसायटी असा बोर्ड दिसेल. तिथे विचारा.
पेट्रोल पंपासमोरच्या गल्लीत.. अन्नपूर्णी होते त्याच जागी. एवढ चांगल अन्नपूर्णी होत त्याठिकाणी चितळे सध्या तिथे फक्त पेढे, बर्फी आणि ईतर थोडा कोरडा खाऊ मिळतो.
चितळे खरे पुणेरी आहेत, आजिबात त्याना स्पर्धेची भिती नाही, अन्यथा पिंचिं मध्ये काका हलवाई आले, गाडगीळ आले (ज्वेलरी) अनेक लोक आले, पण चितळे यायचे नाव घेत नव्हते
Submitted by डीविनिता on 8 September, 2015 - 04:11
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही.>> पिंपरीत फक्त तवा भाज्या चांगल्या आहेत. सुरुवातीला दालफ्राय बरी असायची. एकदा बिर्याणी आणली तर फक्त प्लेन राईस आणि उकडलेल्या भाज्या होत्या. तुकारामनगरच्या दुकानात तर माज एवढा एकच आयटम जबरी आहे.
सौदागरला हैद्राबाद हाऊस आलंय. बिर्याणी अप्रतिम
टिम लक लक बोगस!
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात त्यामुळे आम्ही टिमवाले सध्या वाढवा वजन मोडात
ट्युलिप, कोकणे चौकात आहे हैद्राबाद हाऊस.बिर्याणी बद्दल +१
रंगाशेठ जाऊन या. नॉनव्हेज खाणारे असाल तर चांदीच तुमची
शिवसागर वाल्यांनी ब्रांच उघडलीये वाकडला
हिंजवडी वरून विशालनगरचा जो टर्न लागतो तिकडे कुठेशी आहे.
पत्ता नीट विचारून सांगते.
याच एरियात एक काशी चाट भंडार आहे. चाट ऑसम मिळतंय तिकडे.आजकाल पनीर कुल्चा सूरू केलाय तोही मस्त.
इंदोर स्वीट्स पण मस्तय. इतके अप्रतिम पोहे/ढोकळा मी कुठेच खाल्लेला नाही कधी.
रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.
मोरया गोसावी मंदिर रोडवर गोखले हॉल समोर खवाय्येगिरी छान हॉटेल चालू झाले आहे
मिसळ मस्त संध्याकाळी वेज क्रिस्पी व क्रिस्पी सीपीसी सारखे एकदम नविन खाद्यप्रकार नक्की जावे असे ठिकाण
पिंपरी चिंचवड मधील खाद्ययात्रा (काही इंटरनेटवरील संदर्भ व काही माझी addition करून ही लिस्ट बनवली आहे)
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - श्रद्धा स्नॅक्स सेंटर चापेकर चौक, चिंचवड गाव, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ , लिंक रोडवर दे धक्का गावडे पेट्रोल पम्प समोर, पिंपरीगावात निसर्ग एक शाखा चिंचवडगाव मंडई शेजारी आली आहे,
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
१०.वडापाव - निगडी प्राधिकरणात 'वासू वडापाव'. कॅम्प एजुकेशन जवळ एक काका हातगाडी लावतात त्यांचा वडापाव पण भारी आहे.
10.A दिवसा फत्तेचंद शाळे बाहेर आणि रात्री चापेकर चौकात मिळणारा दत्त्या चा वडापाव.
10.B लिंक रोड ला डॉमिनोज शेजारी हातगाडी लावतो तो सुद्धा ट्राय करून पहा चांगला आहे.
10.C थरमॅक्स चौकातून चिखली कडे जाताना डाव्या हाताला 'काका वडापाव' पण मस्त.
11. साबुदाणा खिचडी,पोहे,उपमा, इडली चटणी साठी मोरया गोसावी मंदिराजवळ गपचूप वाड्यात सुद्धा हे सर्व अतिशय उत्तम चवीचे आणि वाजवी दरात मिळते. गपचूप कडे उपवासाची मिसळ सुद्धा लै भारी. बटाट्याचा चिवडा,उपासाचे पापड यावर साबुदाणा वडा कुस्करून दाण्याची आमटी घालतात. मस्त लागते. मोरया गोसावी मंदीरा समोरचं 'चिंतामणी' मध्य उपवासाचे थालीपीठ मिळते ते पण छान.
12.गांधी पेठेतील मोरया गोसावी मंदिराशेजारी बालाजी स्नॅक्स सेंटर म्हणजेच कवी मिसळ देखील छान आहे. त्यांचा संध्याकाळी वडा सॅम्पल मिळतो तोही बेस्टच.ज्यांना बेडेकरची मिसळ आवडते तसल्या गोड्या लोकांसाठी पण तिखट मागितली तर झणझणीत पण मिळते.कवी यांची दर चतुर्थीला उपवासाची मिसळ व साबुदाणा वडा एक नंबर.
13.आपल्याला नेवाळे मिसळ देखील आवडते बुवा.अतितिखट असलेला हा प्रकार फारच कमी जणांना झेपते.नेवाळेची मिसळ बरेचं लोक खाऊ शकत नसले तरी मला ती आवडते. अजिबात तिखट न झेपणाऱ्या लोकांनी त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्याची बटाटा भजी मात्र अतिउत्तम. त्या क्वालिटीची भजी अजून तरी मी कुठे इतरत्र खाल्ली नाहीत.
14.गांधी पेठेत नेवाळे मिसळ समोर आणि मशिदीच्या बाजूला (Axis बँक atm शेजारी)असलेला हेंद्री मिसळ जॉईंट पण छान आहे.
15.गांधी पेठेत HDFC ATM समोर मोरया वडापाव एकदम झकास व तिखट चव, वडापाव,भजी,पॅटिस छान असतो आणि गरमागरम मिळतो.
16.रोज् वूड शाकाहारी जेवणं चांगले ,यांचे चायनीज पण छान असते.
18. तंदुरी पदार्थ आणि बिर्याणी साठी सर्वात आवडते आणि सवयीचे चापेकर चौकातले . नॉनव्हेज जास्त आहेत पदार्थ ,व्हेज फार कमी.
19. जिलेबी साठी गांधी पेठेतील यशवंत. यांच्याकडे बाकरवडी पण छान मिळते.
20. प्रदीप स्वीट्स च्या पिंचि मध्ये भरपूर शाखा आहेत. एकंदरीत सर्वचं पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतात.सगळ्यात बेस्ट समोसा व रसमलई
21.निगडी चौकातले गोकुळ स्वीट्स मध्ये देशी शुद्ध तुपातली जिलेबी आणि इमरती मिळते, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल वगैरे टाकून. जबरदस्त लागते.
22.चखणा आयटम घ्यायचे असतील तर 'बंधन स्वीट्स' शाहूनगर बागेजवळ. एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतात.
23.पिंचि मध्ये येत नसले तरी एका स्वीट मार्टचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे परिहार चौक,औंध इथले 'मिठास'. काय जागा आहे राव. ड्राय फ्रुट बासुंदी, सीताफळ रबडी खावी तर इथेचं. बंगाली मिठाईचे तर इतके प्रकार आहेत कि बास्स. खीर कदम आणि संदेश चे भयानक सुंदर प्रकार मिळतील. ते आवर्जून खावेचं, राहिलचं तर कमल भोग आणि घेवर पण लै भारी. एका भेटीत समाधान होण्यासारखे नाहीचं हे ठिकाण.
24. एलप्रो चौका अलीकडे 'चौपाटी' मध्ये चाट चांगले आहेत. थंड पाण्याची पाणीपुरी मिळते, चवीला एकदम मस्त.
25.प्राधिकरणात भेळ चौकाच्या थोडेसे पुढे 'ओम शिव स्वादिष्ट' मधली भेळ,पाणीपुरी आणि रगडा पुरी भारी आहे.
26.पावभाजी,पराठे आणि इतर - गीता स्नॅक सेंटर, शर्मा, नायडू आणि पिंगारा हे तिघे निगडी प्राधिकरणात जवळ जवळ आहेत.पावभाजी सगळ्यांकडे चांगली आहे, गीता मध्ये मस्तानी पण चांगली मिळते. शर्मा कडे मटका कुल्फी आवर्जून खावी अशीचं. पिंगारा मध्ये चीज पराठा सुद्धा आवर्जून खावा असाचं तो हि फक्त 70 रुपयांत. भरपूर चीज भरून देतो.
27.आकुर्डी स्टेशन समोरचं बरेचं प्रसिद्ध असे 'शहाजी पराठा' आहे (तेचं ते लक्ष्मी रोड वाले) पराठे, दही भल्ला,लस्सी एकदम कडक.त्याचे दर मात्र लक्ष्मी रोडच्या शाखे पेक्षा इथे बरेचं जास्त आहेत.
28.. पिंपरी मधले छाया पराठा सुद्धा चांगले आहे. अतिशय स्वस्त आणि मस्त पराठे. 50-60 रुपयांत व्हेज आणि 90 रुपयांत चिकन, खिमा पराठा मिळतो. सोबत बटर,दही आणि ग्रेव्ही सुद्धा येते.
29.घरगुती थाळी हवी असेल तर चाफेकर चौक मधील खरे यांचा सुहास डायनिंग हाॅल. खूप वर्षापासून आहे.
30.अजून एक थाळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे नैवेद्यम. पुणे मुंबई हायवे ला आहे,आकुर्डी खंडोबाच्या माळाजवळ. आधी थाळीनंतर आईस्क्रीम द्यायचे कॉम्प्लिमेंट्री ,आता बंद केलंय
31.हिंदुस्थान बेकरी पॅटिस ,अफलातून व गरमागरम चाफेकर चौकच्या थोडे अलीकडे जनता सहकारी बँक समोर व चितळे स्वीटच्या बाजूलाच
32.ग्लोबल ग्रिल:- सिगरी. पिंपरी सेंट्रलच्या ईमारतीत. बार्बेक्यू नेशन पेक्षा ईथली चव आणि विविधता चांगली आहे
33.रंगोली:- राजस्थानी पदार्थ चांगले मिळतात. दाल बाटी वगैरे. राघवेंद्र स्वामी मठाजवळ.इथली रबडी ,पंजाबी पदार्थ ,खास ओल्या हळदीची भाजी मस्तच ,जरा हटके चव
कोणतीही पंजाबी भाजी तिखट भाजी करायला सांगितली तर अफलातून करून देतात
34. बाबा रामदेव ढाबा:- रंगोलीप्रमाणेच. दाल बाटी मस्त एकदम. जयपुरी गट्टे की सबजी पण झकास. निगडी ट्रांसपोर्ट नगरीत
35.भक्ती शक्ती उद्यान, निगडी ह्याच्या इथे एक चाटवाला गाडी लावतो त्याच्याकडची दहीभल्ला चाट एकदम अनोखी. पाणीपुरीच्या लांबट पुरीमध्ये दहीवडा भरुन त्यावर भरपूर थंडगार दही, चिंचेचं पाणी, तिखट वगैरे भरुन जबरा प्रकार देतो. आलू टिकी चाट पण त्याच्याकडे मिळते.
36.माउली चहा (पिंपरीगाव) आणि नीलम चहा (पिंपरी कॅम्प) अतिशय कडक चहासाठी प्रसिद्ध. मसाला अजिबात नाही. कडक चहा हीच खासियत.
37.हॉटेल सावली, निगडी चौक इथले लसूणी पालक सूप लै भारी. बाकी पदार्थ तसे नेहमीचेच पण चव छान.
38.सॉल्टी चायनिज - मासुळकर कॉलनी हे बहुधा पिंपरी चिंचवडमधलं पहिलं चायनिज सेंटर असेल. हातगाडीपासनं सुरुवात करुन ह्यानं आज छोटेखानी हॉटेल टाकलंय. ह्याच्याकडची अमेरिकन चॉपसुई जबरदस्त. तशी कुठेच खाल्ली नाही.
39.कैलास डेअरी - चिंचवड स्टेशन. ह्याचाकडची ताक, लस्सी अतिसुंदर. संध्याकाळी हाच बाहेर मसाला दूधाची गाडी लावतो. साय टाकलेलं घट्ट मलईदार मसाला दूध, नशिबात असेल तर कधी कधी हा साय टाकलेली कॉफीसुद्धा करुन देतो. ती तर अजूनच भारी.
40.शाहुनगरच्या बागेबाहेर असलेला पवार वडापाव चांगली चव थोडे थांबावे लागते पण समोरच (लगेच तळलेला गरमागरम)मिळतो.
41.पाव पॅटीससाठी प्रेमलोक पार्क मध्ये बेंगलोर साई हाटेलवजा खादाडी केंद्र (मोठ्ठी खूण म्ह़नजे रस्त्यामधल्या पारासमोरच)
42.याच्या शेजारीच श्रीबालाजी स्नॅक्स सेंटर, प्रेमलोक पार्क कडून बिजलीनगर कडे वळताना डाव्या बाजुला दुकानांच्या गर्दीत आहे.सगळ्या चाट प्रकारांसाठी स्वस्त आणि मस्त.यांचा २ वर्षांपूर्वी फक्त एक स्टॉल होता. आता स्वतःच्या जागेत आहे.
43.ढोकळा प्रदीप आणि गावातला वाघेश्वर स्वीट मार्ट.दडपे पोहे आणि कट दोसा गायत्री एक्दम विरूद्ध बाजूल (हिंदुस्थान बेकरीच्या समोर)
44. प्राधिकरणात स्वीट जंक्शन नावाच्या स्वीट मार्टात चांगली कचोरी व समोसा मिळतो ,थोडे वेळ्वेअर ७.३० पर्यंत गेल्यास गरमही लाभतो.
45.चिंचचड लोकमान्य ब्रिज खाली अप्पांचा वडा, प्रतिभा कॉलेज काळभोर नगर समोरील वडा( शेट्टी उद्यान) हे आपल्या घरगुती वड्याच्या चवीसारखे.
46.बारामती वडापाव, अख्या सांगवी/पिंपळे गुरवात वर्ल्ड फेमस आहे. चटणी पण भारी असते त्याची. साई चौकातल्या मंडईत, संध्यकाळीच असतो फक्त.
47.कोयते वस्ती, पुनावळे इथल्या पुरोहित स्वीट्स नामक छोट्या दुकानात कलाकंद मिळतो. माझ्या मते हा जगातला सर्वोत्तम कलाकंद आहे.
48.अस्सल खानदेशी ऑथेटिकेटेड डिश मिळण्याचे ठिकाण !
संभाजी चौक , निगडी
चौकात स्वीट मार्ट आहे त्याच्या विरुद्ध दिशेस , सध्या गणपती बसतो , खालच्या गाळ्यात आहे हे हॉटेल.
बिबडा(coarse papad made from Jowar), चिकनीचे पान(coarse papad made of red Jowar), गुरमई रोटी( a sweet roti made of jiggery infused with cinnamon and special homemade Masala), खानदेशी पुरणपोळी, केळीची भाकरी(Bhakri made with flour made of dried and ground banana), कळण्याची भाकरी(bhakri made of black gram & Jowar), केळीचा बिबडा बिबडा, खानदेशी शेव भाजी, खानदेशी पाटोड्यांची भाजी असे बरेच वेगळा पदार्थ मिळतात
49.चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला.
दिल्ली स्वाद - निगडीत.
आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.
50.गांधी पेठेत परदेशी फरसाण मार्ट एकदम छान आणि ताजे पदार्थ मिळतात.
51.लोडेड बाईट्स - केशवनगर शाळेजवळ
इथले सँडविच ,पास्ता , बर्गर एकदम सुप्पर , सँडविच मेकिंग हटके व अफलातून आहे. काकडी ,टोमॅटो स्लाइस नसतात तर ग्रेटेड मसाला असतो आणि चव।अफलातून. बॉम्बे सँडविच अवश्य try करावेच असे.
52. मिसळीसाठी "जयश्री"
पत्ता : बजाज अॅटो मेन गेटसमोर, आकुर्डी.
त्याला ऑर्डर देताना बोलायच कोल्हापुरी दे किंवा तर्री मारुन दे. दणका सहन करु शकत असाल तरच अशी ऑर्डर द्या. नाहितर नॉर्मल ऑर्डर
53.व्हेज हॉटेल्स मध्ये मला आवडणारे "रसोई से"पत्ता: भेळ चौकाच्या थोडस पुढे उजव्या बाजुला रोड टच.
इथे तंदुर पनीर मध्ये बरीच व्हरायटी आहे. टेस्ट छान आहे. सर्विस चांगली आहे.
54.बे लिफ ब्रिस्टो - जुना जकात नाका , चाफेकर चौक ते बिर्ला हॉस्पिटल रस्तावर -बेसमेंटला आहे सह्हीच आहे...इथला पनीर टिक्का म्हणजे लाजवाब.तस्सेच चायनीज सिझलर्स एक से एक, हॉंगकॉंग व स्लो बोट सिझलर्स मस्ट try. ह्यांच्याकडे आधी अफलातून आईस्क्रीम पकोडा मिळायचा, आता मेनूकार्ड मधून काढून टाकलाय.
55.प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी गंडा राज" कडची इडली आणि डोसे अतिशय स्वस्त आणि मस्त असतात..एकदा नक्की चव बघा
56.प्राधिकरण संभाजी चौकात "cakes and cream " नावाचा दुकान आहे तिथे veg patice आणि cakes पण मस्त असतात
57.मराठा - पुणे मुंबई हायवे वर आहे. तिथे महाराश्ट्रियन जेवन मस्त मीलते. फक्त व्हेज.पत्ता:नाशिक फाटा, बस स्टाप पुढे, हायवे वर रोड ट्च , पुण्याकडे जाताना डाव्या हाताला.
58.पिंपरीच्या साई चौकात भेळ पाणीपुरी सॅडविचेसच्या अनेक गाड्या उभा असतात. सिंधी लोकांना भेळ, पाणीपुरीची चव फार आवडते. इथली पाणिपुरी वेगळीच लागते.
59.जैन शाळा चिंचवड शेजारी एक उडप्याच होटेल आहे. चवदार रवाळ इडली चटणी शेकडाच्या भावाने मिळतात.शिवाय डोसा 55 प्रकार मिळतात.
60.पिंपरी चौकातुन शगुन चौकात जाताना पुलाच्या अलिकदे रत्ना व्हेजिटेरिअन होटेल आहे, तिथलि टेस्ट मस्तच आहे
61.भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच, दूध मलई व समोसाही मस्त आहें
62.होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.KSB चॉक ते Thermax चॉक मधे.Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.
63.चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली आहे का कोणी ??चाफेकर चौक मध्ये डांगे चौक बस स्टॉप आहे तेथे PH DIGNOSTICSS च्या बाजूला शेजारच्या बोळात मंडईच्या मागच्या बाजूला , भारी वाटली
47 - गुंडम की काहीतरी नाव आहे. चव अगदीच ठीकठाक आहे. अन्नपूर्णा अगदी बेक्कार आहे. रत्ना चांगलं आहे पिंपरीच, बरेच जुने आहे. आम्ही विशाल ला गेलो की तिथे जायचो. गावात वृषाली म्हणून हाटेल होते हिंदुस्तान बेकरिपाशी आद्य उडुपी हाटेल असावे ते गावातील. बंद पडले. कवीची मिसळ हल्ली असते तिखट. यशवन्त चे गुजा अप्रतिम असतात आणि कलादिपचा ढोकळा पण. पूर्वी गावात टेलको गृहिणीचं कॅन्टीन होत तिथे पण उत्तम पदार्थ मिळत केशवनगर ला होतं. माझ्या लहानपणी मोरया मंदिरापाशी खाडे म्हणून एक बाई ब वडे विकत केवळ अफलातून प्रसाद स्नॅक्स अस नाव होतं सिमन्त च्या समोर. भेळी पण छान मिळत राजकुमार वाल्याची मस्त असे. परदेशी भडभुंजा पण फारच जुना आहे. बुंदी लाडू भूषण भागवत कडे छान मिळतात फक्त दिवाळीत मिळतात मात्र. अप्पा मिसळ - अगदीच पास , काहीच हायजीन नाही. बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. प्राधिकरण मधली काही काही दुकाने बंद झाली आहेत वर लिहिलेली. जकात नाक्या पाशील बिस्त्रो चालू आहे का अजून? पूर्वी अजून एक फार हिट म्हणजे मयूर थाळी अजून आहे पण आता तेवढी चव नाही. तुमचा वाडा / आळी कोणती?
बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. >>> बहुतेक यांची मुलगी डोंबिवलीत हाच बिझनेस करायची, उत्तम खवा पोळ्या, आमच्या आधीच्या गल्लीत राहायची. आता कुठे शिफ्ट झाली माहिती नाही. मी पूर्वी आणल्यात पुरणपोळ्या आणि खव्याच्या पोळ्या तिच्याकडून. त्यावेळी अनंत हलवाईकडे वगैरे पोळ्या असायच्या तिच्या. हाताखाली बायका पण होत्या करायला, ती स्वत:ही करायची.
पिंचिंमध्ये पुपो कुठे रेडिमेड
पिंचिंमध्ये पुपो कुठे रेडिमेड मिळतात का चांगल्या नि चविष्ट?
सौ. बोर्लीकर. आकुर्डी
सौ. बोर्लीकर. आकुर्डी गुरुद्वारापाशी. ह्यांच्याच पुपो सर्व दुकानात असतात चितळे, पाटणकर आणि इतर बरेच ठिकाणी..
हो का, व्हेरी गुड, गुरुद्वारा
हो का, व्हेरी गुड, गुरुद्वारा म्हणजे रेल्वेलाईन क्रॉस करायला हवी
गुरुद्वारा म्हणजे रेल्वेलाईन
गुरुद्वारा म्हणजे रेल्वेलाईन क्रॉस करायला हवी >> गुरुद्वारा कमानीतून आत चालत रहायचे. तिथे डाव्या हाताला तुम्हाला एक नंदनवन सोसायटी असा बोर्ड दिसेल. तिथे विचारा.
ओके धन्स आजच उडी मारते
ओके धन्स आजच उडी मारते
चितळेंची शाखा प्राधिकरणात
चितळेंची शाखा प्राधिकरणात कुठे सुरू झाली आहे?
आकुर्डी-रेल्वे स्थानक जवळ
आकुर्डी-रेल्वे स्थानक जवळ संभाजी चौकापाशी आहे असे ऐकले आहे
पेट्रोल पंपासमोरच्या गल्लीत..
पेट्रोल पंपासमोरच्या गल्लीत.. अन्नपूर्णी होते त्याच जागी. एवढ चांगल अन्नपूर्णी होत त्याठिकाणी चितळे
सध्या तिथे फक्त पेढे, बर्फी आणि ईतर थोडा कोरडा खाऊ मिळतो.
चितळे खरे पुणेरी आहेत, आजिबात
चितळे खरे पुणेरी आहेत, आजिबात त्याना स्पर्धेची भिती नाही, अन्यथा पिंचिं मध्ये काका हलवाई आले, गाडगीळ आले (ज्वेलरी) अनेक लोक आले, पण चितळे यायचे नाव घेत नव्हते
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही. आता त्याची एक शाखा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज जवळ सुरू झाली आहे. सं. तु. नगरमध्ये.
मालवण समुद्रमध्ये कालच जाऊन
मालवण समुद्रमध्ये कालच जाऊन आलो. तद्दन भिकार क्वालिटी. मासे किमान चार दिवसांपूर्वीचे असावेत. अगदीच बेचव!!
मी सी फूड साठी सिल्वर सेवनलाच
मी सी फूड साठी सिल्वर सेवनलाच जाते. महागडे हॉटेल आहे त्यामुळे जास्त जात नाही. सी फूड साठी अजून काही चांगली हॉटेल्स आहेत का?
<<डीविनिता | 19 March, 2015 -
<<डीविनिता | 19 March, 2015 - 10:07
पिंचिंमध्ये पुपो कुठे रेडिमेड मिळतात का चांगल्या नि चविष्ट? >>
एम्पायर एस्टेट मधे कृपा फूड्स मधे असतात. २ वेळा खाल्यात...
बघा ट्राय करुन...
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही.>> पिंपरीत फक्त तवा भाज्या चांगल्या आहेत. सुरुवातीला दालफ्राय बरी असायची. एकदा बिर्याणी आणली तर फक्त प्लेन राईस आणि उकडलेल्या भाज्या होत्या. तुकारामनगरच्या दुकानात तर माज एवढा एकच आयटम जबरी आहे.
पिंपळे सौदागरला पिंचित
पिंपळे सौदागरला पिंचित म्हणायचे का?
सौदागरला हैद्राबाद हाऊस आलंय. बिर्याणी अप्रतिम
टिम लक लक बोगस!
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात त्यामुळे आम्ही टिमवाले सध्या वाढवा वजन मोडात
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात > म्हणजे औंधच्या शिवसागर हॉटेलवाली का? का ही दुसरी? सौदागरात exact कुठे सुरू झालीयये?
सौदागरात त्यादिवशी हैद्राबाद
सौदागरात त्यादिवशी हैद्राबाद हाऊस शोधत होतो, काही सापडले नाही. मग हिंजवडी मधेच गेलो होतो.ती बिर्याणी पण अप्रतिम.
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात > म्हणजे औंधच्या शिवसागर हॉटेलवाली का? का ही दुसरी? सौदागरात exact कुठे सुरू झालीयये?
+१ कुठे आहे सुरु?
हैद्राबाद हाउस, कोकणे चौकात आहे. आधी साशंक होतो, पण इथले प्रतिसाद बघून एकदा जाऊन यायला हरकत नाही अस वाटतय.
ट्युलिप, कोकणे चौकात आहे
ट्युलिप, कोकणे चौकात आहे हैद्राबाद हाऊस.बिर्याणी बद्दल +१
रंगाशेठ जाऊन या. नॉनव्हेज खाणारे असाल तर चांदीच तुमची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवसागर वाल्यांनी ब्रांच उघडलीये वाकडला
हिंजवडी वरून विशालनगरचा जो टर्न लागतो तिकडे कुठेशी आहे.
पत्ता नीट विचारून सांगते.
याच एरियात एक काशी चाट भंडार आहे. चाट ऑसम मिळतंय तिकडे.आजकाल पनीर कुल्चा सूरू केलाय तोही मस्त.
इंदोर स्वीट्स पण मस्तय. इतके अप्रतिम पोहे/ढोकळा मी कुठेच खाल्लेला नाही कधी.
रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.
वाकड आणि सौदागराच्या जवळपासच
वाकड आणि सौदागराच्या जवळपासच कुठेतरी आलीये शिवसागर
नक्की पत्ता सोमवारी
मोरया गोसावी मंदिर रोडवर
मोरया गोसावी मंदिर रोडवर गोखले हॉल समोर खवाय्येगिरी छान हॉटेल चालू झाले आहे
मिसळ मस्त संध्याकाळी वेज क्रिस्पी व क्रिस्पी सीपीसी सारखे एकदम नविन खाद्यप्रकार नक्की जावे असे ठिकाण
पिंचि मध्ये पावभाजी मस्ट
पिंचि मध्ये पावभाजी मस्ट विजिट ठिकाण सांगा
रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/
रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.>>>>>
रीया...हजारो मोदक तुला.
इशा, चल मग तिकडे एक गटग
इशा, चल मग तिकडे एक गटग करुयात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निलू, गीता आकुर्डी मधलं
चांगली थाळी कुठे मिळेल
चांगली थाळी कुठे मिळेल पिंचिंमध्ये... पेंटिंगचे काम चालू आहे, किचनमध्ये राडा आहे दोन-तीन दिवस तरी!
पुणेमिसळ.कॉम
पुणेमिसळ.कॉम
#लॉकडाउन_विरंगुळा
#लॉकडाउन_विरंगुळा
#निलउवाच
पिंपरी चिंचवड मधील खाद्ययात्रा (काही इंटरनेटवरील संदर्भ व काही माझी addition करून ही लिस्ट बनवली आहे)
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं.
२. करमरकर - श्रद्धा स्नॅक्स सेंटर चापेकर चौक, चिंचवड गाव, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ , लिंक रोडवर दे धक्का गावडे पेट्रोल पम्प समोर, पिंपरीगावात निसर्ग एक शाखा चिंचवडगाव मंडई शेजारी आली आहे,
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
१०.वडापाव - निगडी प्राधिकरणात 'वासू वडापाव'. कॅम्प एजुकेशन जवळ एक काका हातगाडी लावतात त्यांचा वडापाव पण भारी आहे.
10.A दिवसा फत्तेचंद शाळे बाहेर आणि रात्री चापेकर चौकात मिळणारा दत्त्या चा वडापाव.
10.B लिंक रोड ला डॉमिनोज शेजारी हातगाडी लावतो तो सुद्धा ट्राय करून पहा चांगला आहे.
10.C थरमॅक्स चौकातून चिखली कडे जाताना डाव्या हाताला 'काका वडापाव' पण मस्त.
11. साबुदाणा खिचडी,पोहे,उपमा, इडली चटणी साठी मोरया गोसावी मंदिराजवळ गपचूप वाड्यात सुद्धा हे सर्व अतिशय उत्तम चवीचे आणि वाजवी दरात मिळते. गपचूप कडे उपवासाची मिसळ सुद्धा लै भारी. बटाट्याचा चिवडा,उपासाचे पापड यावर साबुदाणा वडा कुस्करून दाण्याची आमटी घालतात. मस्त लागते. मोरया गोसावी मंदीरा समोरचं 'चिंतामणी' मध्य उपवासाचे थालीपीठ मिळते ते पण छान.
12.गांधी पेठेतील मोरया गोसावी मंदिराशेजारी बालाजी स्नॅक्स सेंटर म्हणजेच कवी मिसळ देखील छान आहे. त्यांचा संध्याकाळी वडा सॅम्पल मिळतो तोही बेस्टच.ज्यांना बेडेकरची मिसळ आवडते तसल्या गोड्या लोकांसाठी पण तिखट मागितली तर झणझणीत पण मिळते.कवी यांची दर चतुर्थीला उपवासाची मिसळ व साबुदाणा वडा एक नंबर.
13.आपल्याला नेवाळे मिसळ देखील आवडते बुवा.अतितिखट असलेला हा प्रकार फारच कमी जणांना झेपते.नेवाळेची मिसळ बरेचं लोक खाऊ शकत नसले तरी मला ती आवडते. अजिबात तिखट न झेपणाऱ्या लोकांनी त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्याची बटाटा भजी मात्र अतिउत्तम. त्या क्वालिटीची भजी अजून तरी मी कुठे इतरत्र खाल्ली नाहीत.
14.गांधी पेठेत नेवाळे मिसळ समोर आणि मशिदीच्या बाजूला (Axis बँक atm शेजारी)असलेला हेंद्री मिसळ जॉईंट पण छान आहे.
15.गांधी पेठेत HDFC ATM समोर मोरया वडापाव एकदम झकास व तिखट चव, वडापाव,भजी,पॅटिस छान असतो आणि गरमागरम मिळतो.
16.रोज् वूड शाकाहारी जेवणं चांगले ,यांचे चायनीज पण छान असते.
17.लिंक रोड वरचे कालिका मातेच्या देवळाजवळ सॅफारोन.. दोनदा गेलो.. दोन्हीवेळा खुप छान पंजाबी जेवण
18. तंदुरी पदार्थ आणि बिर्याणी साठी सर्वात आवडते आणि सवयीचे चापेकर चौकातले . नॉनव्हेज जास्त आहेत पदार्थ ,व्हेज फार कमी.
19. जिलेबी साठी गांधी पेठेतील यशवंत. यांच्याकडे बाकरवडी पण छान मिळते.
20. प्रदीप स्वीट्स च्या पिंचि मध्ये भरपूर शाखा आहेत. एकंदरीत सर्वचं पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतात.सगळ्यात बेस्ट समोसा व रसमलई
21.निगडी चौकातले गोकुळ स्वीट्स मध्ये देशी शुद्ध तुपातली जिलेबी आणि इमरती मिळते, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल वगैरे टाकून. जबरदस्त लागते.
22.चखणा आयटम घ्यायचे असतील तर 'बंधन स्वीट्स' शाहूनगर बागेजवळ. एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतात.
23.पिंचि मध्ये येत नसले तरी एका स्वीट मार्टचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे परिहार चौक,औंध इथले 'मिठास'. काय जागा आहे राव. ड्राय फ्रुट बासुंदी, सीताफळ रबडी खावी तर इथेचं. बंगाली मिठाईचे तर इतके प्रकार आहेत कि बास्स. खीर कदम आणि संदेश चे भयानक सुंदर प्रकार मिळतील. ते आवर्जून खावेचं, राहिलचं तर कमल भोग आणि घेवर पण लै भारी. एका भेटीत समाधान होण्यासारखे नाहीचं हे ठिकाण.
24. एलप्रो चौका अलीकडे 'चौपाटी' मध्ये चाट चांगले आहेत. थंड पाण्याची पाणीपुरी मिळते, चवीला एकदम मस्त.
25.प्राधिकरणात भेळ चौकाच्या थोडेसे पुढे 'ओम शिव स्वादिष्ट' मधली भेळ,पाणीपुरी आणि रगडा पुरी भारी आहे.
26.पावभाजी,पराठे आणि इतर - गीता स्नॅक सेंटर, शर्मा, नायडू आणि पिंगारा हे तिघे निगडी प्राधिकरणात जवळ जवळ आहेत.पावभाजी सगळ्यांकडे चांगली आहे, गीता मध्ये मस्तानी पण चांगली मिळते. शर्मा कडे मटका कुल्फी आवर्जून खावी अशीचं. पिंगारा मध्ये चीज पराठा सुद्धा आवर्जून खावा असाचं तो हि फक्त 70 रुपयांत. भरपूर चीज भरून देतो.
27.आकुर्डी स्टेशन समोरचं बरेचं प्रसिद्ध असे 'शहाजी पराठा' आहे (तेचं ते लक्ष्मी रोड वाले) पराठे, दही भल्ला,लस्सी एकदम कडक.त्याचे दर मात्र लक्ष्मी रोडच्या शाखे पेक्षा इथे बरेचं जास्त आहेत.
28.. पिंपरी मधले छाया पराठा सुद्धा चांगले आहे. अतिशय स्वस्त आणि मस्त पराठे. 50-60 रुपयांत व्हेज आणि 90 रुपयांत चिकन, खिमा पराठा मिळतो. सोबत बटर,दही आणि ग्रेव्ही सुद्धा येते.
29.घरगुती थाळी हवी असेल तर चाफेकर चौक मधील खरे यांचा सुहास डायनिंग हाॅल. खूप वर्षापासून आहे.
30.अजून एक थाळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे नैवेद्यम. पुणे मुंबई हायवे ला आहे,आकुर्डी खंडोबाच्या माळाजवळ. आधी थाळीनंतर आईस्क्रीम द्यायचे कॉम्प्लिमेंट्री ,आता बंद केलंय
31.हिंदुस्थान बेकरी पॅटिस ,अफलातून व गरमागरम चाफेकर चौकच्या थोडे अलीकडे जनता सहकारी बँक समोर व चितळे स्वीटच्या बाजूलाच
32.ग्लोबल ग्रिल:- सिगरी. पिंपरी सेंट्रलच्या ईमारतीत. बार्बेक्यू नेशन पेक्षा ईथली चव आणि विविधता चांगली आहे
33.रंगोली:- राजस्थानी पदार्थ चांगले मिळतात. दाल बाटी वगैरे. राघवेंद्र स्वामी मठाजवळ.इथली रबडी ,पंजाबी पदार्थ ,खास ओल्या हळदीची भाजी मस्तच ,जरा हटके चव
कोणतीही पंजाबी भाजी तिखट भाजी करायला सांगितली तर अफलातून करून देतात
34. बाबा रामदेव ढाबा:- रंगोलीप्रमाणेच. दाल बाटी मस्त एकदम. जयपुरी गट्टे की सबजी पण झकास. निगडी ट्रांसपोर्ट नगरीत
35.भक्ती शक्ती उद्यान, निगडी ह्याच्या इथे एक चाटवाला गाडी लावतो त्याच्याकडची दहीभल्ला चाट एकदम अनोखी. पाणीपुरीच्या लांबट पुरीमध्ये दहीवडा भरुन त्यावर भरपूर थंडगार दही, चिंचेचं पाणी, तिखट वगैरे भरुन जबरा प्रकार देतो. आलू टिकी चाट पण त्याच्याकडे मिळते.
36.माउली चहा (पिंपरीगाव) आणि नीलम चहा (पिंपरी कॅम्प) अतिशय कडक चहासाठी प्रसिद्ध. मसाला अजिबात नाही. कडक चहा हीच खासियत.
37.हॉटेल सावली, निगडी चौक इथले लसूणी पालक सूप लै भारी. बाकी पदार्थ तसे नेहमीचेच पण चव छान.
38.सॉल्टी चायनिज - मासुळकर कॉलनी हे बहुधा पिंपरी चिंचवडमधलं पहिलं चायनिज सेंटर असेल. हातगाडीपासनं सुरुवात करुन ह्यानं आज छोटेखानी हॉटेल टाकलंय. ह्याच्याकडची अमेरिकन चॉपसुई जबरदस्त. तशी कुठेच खाल्ली नाही.
39.कैलास डेअरी - चिंचवड स्टेशन. ह्याचाकडची ताक, लस्सी अतिसुंदर. संध्याकाळी हाच बाहेर मसाला दूधाची गाडी लावतो. साय टाकलेलं घट्ट मलईदार मसाला दूध, नशिबात असेल तर कधी कधी हा साय टाकलेली कॉफीसुद्धा करुन देतो. ती तर अजूनच भारी.
40.शाहुनगरच्या बागेबाहेर असलेला पवार वडापाव चांगली चव थोडे थांबावे लागते पण समोरच (लगेच तळलेला गरमागरम)मिळतो.
41.पाव पॅटीससाठी प्रेमलोक पार्क मध्ये बेंगलोर साई हाटेलवजा खादाडी केंद्र (मोठ्ठी खूण म्ह़नजे रस्त्यामधल्या पारासमोरच)
42.याच्या शेजारीच श्रीबालाजी स्नॅक्स सेंटर, प्रेमलोक पार्क कडून बिजलीनगर कडे वळताना डाव्या बाजुला दुकानांच्या गर्दीत आहे.सगळ्या चाट प्रकारांसाठी स्वस्त आणि मस्त.यांचा २ वर्षांपूर्वी फक्त एक स्टॉल होता. आता स्वतःच्या जागेत आहे.
43.ढोकळा प्रदीप आणि गावातला वाघेश्वर स्वीट मार्ट.दडपे पोहे आणि कट दोसा गायत्री एक्दम विरूद्ध बाजूल (हिंदुस्थान बेकरीच्या समोर)
44. प्राधिकरणात स्वीट जंक्शन नावाच्या स्वीट मार्टात चांगली कचोरी व समोसा मिळतो ,थोडे वेळ्वेअर ७.३० पर्यंत गेल्यास गरमही लाभतो.
45.चिंचचड लोकमान्य ब्रिज खाली अप्पांचा वडा, प्रतिभा कॉलेज काळभोर नगर समोरील वडा( शेट्टी उद्यान) हे आपल्या घरगुती वड्याच्या चवीसारखे.
46.बारामती वडापाव, अख्या सांगवी/पिंपळे गुरवात वर्ल्ड फेमस आहे. चटणी पण भारी असते त्याची. साई चौकातल्या मंडईत, संध्यकाळीच असतो फक्त.
47.कोयते वस्ती, पुनावळे इथल्या पुरोहित स्वीट्स नामक छोट्या दुकानात कलाकंद मिळतो. माझ्या मते हा जगातला सर्वोत्तम कलाकंद आहे.
48.अस्सल खानदेशी ऑथेटिकेटेड डिश मिळण्याचे ठिकाण !
संभाजी चौक , निगडी
चौकात स्वीट मार्ट आहे त्याच्या विरुद्ध दिशेस , सध्या गणपती बसतो , खालच्या गाळ्यात आहे हे हॉटेल.
बिबडा(coarse papad made from Jowar), चिकनीचे पान(coarse papad made of red Jowar), गुरमई रोटी( a sweet roti made of jiggery infused with cinnamon and special homemade Masala), खानदेशी पुरणपोळी, केळीची भाकरी(Bhakri made with flour made of dried and ground banana), कळण्याची भाकरी(bhakri made of black gram & Jowar), केळीचा बिबडा बिबडा, खानदेशी शेव भाजी, खानदेशी पाटोड्यांची भाजी असे बरेच वेगळा पदार्थ मिळतात
49.चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला.
दिल्ली स्वाद - निगडीत.
आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.
50.गांधी पेठेत परदेशी फरसाण मार्ट एकदम छान आणि ताजे पदार्थ मिळतात.
51.लोडेड बाईट्स - केशवनगर शाळेजवळ
इथले सँडविच ,पास्ता , बर्गर एकदम सुप्पर , सँडविच मेकिंग हटके व अफलातून आहे. काकडी ,टोमॅटो स्लाइस नसतात तर ग्रेटेड मसाला असतो आणि चव।अफलातून. बॉम्बे सँडविच अवश्य try करावेच असे.
52. मिसळीसाठी "जयश्री"
पत्ता : बजाज अॅटो मेन गेटसमोर, आकुर्डी.
त्याला ऑर्डर देताना बोलायच कोल्हापुरी दे किंवा तर्री मारुन दे. दणका सहन करु शकत असाल तरच अशी ऑर्डर द्या. नाहितर नॉर्मल ऑर्डर
53.व्हेज हॉटेल्स मध्ये मला आवडणारे "रसोई से"पत्ता: भेळ चौकाच्या थोडस पुढे उजव्या बाजुला रोड टच.
इथे तंदुर पनीर मध्ये बरीच व्हरायटी आहे. टेस्ट छान आहे. सर्विस चांगली आहे.
54.बे लिफ ब्रिस्टो - जुना जकात नाका , चाफेकर चौक ते बिर्ला हॉस्पिटल रस्तावर -बेसमेंटला आहे सह्हीच आहे...इथला पनीर टिक्का म्हणजे लाजवाब.तस्सेच चायनीज सिझलर्स एक से एक, हॉंगकॉंग व स्लो बोट सिझलर्स मस्ट try. ह्यांच्याकडे आधी अफलातून आईस्क्रीम पकोडा मिळायचा, आता मेनूकार्ड मधून काढून टाकलाय.
55.प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी गंडा राज" कडची इडली आणि डोसे अतिशय स्वस्त आणि मस्त असतात..एकदा नक्की चव बघा
56.प्राधिकरण संभाजी चौकात "cakes and cream " नावाचा दुकान आहे तिथे veg patice आणि cakes पण मस्त असतात
57.मराठा - पुणे मुंबई हायवे वर आहे. तिथे महाराश्ट्रियन जेवन मस्त मीलते. फक्त व्हेज.पत्ता:नाशिक फाटा, बस स्टाप पुढे, हायवे वर रोड ट्च , पुण्याकडे जाताना डाव्या हाताला.
58.पिंपरीच्या साई चौकात भेळ पाणीपुरी सॅडविचेसच्या अनेक गाड्या उभा असतात. सिंधी लोकांना भेळ, पाणीपुरीची चव फार आवडते. इथली पाणिपुरी वेगळीच लागते.
59.जैन शाळा चिंचवड शेजारी एक उडप्याच होटेल आहे. चवदार रवाळ इडली चटणी शेकडाच्या भावाने मिळतात.शिवाय डोसा 55 प्रकार मिळतात.
60.पिंपरी चौकातुन शगुन चौकात जाताना पुलाच्या अलिकदे रत्ना व्हेजिटेरिअन होटेल आहे, तिथलि टेस्ट मस्तच आहे
61.भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच, दूध मलई व समोसाही मस्त आहें
62.होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.KSB चॉक ते Thermax चॉक मधे.Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.
63.चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली आहे का कोणी ??चाफेकर चौक मध्ये डांगे चौक बस स्टॉप आहे तेथे PH DIGNOSTICSS च्या बाजूला शेजारच्या बोळात मंडईच्या मागच्या बाजूला , भारी वाटली
64.सुजाता मस्तानी हेरिटेज प्लाझा चिंचवड गांव बस स्टैंड शेजारी तीच पुणेरी चव
65.सौ. बोर्लीकर. आकुर्डी गुरुद्वारापाशी. ह्यांच्याच पुरणपोळी सर्व दुकानात असतात चितळे, पाटणकर आणि इतर बरेच ठिकाणी..
66. नायडू पावभाजी निगडी ,अफलातून चव व डिश डेकोरेशन मस्त
67. मयूर मिसळ रावेत, तर्रीदार मिसळ आणि चवीसाठी फेमस
68.किगा आईक्रीम लिंक रोड गावडे पेट्रोल पंप समोर.अफलातून आईस्क्रीम फ्लेवर ,पुरणपोळी ,मोदक ,आणि बरेच हटके फ्लेवर आहेत
69.अन्नपूर्णा व्हेज हॉटेल , इलप्रो चौक ,अजूनही कधीतरी मस्त क्वालिटी मिळते तर कधी गंडते. तेथील स्पेशल गडबड आईस्क्रीम माझे फेव्हरेट आहे
70.मोरया गोसावी मंदिराजवळ रोहित वडेवाले ब्रँच चालू झाली आहे ,वडा सॅम्पल मस्त आहे.
71.जिलेबी एकदम गरमागरम ,ICICI ATM च्या समोर गांधी पेठ चिंचवडगाव
72.ढोकळा व चवली फली एकदम क्रिस्पी व कुरकुरीत ,चिंचवड बसस्टँड जवळ ,कमला कॉर्नरला गाडी लागते.
73. संपूर्ण चिंचवड गाव व गांधी पेठ व्यापाऱ्यांना चहा पुरविणारा ,माऊली चहा सेंटर, मूळ दुकान ,अमृततुल्य चहा आहे ,पागेची तालीम गणपती मंदिरासमोर
74.विनूज पाणीपुरी व भेळपुरी ,
संभाजी चौक ,निगडी,Near LIC Building, Sector 26
अप्रतिम चव व स्वच्छता ,पार्सल झोमॅटो वर देखील उपलब्द आहे.
75. संभाजी चौक ,विनूज पाणीपुरी शेजारील पुरोहित वडापाव ,एकदम गरमागरम आणि टेस्टी ,सोबत तळलेला भरपूर बेसन चुरा देतात, टेंस्टी वडापाव.
47 - गुंडम की काहीतरी नाव आहे
47 - गुंडम की काहीतरी नाव आहे. चव अगदीच ठीकठाक आहे. अन्नपूर्णा अगदी बेक्कार आहे. रत्ना चांगलं आहे पिंपरीच, बरेच जुने आहे. आम्ही विशाल ला गेलो की तिथे जायचो. गावात वृषाली म्हणून हाटेल होते हिंदुस्तान बेकरिपाशी आद्य उडुपी हाटेल असावे ते गावातील. बंद पडले. कवीची मिसळ हल्ली असते तिखट. यशवन्त चे गुजा अप्रतिम असतात आणि कलादिपचा ढोकळा पण. पूर्वी गावात टेलको गृहिणीचं कॅन्टीन होत तिथे पण उत्तम पदार्थ मिळत केशवनगर ला होतं. माझ्या लहानपणी मोरया मंदिरापाशी खाडे म्हणून एक बाई ब वडे विकत केवळ अफलातून प्रसाद स्नॅक्स अस नाव होतं सिमन्त च्या समोर. भेळी पण छान मिळत राजकुमार वाल्याची मस्त असे. परदेशी भडभुंजा पण फारच जुना आहे. बुंदी लाडू भूषण भागवत कडे छान मिळतात फक्त दिवाळीत मिळतात मात्र. अप्पा मिसळ - अगदीच पास , काहीच हायजीन नाही. बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. प्राधिकरण मधली काही काही दुकाने बंद झाली आहेत वर लिहिलेली. जकात नाक्या पाशील बिस्त्रो चालू आहे का अजून? पूर्वी अजून एक फार हिट म्हणजे मयूर थाळी अजून आहे पण आता तेवढी चव नाही. तुमचा वाडा / आळी कोणती?
बोरलीकर काकूंकडे पु पोळी
बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. >>> बहुतेक यांची मुलगी डोंबिवलीत हाच बिझनेस करायची, उत्तम खवा पोळ्या, आमच्या आधीच्या गल्लीत राहायची. आता कुठे शिफ्ट झाली माहिती नाही. मी पूर्वी आणल्यात पुरणपोळ्या आणि खव्याच्या पोळ्या तिच्याकडून. त्यावेळी अनंत हलवाईकडे वगैरे पोळ्या असायच्या तिच्या. हाताखाली बायका पण होत्या करायला, ती स्वत:ही करायची.
आता अमेरिकेत असते.
आता अमेरिकेत असते.
Pages