
गोळ्यासाठी
२ कप मिल्क पावडर(कार्नेशन ची सगळ्यात चांगली)
१/२ कप सेल्फ रायझिंग फ्लोअर
६/८ oz हेव्ही व्हिपिंग क्रीम (गरज लागल्यास थोडी जास्त)
तळण्यासाठी तेल किंवा तुप
..........................................................................
पाकासाठी
सव्वा दोन कप साखर
सव्वा दोन कप पाणी
वेलची पावडर्(आवडत असल्यास गुलाबपाणी अथवा केवडापाणी)
मिल्क पावडर ,सेल्फ रायझींग फ्लोअर आणि क्रिम एकत्र करावे.
अगदी चांगले मळुन घ्यावे.गरज पडल्यास थोडे अधिक क्रिम घालुन घ्यावे.
जितक जास्त मऊ मळाल तितके गुलाबजाम चांगले होतात.
(मी फुड प्रोसेसर वापरते. )
आता एक सारख्या आकाराचे गोळे करुन घ्यावेत आणि मंद आचेवर तळुन घ्यावेत.
पाकासाठी :
साखर आणि पाणी एकत्र कळुन गॅस वर ठेवावे.
साधारण एकदा,दोनदा उकळी आली कि गॅस बंद करावा. वेलची पावडर घालावी.
आता तळलेले गुलाबजाम गरम पाकात सोडावेत.
पाक चांगला मुरल्यावर खायला द्यावेत.
हे गुलाबजामुन जवळजवळ खव्यासारखे लागतात. गिट्स पेक्षा वैगरे तर खुपच चांगले लागतात.:)
माझी बहिण इथल्या अगदी छोट्या टाऊन मध्ये रहाते. साध गव्हाच पीठ आणायच असेल तरी तीला ३/४ तास travel कराव लागत.(आता walmart मध्ये मिळत.)पण आमच्यासारख खवा , गिट्स वैगरे पटकन मिळण तर शक्यच नाही तीला. त्यामुळ तीन आणि तीच्य ऑफीस मधल्या मैत्रीणीन बरेच प्रयोग करुन ही रेसीपी तयार केली आहे.मला स्वताला इन्डियन दुकानातल्या फ्रोजन सेक्शन मधुन फारस काही आणायला आवडत नाही. ही रेसीपी मिळाल्यापासुन गुलाबजामसाठी तरी खवा आणायची गरज पडली नाही.:)
पीठाची consistency(अगदी मऊ) योग्य असणे अतिशय गरजेचे आहे. जर का गुलाबजाम घट्ट झालेत असतील तर हमखास क्रीम कमी पडली आहे किंवा पीठ कमी मळल गेल आहे अस समजाव.
सीमा, मी पॅनकेक वा वॅफल मिक्स
सीमा, मी पॅनकेक वा वॅफल मिक्स फ्लोअर सेल्फ रायसिंग्च्या एवजी घालून केलेत व चांगले लागते. पण क्रीम एवजी दही मिश्र तूप वापरले होते. आता क्रीम घालून बघायला हवे.
तयार झालेले गुलाबजाम असे
तयार झालेले गुलाबजाम असे दिसतात.:)


शेजारचा खलबत्ता गुलाबजाम फोडण्यासाठी ठेवलेला नाही
सहीए नक्की करुन बघणार!!
सहीए नक्की करुन बघणार!!
>>शेजारचा खलबत्ता गुलाबजाम
>>शेजारचा खलबत्ता गुलाबजाम फोडण्यासाठी ठेवलेला ना>><<
हे सांगितलेस ते बर केलेस बाई.
नाहीतर मी क्रीम घालून करायचा प्लॅन बारगळला असता. (just kidding)
काय दिस्ताहेत गुलाबजाम!!!
काय दिस्ताहेत गुलाबजाम!!! लागाला!!! पुढल्या वेळी गुलाबजाम करताना हीच पध्दत वापरणार!
ह्म्म्म्...लई भारी,आख्ख भांड
ह्म्म्म्...लई भारी,आख्ख भांड उचलुन घ्यावस वाटतय.
अगदी!! आहा दिसतायत!! खवा आणून
अगदी!! आहा दिसतायत!!
खवा आणून ठेवलाय.. त्याचे काय करू आता?
वा....! मस्त दिसतायत.
वा....! मस्त दिसतायत.
खलबत्त्याचं सांगितलंस ते बरं झालं.
संजीव कपूराची गुलाबजामुनची
संजीव कपूराची गुलाबजामुनची रेसीपीत तो मिल्क पॉवडर, थोडेचेस पनीर्, क्रीम, व जरासाच मैदा व बेपॉ असे दाखवले होते.
सीमा गुलाबजाम एकदम जबरी
सीमा
गुलाबजाम एकदम जबरी दिसताहेत. नक्की करून बघणार.
पॅनकेक मिक्सनेहि छान होतात.
पॅनकेक मिक्सनेहि छान होतात. किती एकसारखा आकार आणि रंग आलाय. मस्तचं.
छान आहे कृति आणि फोटोपण !!!
छान आहे कृति आणि फोटोपण !!!
छानच आहेत गुलाबजाम.
छानच आहेत गुलाबजाम.
मस्तच झालेत गुलाबजाम, नक्की
मस्तच झालेत गुलाबजाम, नक्की करुन बघेन.
फक्त मला एक शंका आहे कि "सेल्फ रायझिंग फ्लोअर" म्हणजे काय?
आपला मैदाच का.
मिल्क पावडर fat free वापरायची
मिल्क पावडर fat free वापरायची की नेहमीची?
मला गुलाबजाम(किंवा खव्याचे
मला गुलाबजाम(किंवा खव्याचे पदार्थ) फारसे आवडत नाहीत. पण एक तर यात खवा नाहीच आणि फोटो? वॉव! तो पाहून अगदी आत्ताच करायला घेईनसं वाटतंय!
धन्यवाद सगळ्याना. रुपा
धन्यवाद सगळ्याना.
रुपा कोणतीही मिल्क पावडर वापरली तरी. वरच्या गुलाबजाम मध्ये मी fat free वापरली आहे (Not that I need it :P) कारण तीच available होती.
वर्षा सेल्फ रायझिंग फ्लोअर म्हणजे बेकिंग पावडर घातलेला मैदा.
ही link बघा
http://southernfood.about.com/cs/breads/ht/self_rise_flour.htm
मी तयारच सेल्फ रायझिंग फ्लोअर नेहमी वापरलय. त्यामुळ मला माहित नाही वरच्या मेथड न results कसे येतात ते.
मी आज ह्याप्रकारे गुलाबजाम
मी आज ह्याप्रकारे गुलाबजाम केले.एकदम सहि झालेत.खव्यासारखे.
माझ्याकडे साधा मैदाच होता.त्यात मी बेकींग पावडर मिक्स केली.
कसले मस्त दिसत आहेत गुलाबजाम
कसले मस्त दिसत आहेत गुलाबजाम !!
लगेच एक उचलून खावा वाटतोय !!!!!
अगदी चांगले मळुन घ्यावे >>>
अगदी चांगले मळुन घ्यावे >>> सॉरी अगदी बेसिक प्रश्न विचारते आहे. फक्त क्रीम पुरते की मळताना अजून पाणी/दूध काही घालावे लागेल ?
मी सांगु का?(सांगतेच ) मी
मी सांगु का?(सांगतेच :)) मी फक्त क्रिम वापरले. पण सहिच होतात हे गु.जा.
धन्यवाद !! ते बघूनच कळते आहे
धन्यवाद !! ते बघूनच कळते आहे
वा. वा. किती सुंदर दिसत
वा. वा. किती सुंदर दिसत आहेत.
सीमा- भारतात काय गं वापरता येईल सेल्फ रायझींग फ्लोअर ऐवजी ? आणि व्हिपड क्रीम म्हणजे साय का ?
सीमा- भारतात काय गं वापरता
सीमा- भारतात काय गं वापरता येईल सेल्फ रायझींग फ्लोअर ऐवजी ?>>>>>>>>>>>>
मी १कप साधा मैदा +१ टीस्पून बेकींग पावडर वापरलं.पहीला गु.जा.तळुन झाल्यावर तो थोडा कडक वाटला म्हनुन थोडी बे.पा. अजुन टाकली.
धन्यवाद रुपा. आणि मिल्क पावडर
धन्यवाद रुपा. आणि मिल्क पावडर कुठली घेतलीस ?
आमच्याईथे fat free मिळते,तीच
आमच्याईथे fat free मिळते,तीच घेतली.पण वर सीमाने सांगितलय की कोणतीही चालेल.
कालच केले हे गुलाबजाम. डबल
कालच केले हे गुलाबजाम. डबल क्रिम घातले मी.
खुपच छान झाले आहेत. माझ्या ४ वर्षाच्या लेकीने भरपूर वेळ मळुन (खेळुन) दिले, त्यामुळे फुड प्रोसेसरची गरज पडली नाही.
वि. क्रीम ऐवजी साय चालेल का ?
वि. क्रीम ऐवजी साय चालेल का ? इथे क्रीम चांगले मिळत नाहि.
सही रेसिपी आहे. आज केले होते
सही रेसिपी आहे. आज केले होते गुलाबजाम ह्या रेसिपीने.क्लासच झाले.
खतरनाक फोटो आहे !!!!
खतरनाक फोटो आहे !!!!
Pages