
गोळ्यासाठी
२ कप मिल्क पावडर(कार्नेशन ची सगळ्यात चांगली)
१/२ कप सेल्फ रायझिंग फ्लोअर
६/८ oz हेव्ही व्हिपिंग क्रीम (गरज लागल्यास थोडी जास्त)
तळण्यासाठी तेल किंवा तुप
..........................................................................
पाकासाठी
सव्वा दोन कप साखर
सव्वा दोन कप पाणी
वेलची पावडर्(आवडत असल्यास गुलाबपाणी अथवा केवडापाणी)
मिल्क पावडर ,सेल्फ रायझींग फ्लोअर आणि क्रिम एकत्र करावे.
अगदी चांगले मळुन घ्यावे.गरज पडल्यास थोडे अधिक क्रिम घालुन घ्यावे.
जितक जास्त मऊ मळाल तितके गुलाबजाम चांगले होतात.
(मी फुड प्रोसेसर वापरते. )
आता एक सारख्या आकाराचे गोळे करुन घ्यावेत आणि मंद आचेवर तळुन घ्यावेत.
पाकासाठी :
साखर आणि पाणी एकत्र कळुन गॅस वर ठेवावे.
साधारण एकदा,दोनदा उकळी आली कि गॅस बंद करावा. वेलची पावडर घालावी.
आता तळलेले गुलाबजाम गरम पाकात सोडावेत.
पाक चांगला मुरल्यावर खायला द्यावेत.
हे गुलाबजामुन जवळजवळ खव्यासारखे लागतात. गिट्स पेक्षा वैगरे तर खुपच चांगले लागतात.:)
माझी बहिण इथल्या अगदी छोट्या टाऊन मध्ये रहाते. साध गव्हाच पीठ आणायच असेल तरी तीला ३/४ तास travel कराव लागत.(आता walmart मध्ये मिळत.)पण आमच्यासारख खवा , गिट्स वैगरे पटकन मिळण तर शक्यच नाही तीला. त्यामुळ तीन आणि तीच्य ऑफीस मधल्या मैत्रीणीन बरेच प्रयोग करुन ही रेसीपी तयार केली आहे.मला स्वताला इन्डियन दुकानातल्या फ्रोजन सेक्शन मधुन फारस काही आणायला आवडत नाही. ही रेसीपी मिळाल्यापासुन गुलाबजामसाठी तरी खवा आणायची गरज पडली नाही.:)
पीठाची consistency(अगदी मऊ) योग्य असणे अतिशय गरजेचे आहे. जर का गुलाबजाम घट्ट झालेत असतील तर हमखास क्रीम कमी पडली आहे किंवा पीठ कमी मळल गेल आहे अस समजाव.
कसला भारी फोटो आहे. एखाद्या
कसला भारी फोटो आहे. एखाद्या रेसिपी पुस्तकात शोभेल असा. हल्ली गुलाबजाम आणाणं, करणं होत नाही. घरात मिल्क पावडर आहे तेव्हा ट्राय करायला हवेत.
६/८ oz हेव्ही व्हिपिंग क्रीम
६/८ oz हेव्ही व्हिपिंग क्रीम >>> म्हणजे किती कप??
आख्ख भांड उचलुन घ्यावस
आख्ख भांड उचलुन घ्यावस वाटतय.>>>>> +१
इथे कुवेतला सुद्धा खवा मिळत
इथे कुवेतला सुद्धा खवा मिळत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा असेच करतो गुलाब जाम
पण मी मैदा आणि बेकिंग पावडर वापरते....सेल्फ रायझिंग फ्लोअर नाही.
ह्यात माझे चार आणे :
मी मैदा आदल्या दिवशी रात्री फ्रिझर मधे ठेवते आणि क्रिम फ्रिज मधे. त्यामुळे गोळे करतांना तेल सुटत नाही.
गुलाबजाम मंद आचेवर तळले की आतून छान रवाळ राह्तात.
गुलाब जाम अगदी उकळत्या पाकात न टाकता थोडी वाफ जिरली की मग घालते म्हणजे गुलाबजाम पिचपिचीत होत नाहीत.
कधी कधी साध्या क्रीम ऐवजी त्यात फ्लेवर्ड म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम घालते. मस्त स्ट्रॉबेरी फ्लेवरचे गुलाबजाम तय्यार
कालच केले हे गुलाबजाम. छान
कालच केले हे गुलाबजाम. छान झालेत.
सेल्फ रेझींग फ्लाअर ऐवजी मैदा
सेल्फ रेझींग फ्लाअर ऐवजी मैदा + बेकींग पावडर वापरायची असेल तर काय प्रमाण असावं हे कोणाला माहित आहे का?
मी कोणाकडून तरी पॅनकेक मिक्स् वापरून गुलाबजाम करण्याबद्दलही ऐकलंय .. कोणी तसे केले आहेत का?
सशल बर्याचशा केक रेसिपीत असे
सशल बर्याचशा केक रेसिपीत असे असते
For each cup of all-purpose flour, add 1 1/4 - 1 1/2 teaspoons of baking powder and 1/4 - 1/2 teaspoon of salt. याला पण चालेल का ते माहित नाही.
सशल, मिल्क पावडरच्या निम्मं
सशल, मिल्क पावडरच्या निम्मं पॅनकेक मिक्स (बिस्क्विक ब्रॅन्ड) - आणि मऊ होईस्तोवर हेवी क्रीम घालून मळायचं - असं ऐकलं आहे मी प्रमाण.
निम्मी म्हणजे मापाने निम्मी. वजनाने नव्हे.
अरे वा .. धन्यवाद रुनी आणि
अरे वा .. धन्यवाद रुनी आणि स्वाती ..
माहितीबद्दल धन्यवाद सेल्फ
माहितीबद्दल धन्यवाद
सेल्फ रायझिंग फ्लोअर अन हेव्ही व्हिपिंग क्रीम म्हणजे नेमके काय? इकडे देशात काय नावाने मागायचे?
मी आज ह्याप्रकारे गुलाबजाम
मी आज ह्याप्रकारे गुलाबजाम केले. एकदम मस्त झालेत. धन्यवाद सीमा.

एकदम शाही!
एकदम शाही!
Pages