जुन्या मायबोलीवर एक धमाल धागा होता, त्यातले काही अस्सल किस्से इथे संदर्भासाठी...
शिवाय त्याची ही लिंक
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/85214.html?1223306531 -
----------------------------------------------------------------------
बाई : ए लिंबं कशी दिली रे?
भाजीवाला : बहनजी २ रुपैय्ये का ५
बाई : इतना महाग काय को देता हय? वो कोपरे का भैय्या देड मे ५ देता हय.
भाजीवाला : बहनजी वो खराब माल बेचता है.
बाई : हां मेरे को शेंडी मत लगाओ, पिछली बार यहां से लिया था तो उसमे से २ किडा हुआ निकला था.
भाजीवाला : आज का माल अच्छा है बहनजी, चलो २ रुपैये का ७ लेलो,
बाई : हां, बराबर मोजा क्या?
------------------------------------------------------------------------
आमचे काका केबल वाल्याला तक्रार करतात
हमारे टिव्ही मे मुंगी मुंगी दिखता है...
------------------------------------------------------------------------
आमच्या समोरच्या फ्लॅटमधली बाई एकदा दुधवाल्याला म्हणाली "भैय्या हमारा एक लिटर
दूध तुम्हारे अंगपर है..."
-----------------------------------------------------------------------
घरमालक : सोनावनेजी आपका भाडा देनेका बाकी है.
सोनावने : अरे देता तो है ना, डुबवतंय काय? तुम्हारा डुबवके हमको क्या चैन मिलने वाला
हय? पण जरा तुम हमारी परिस्थिती हाय का नाय काय बघतंय का नाय? का नुसता उठसूठ
भाडा मागताय? हमारी परिस्थिती भी जरा बघो ना.......
घरमालक : लेकिन वो पिछले महिने का भी......
सोनावणे : अरे बाबा पिछले महिने हम वो पोळा सण के लिए गाव कू गया था ना...
घरमालक : पोळा???
सोनावणे : तुमको पोळा नै मालूम? उस दिन नही क्या वो बैल के शिंग को रंग लगाते है,
बैला के पाठिपर झूल टाकता है... तुम्हारे गाव मे नही होता है क्या...?
घरमालक : नही. इस महिने का तो देना ही पडेगा..
सोनावणे : ऐसा क्या? तो जरा अंदर आवो घर के. ये तुमने हमारे घर मे बांबु लगाया, कितना
बांबु लगाया, हमारा घर केवडा और तुम्हारा बांबु केवढा, अब हमारे घर में जब पावना लोग आता
है तो झोपनेकू जगा नही मिलती.. जगा नही मिलती तो कुछ पावना बांबु को टेकता है, वो बांबु को
टेकता है तो, उपर से माती गिरता है, हमारी मंडळी के कानानाकमें जाता है, वो तुम नीट करो पयले.
घरमालक: ???????
---------------------------------------------------------------------------
अजून शोधून लिहिन.... तो पर्यंत तुमचे लिहा...
(No subject)
आज हापिसात महिला वर्गाचे
आज हापिसात महिला वर्गाचे संभाषण
ए कैसा बनाया रे
बहोत सोप्पा हय रे,पयला किनई तिळ को भाजणे का, फिर शेंगदाणा को भी भाज के लेने का और कुटने का. गुळ को तुप के कढई मे दाल के ढवळणे का, फिर तिळ को भी उसमे दालने का और मिक्स करने का और थंड होने के बाद पुरा मिश्रण का लहान लहान लाडु वळणे का.
संजीव
संजीव
बाप्रे, ये सब ऐकनेवालोंको
बाप्रे, ये सब ऐकनेवालोंको कळणे का क्या ???
मस्तच किस्से, काल रत्नागीरी
मस्तच किस्से,
काल रत्नागीरी वरून येताना चिपळूण च्या अलिकडे एक बोर्ड दिसला . गाण्यच्या कार्यक्रमा संबधीत होता . "एक सुरमई सायंकाळ"
सुरमई सायंकाळ >>>
सुरमई सायंकाळ >>>
गेल्या आठवड्यातील ऑफिस मधला
गेल्या आठवड्यातील ऑफिस मधला किस्सा.
रोज केसांना तेल लावुन येणारा Accountant बिन तेलाचा आल्याने शेजारील सहकार्याने त्यास पुसले. "तुम्हारे बाल आज बिखरे हुए क्यू है?"
त्यावर Accountant, "वो थंडी है ना... इसलिये बॉटल मे तेल गोठा" :p
गोठा >
गोठा >
सुरमई सायंकाळ बर्याच
सुरमई सायंकाळ
बर्याच वर्षांपूर्वी एका जाहिरातीचा मजकूर मी कंपोझ केला होता, फायनल मजकूर माझ्याकडे प्रूफरीडिंगसाठी न येताच परस्पर अॅड एजन्सीकडे गेला. पुण्यातली प्रभात रोडची प्रथितयश अॅड एजन्सी. पण तिथे एक व्यक्ती धड मराठी कळणारी असेल तर शपथ! दुसर्या दिवशी पेपरात जाहिरात येणार तर आदल्या दिवशी तिथल्या बाईचा मला फोन - तिला फोनवरून मी पुन्हा पुन्हा सुरम''यी'' सायंकाळ असे सांगितले --- दुसर्या दिवशी सकाळच्या एंटरटेन्मेन्ट पेज वर ढळढळीत अक्षरातली जाहिरात ''एक सुरमई सायंकाळ....'' 

मी पुरती हताश आणि वाचणार्यांची खाशी करमणूक!!
हे फार जुने झाले, आता ( गेली
हे फार जुने झाले, आता ( गेली १० वर्ष तरी ) मराठी लोक चांगले हिंदी बोलतात.
बॉटल मे तेल गोठा >>>
बॉटल मे तेल गोठा >>>
पानी टाको
पानी टाको
गोठा.. 'एक सुरमई
गोठा..

'एक सुरमई संध्याकाळ..'.. आहाहा.. स्लर्प!!!!!
रिक्षावाला- हां madam .. ये आ
रिक्षावाला- हां madam .. ये आ गया आपका विठ्ठलनगर..
बाई- अरे नई नई यहा नई.. वो आगे वो 'चिंचेका' झाड दिखता है ना वहासें 'उजवीकडे वळके' थोडा आगे...
रिक्षावाला- अरे madam .. २० रु. मै यहा तक ही आता...
बाई- क्या आदमी हो... अरे कुछ 'माणुसकी' है की नही...

थोडा आगे छोडोंगे तो क्या 'झीझेंगा' क्या तुम्हारा रिक्षा.....
झीझेंगा :)
झीझेंगा

रविवारची आळसावलेली दुपार! फिश
रविवारची आळसावलेली दुपार! फिश चापून नवरा अंथरूणात पोहत आपलं लोळत होता... मेडिक्लेम वाल्याचा फोन! नवरा... "आधा घंटा के बाद फोन करो... अभी मे झोपे में हूं..."
तो मेडिक्लेमवाला झोपला वाटते नंतर! फोन आला नाही
:ह्ह्गलो;
:ह्ह्गलो;
'थोड्या वेळाने बात करुंगी',
'थोड्या वेळाने बात करुंगी', माझी एक नागपुरची मैत्रिण.
माझी काकू भाडेकरुशी बोलत
माझी काकू भाडेकरुशी बोलत होती...
काकू : संतोष है का?
भैया : नही ९ बजे आयेगा..
काकू : बुलाया उस्को नंतरको सांगो मी.....
ऑफिसातल्या ए.सी.ची फ्लॅप इकडे
ऑफिसातल्या ए.सी.ची फ्लॅप इकडे करा अशी पलिकडच्या रांगेतल्या लोकांची विनंती आली. तिकडच्या एका मुलीला थंड हवेचा त्रास होतो लवकर. मी पटकन म्हणालो, "अरे फ्लॅप उधर करेगा तो सुनीता* कुडकुडेगी ना !"
------------------------
* नाव बदलले आहे.
माझी आत्याची सासु आजारी पडली
माझी आत्याची सासु आजारी पडली होती ती.. शेजारची बाई विचारपुस करायला आली....आतेच रीपोर्टींग...

...एकदम घाईघाईमे डॉक्टर के पास लेके गए.. उन्होने चेक किया, बोला की उनके अंग मे रक्तच नही है ... ..
कुडकुडेगी>>> म हा न आहे अंग
कुडकुडेगी>>> म हा न आहे
अंग मे रक्तच नही है>>>>
माझे काका गम्मत करण्यासाठी
माझे काका गम्मत करण्यासाठी काकुला विचारायचे की "हाये राम कुडियोन्को डाले दाना" गाण्यामध्ये कुडिया म्हणजे काय ?
काकु : कुडिया म्हणजे कोम्बड्या...
काकु : कुडिया म्हणजे
काकु : कुडिया म्हणजे कोम्बड्या..>>>
अकु
अकु
उन्हाळाच्या दिवसात घरी
उन्हाळाच्या दिवसात घरी आलेल्या माझ्या एका परप्रांतिय मित्राला माझी आजी :
" इतने ऊन मे काय कू फिरता है? बरं आता आया है तो थोडा मक्खन का पानी पी के जाना हं "
(मक्खन का पानी = ताक हे गुह्य नंतर उलगडले)
गेली १० पाने वाचली.. कहर कहर
गेली १० पाने वाचली.. कहर कहर

मक्खन का पानी>>>>>>
मक्खन का पानी>>>>>>
मखन का पानी... ई.. देवा
मखन का पानी... ई.. देवा
माझ्या मामाची मुलगी
माझ्या मामाची मुलगी रडतहोती,एका हिंदी भाषीकाने मामाच्या मुलाला रडण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला वो मेरे मम्मी के मांगे मांगे पळत होती और धपकन पड गइ
Pages