सामान्यत्व

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे
कान-डोळे-मुख झाकून घेतले
तरीही रहावले नाहीच म्हणून
ताठ पाठ जगापुढे फिरवली
चवथे माकड जन्माला आले!

सलसलणारे प्रश्न होते,
रात्रीचा दिवस करून
डाच डाच डाचणारे होते,
डसणार्‍या प्रत्येक स्वप्नांवर
सारखे वाहणारे अश्रू होते,
धोपटमार्ग दिसत होते
पाऊल मात्र अडखळत होते,
अवघ्या जीवनाचे काय करावे
सर्व काही संभ्रमात होते,
एकेक आदर्श नाचत होते
लढ आयुष्याशी म्हणत होते,
निर्जीव वाटणार्‍या झाडातले
नवे अंकूर टोचत होते,
टाकं कात या शरीरातली
शरीर शरिरास म्हणत होते...

विरक्तीच्या प्रदीर्घ प्रवासानंतर
एके दिवशी डोळे उघडले
मुख पुटपुटले, कान टवकारले
विजनाच्या विरुद्ध दिशेने
वाकल्या पाठिने पाऊल फिरले
माकडातले माणूस जागे होऊन
धावत्या जगापुढे सन्मुख झाले,
उरल्यासुरल्या आयुष्याचे
तेच सामान्यत्व हातात होते...

प्रकार: 

गांधीजींच्या तीन माकडांप्रमाणे
कान-डोळे-मुख झाकून घेतले
तरीही रहावले नाहीच म्हणून
ताठ पाठ जगापुढे फिरवली
चवथे माकड जन्माला आले!

वाकल्या पाठिने पाऊल फिरले
माकडातले माणूस जागे होऊन
जगापुढे सन्मुख झाले,
उरल्यासुरल्या आयुष्याचे
तेच सामान्यत्व हातात होते...>>>>>>>>>>>>>>>

अप्रतिम
खूपच सुन्दर लिहिलय