जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
ट्रेन मध्ये एकदा एक बाई जोरात
ट्रेन मध्ये एकदा एक बाई जोरात किंचाळली.. (फर्स्ट क्लास मधे असे काही करणे म्हणजे अक्षम्य गुन्हा .. लगेच इतरांची नेत्रपल्लवी चालु... व्हॉट नॉनसेन्स इस धिज टाईप्स ) असो.....तर ती बाई किंचाळल्यावर सर्वजणी तिच्याकडे बघायला लागल्या.... व्हॉट हॅपन्ड?? व्हॉट हॅपन्ड???? तर ती म्हणते कशी.... पता नही किधर से तो भी मेरे आंग पे झुरल गिरा
ओ गोल गोल होता है ..काला दाणा
ओ गोल गोल होता है ..काला दाणा होता है...उसको पाणी भिजवणे का होता है...फिर वो बुलबुलीत होता है...
.
.
इती "सब्जा"""
कावीळ झाली होती ......मुंबईत
कावीळ झाली होती ......मुंबईत सर्रास कोणीही उसाचा रस वाला काविळीचं औषध देतो.
असा माझ्या मामीचा समज.....ती मला जबरदस्ती एका रसवंती गृहात घेऊन गेली.
आम्ही बाकड्यावर जाऊन बसलो तसा तिथल्या पो-याने दोन ग्लास काढली आणि आमच्या साठी रस ओतणार इतक्यात मामी म्हणाली ......
ऊस नही पाहीजे! .....कावीळ बघनेकी हई !!
मला त्या अवस्थेत सुद्धा हसू आवरत नव्हतं ....
लय भारी सगळे किस्से..
आमच्या बिल्डींग मध्ये कुणी
आमच्या बिल्डींग मध्ये कुणी सांगितलेला किस्सा (खर खोट माहीत नाही)
त्यांचा गावहून मुंबईत आलेला कुणी एक पाहुणा म्हणे एकदा चुकून (का मुद्दाम ) ते माहीत नाही एकदा कामाठी पूर्यात गेला.
तीथे एक जण आली आणि त्याला म्हणाली:
" ए हीरो क्या बोलता है"
" अच्छा बोलता है " (म्हणजे मी ठीक आहे)
" ए हीरो बैठेगा क्या "
"......"
" ए बोल ना बैठेगा क्या "
"..................."
" अरे बोल ना बैठेगा क्या"
" देखो तेरा पैर दुखताय तो तुम अकेला जाके बैठो खाली पिली मेरा दिमाघ मत चाटो मै खडा ही अच्छा हू"
(जुन्या माय्बोलीवर लिहीलेले पुन्हा ईथे लिहीलय)
आत्ताच एक कहर ऐकला. पुण्याहून
आत्ताच एक कहर ऐकला.
पुण्याहून मुंबईला फोन वर.
आपके इधर humidity होती है.हमारे जैसा नही. उन बहोत लगता है. इसलिये sunstroke जोरसे बजता है.
ईस फोन से मत
ईस फोन से मत घुमो-----------ह्या फोन वरुन डैल करु नका चे हिन्दित
माझ्या मावसभावाचे सोलापुरात
माझ्या मावसभावाचे सोलापुरात झेरॉक्स सेंटर आहे. मध्ये एकदा मशीनच्या स्कॅनरमध्ये काही दोश निर्माण झाल्याने काम चालू होते. तेवढ्यात समोरच्या 'गरिबी हटाव' (हे विजापूररोडवरील एका झोपडपट्टीचे नाव आहे
) मधुन एक जण झेरॉक्ससाठी आला. मेकॅनिकला बघून त्याने आमच्या बंधुराजांना विचारले...
"क्या हो गया भाई मशिनको?" आमचे बंधुराज म्हणाले...
"कुछ विशेष नै रे, थोडा कडे कडेको काळा आताय कॉपी ! "
विश्ल्या
विश्ल्या

जेव्हा कधी हा धागा वर येतो
जेव्हा कधी हा धागा वर येतो तेव्हा तेव्हा पुन्हा तेच किस्से वाचून पोट दुखेपर्यंत हसू येतं. नवीन किस्से पण धमाल आहेत.
कावीळ बघनेकी हई, कडे कडेको
कावीळ बघनेकी हई, कडे कडेको काळा आताय
हे मराठीत पण काय असेल ते कळले नसते, संदर्भ माहित नसता तर.
तिथेच हसुन आपटायला होईल.
काल नात्यातल्या एका बाईंना
काल नात्यातल्या एका बाईंना घराच्या कोपर्यावर एका टेम्पोवाल्याने धडक दिली. नशीबाने खूप दुखापत झाली नाही. हाताचे कोपर मात्र दुखावले गेले, नंतर प्लास्टर घालायला लागले व बरेच खरचटले. पण त्या वेळेतही या बाई टेम्पोवाल्याशी भांडत होत्या, ''अरे मेल्या, डोला फूट गया क्या तेरा? दिखता नहीं क्या समोरसे कौन जा रहा है... आँ?''
जेव्हा कधी हा धागा वर येतो
जेव्हा कधी हा धागा वर येतो तेव्हा तेव्हा पुन्हा तेच किस्से वाचून पोट दुखेपर्यंत हसू येतं +१
विशालदा , अकु
कालच काशीयात्रेवरुन परत आलो.
कालच काशीयात्रेवरुन परत आलो. मराठी-हिन्दीचे अनेक किस्से झाले. त्यातले काही...
आमचे बंधुराज सपत्निक एका लखनवी ड्रेसेसच्या दुकानात घुसले. बरोबर भाची. तिच्या मापाचा लखनवी घ्यायचा होता.
बंधुराज (दुकानदाराला): भैय्या इसी कलर में जरा वाढते अंग का दिखाओ ना!
दुकानदाराला 'वाढते अंगका' काय कळलं माहित नाही.
दुसर्यांदा एका लस्सीच्या दुकानात. लस्सीवाला मन लावुन लस्सी बनवत होता. आईला लस्सी द्यायच्या वेळेस त्याने विचारले..बर्फ डालु क्या?
बंधुराजः नही नही एक गिलास में मत डालो. वो क्या है ना, मम्मीजीका गला ऑलरेडी बैठ गया है!
परततांना रेल्वेत्...एका सहप्रवाशाला बंधुराज सांगत होते.
वो जुलाब से डीहायड्रेशन होता है ना, तो इलेक्ट्रॉल पावडर लेनेका. पावडर को पानी में इतना घोळो की बिलकुन एकजीव होना मंगता है!
आर्ये
आर्ये
एकजीव <<
एकजीव <<
आर्यातै
आर्यातै
आर्ये बिल भावाच्या नावाने
आर्ये

बिल भावाच्या नावाने फाडतेस काय???
आर्या भारीच ग झकासराव
आर्या भारीच ग
झकासराव
डायने बिल भावाच्या नावाने
डायने
बिल भावाच्या नावाने फाडतेस काय??? >>
+१११११
बिल भावाच्या नावाने फाडतेस
बिल भावाच्या नावाने फाडतेस काय???

>>>
डायलॉगचोर
माझ्या लेकीने हिंदीत
माझ्या लेकीने हिंदीत सांगितलेली गोष्ट " वो एक हत्ती होता है... उसको तहान लगती है ... वो पाणी पिनेको तळे पे जाता है..... कोल्हा उसको चावता है...
विनार्च
विनार्च
आर्या
आर्या
विनार्च >>>>>>>>>
विनार्च >>>>>>>>>
(No subject)
वैनिल खूप जुना किस्सा आहे
वैनिल
खूप जुना किस्सा आहे माझा एक जुना कलिग (कंपनी सोडून गेल) तो दुसर्या हिंदी भाषिकाला म्हणाला 'देख चिन्मय तु मुझे गंडव मग, मुझे पता है उधर ..... में जगा की कोई कमतरता नही है'
सगळेच
सगळेच
१) ड्रायवर मै बोलती है तुमको
१) ड्रायवर मै बोलती है तुमको तुम चलो तर खर
२) वो डावे हात को वो गल्ली है ना उधर वळो
आमच्या पुणेकर बॉसची
आमच्या पुणेकर बॉसची मुक्ताफळे:

इथल्या वेटरला: ओ तुम कांदा जरा बारीक-बारीक चिरो ना.
''तुम क्या करो , उस चाय मे एक चम्मच शक्कर डाल के अच्छे से ढवळो''
''अरे तुमने चाय मे इतना शक्कर डाला की वरचा ओठ खालचे ओठ को चिपक गया''
Pages