गुरुदक्षिणा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मूळ लेख तारीखः ४ आगस्ट २००७, San Diego, CA.

गुरूदक्षिणा:

आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमे झिन्दगी बितादो
पल जो ये जानेवाला है

या गीताचे शब्द जितके खरे तितकेच त्याला लाभलेला सूरही अजरामर! ते पल पुन्हा परत येणार नाहीत पण ते सूर मात्र आजही कायम आपल्या मनाचा वेध घेतात. त्या सूरान्ची जादू आजही अवघ्या सन्गित दुनियेवर कायम आहे. अन तो जादूगार म्हणजेच आभास कुमार गान्गुली उर्फ़ किशोर कुमार उर्फ़ दादा उर्फ़ किशोर दा उर्फ़ गुरू, जो खर्‍या अर्थाने प्रत्त्येक सप्तकातील सूर जगला अन त्याच्या नन्तर अनेक कुमार आले, गेले, येतील जातील पण या सम दुसरा झाला नाही, होणारही नाही.

गुरूच्या 76 व्या जन्मदिनानिमित्त ( 4 ऑगस्ट 1929 ) ही छोटीशी गुरूदक्षिणा.

संगीताच वातावरण घरातच असल्याने, लहानपणापासून कानावर उत्क्रुष्ट सन्गीत पडत असे. अगदी नाट्य गीतापासून ते तत्कालीन पन्चम च्या पाश्चात्त्य ढन्गाच्या संगीतापर्यन्त किव्वा बप्पीदांच्या डिस्को गीतापर्यन्त सर्व. पण त्या सर्वातून एक स्वर, एक आवाज कायमचा काळजात उतरला अन त्या जागेत अजूनही कुठल्याही प्रथितयश गायकाला प्रवेश बन्दी आहे. अलिकडच्या काळात हरिहरन जी ना मी सर्व द्रुष्टीने सन्गीतात सर्वोच्च मानतो पण गुरूची जागा त्यान्नाही घेता आलेली नाही. अमित कुमारशी वैयक्तीक ओळख होवून त्याच्या बद्दल सहानुभूती असली तरिही नीरक्षीर विवेक जागृत असल्याने अगदी स्वप्नातही, माझ्या मनातील किशोरदान्च उर्फ़ गुरूचे स्थान अढळ आहे. प्रायोगिक दृष्टिकोनातून व काळजाला भिडणारा स्वर या निकषावर बाबूजी उर्फ़ सुधीर फ़डके यान्चा सूर कदाचित गुरू एव्हडाच मला प्रीय वाटतो.

सुरूवातीच्या खडतर काळात कुन्दनलाल सैगल ची नक्कल करून धडपड्णारा किशोर आणि नन्तर शेवटच्या चित्रपटात (सागर) रिशी कपूर साठी किव्वा अनिल कपूर साठी ( Mr India )पार्श्वगायन करणारे किशोर दा हा प्रवास निव्वळ अदभूत आहे अन त्या प्रवासात मार्गात आलेल्या प्रत्त्येक गीताच, धूनेच, जणू त्यान्च्या परीस स्पर्शाने सोन झाल.काय नाही केल गुरू ने, नकला, गायन, गीत, सन्गीत दिग्दर्शन, न्रुत्त्य, रन्गमन्चावर, चित्रपटात प्रमूख भूमिका, दिग्दर्शन, निर्मिती, एकाच व्यक्तीत इतके पैलू अन तेही अतीशय सरस दर्जाचे आढळण म्हणजे लाखात एक गोष्ट आहे. आकडेवारीपेक्षा मला इतर काही खास गोष्टि अधिक मोलाच्या वाटतात, त्यातलीच एक म्हणजे एखाद्या अभिनेत्या साठी पार्श्वगायन करताना किशोरदान्नी वापरलेला ठरावीक आवाज, त्यातील चढ उतार, शब्दफ़ेक, भावनात्मक वैशिष्ट्ये.

"पग घुन्गरू बान्ध मिरा नाची थी "(नमक हलाल)या गाण्याची सुरुवात ऐका, किव्वा "ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना"गाण्या आधी च, ला ला ला ला ऐका, किव्वा "देखाना हाये रे सोचाना" या बॉम्बे टू गोवा मधिल गाण्यातील युडलीन्ग, दन्गा, अन शब्दावर जोर देण्याची अदा ऐका किव्वा, खैके पान बनारसवाला मधिल अगदी अमिताभ चा आवाज वाटेल असा सूर व शब्दफ़ेक ऐका किव्वा "इन्तहा हो गयी मधील" ते उचकी लागल्यागत म्हणण ऐका, पडद्यावर फ़क्त अमिताभच असू शकतो यात शन्का रहात नाही. अमिताभ साठी एक बुलन्द, आतून निघणारा, खोलवर, तर दर्दभर्‍या गाण्यातूनही (बडी सुनी सुनी है)एक प्रचन्ड आत्मविश्वास दर्शविणारी शब्दफ़ेक किशोरदा नी खास वापरली आहे हे लक्षात येईल.

यापेक्षा ये दिल ना होता बेचारा, किसका रस्ता देखे, गाता रहे मेरा दिल, शोखियो मे घोला जाये ही देवानन्द साठी गायलेली गाणी ऐका, किशोर दानी अतिशय मधुर आवाजात, शब्दान्वर कमी जोर देवून, एका मादक लयीत ही गाणि सादर केल्याच जाणवत.

राजेश खन्ना उर्फ़ काका साठी गायलेली गीते, ये क्या हुवा, रुप तेरा मस्ताना, वो शाम कुछ अजीब थी, झिन्दगी के सफ़र मे गुजर जाते है, जय जय शिव शन्कर, चला जाता हूं किसी की धून मे, इत्यादी गीते ऐकल्यावर जाणवेल की काका साठी किशोरदान्ची गाण्याची एक खास अदा होती. युडलिन्ग चा वापर त्यान्नी स्वतावर चित्रीत केलेल्या गाण्यान्खेरीज राजेश खन्नाच्या गाण्यात जास्त केला. कदाचीत राजेश खन्नाची त्या काळातील प्लेबॉय इमेज, स्त्रीवर्गातील प्रचन्ड लोकप्रियता, नाचण्याची एक दिलफ़ेक अदा या सर्वाच एक मिश्रण जणू किशोरदान्च्या गायकीतून प्रकट होत असे. याच बरोबर सन्जिव कुमार साठी गायलेली अगदी हलक्या स्वरातील तेरे बिना झिन्दगी से कोई शिकवा, तुम आ गये हो नूर आ गया है, किव्वा अनामिका मधिल मेरी भिगी भिगी सी इत्यादी गीते ऐकताना लक्षात येत की शब्द उचारात एक मिठास, नाजूकपणा अन खास सन्जिव कुमार संवाद स्पर्श जाणवतो.

स्वतासाठी गुरू ने गायलेली गाणि म्हणजे सन्गीत रसिकान्साठी एक दृक्श्राव्य पर्वणी आहे. स्वतावरच गाणे चित्रीत असल्याने त्यानी त्या स्वातन्त्र्याचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. गाना ना आया बजाना ना आया असली गद्य पद्य गाणी, किव्वा मै हू झुमरू, हम थे वो थी और समा रन्गीन, किव्वा हाफ़ तिकीट चित्रपटातील गीते, या सर्वातून किशोरदान्च्या आतील एक हपापलेला, खोडकर, विक्षीप्त कलावन्त नजरेस पडतो.

कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय शिक्षण वा तालिम न घेता स्वताच्या अन्गीभूत कलेच्या व गुणान्च्या बळावर अन अविरत तपश्चर्येवर या माणसाने पार्श्वसन्गीताची एक स्वतन्त्र बखरच लिहीली, ज्याच्या व्याकरणात, पार्श्व गायनात अभिप्रेत- अभिनय, भाव, शब्दोच्चार, नानाकळा, काही युडलीन्ग, काही संवादात्मक जागा, हिन्दी वा उर्दू भाषेतील अक्षरावरील वा खालील टिम्ब, नुकता, इत्यादीनुसार केलेले शब्द उच्चार, अशा अनेक गोष्टी समाविष्ट होत्या.

कव्वाली किव्वा शास्त्रीय पद्धतीची गाणी किशोरदा ना रफ़ी इतकी जमत नसत असा एक सर्व समज होता, जो काही प्रमाणात खरा असला तरिही माझ्या मते ते फ़क्त सौन्दर्‍याच गालबोट होत. अर्थात गुरू ने त्याही प्रकारची गीते गायली (हाल क्या है दिलोन्का ना पूछो सनम ही कव्वाली, किव्वा जाने क्या सोच कर नही गुजरा हे गझल मिश्रीत शास्त्रीय पध्धतीचे गीत अशी अनेक उदाहरणे आहेत). पडद्यावरील कलाकाराला अगदी त्याचा वाटेल इतका हुबेहूब आवाज देण हे फ़क्त किशोर कुमार नामक पार्श्वगायकालाच जमले आहे असे माझे ठाम मत आहे. (अगदी अलिकडे सल्लू मिया साठी, मैने प्यार किया पासून, एस. पी. बालासुब्रमण्यम किव्वा बालूजी हाच आवाज आहे असे वाटतानाच तेरे नाम मधिल उदीत नारायण ने त्याला दिलेल पार्श्व गायनही तितकच यथायोग्य वाटल. अर्थात आजकाल सर्वच बदलतय, त्यातलाच हा प्रकार!)

किशोरदा स्वता पाश्चात्त्य सन्गीताचे खूप भोक्ते होते, त्यातही ऑपेरा संगीत, ते म्हणण्याची पद्धत याच त्यान्ना खास आकर्शण. इना मिना डीका सारखी गीते किव्वा युडलिन्ग ची मूळे कुठेतरी या त्यान्च्या आवडीत दिसून येतात. सुरान्चे वैविध्य, चढ उतार तर यान्नी एखाद्या कसल्या गवयाला लाजवतील इतक्या लीलया पेलले आहेत. फ़ार पूर्वीचे त्यान्चे एक गाणे, जीन रातोन्की भोर नही है (सैगल च्या काहिश्या स्टाईलमधे) अगदी खालच्या सप्तकातले खर्जातले याउलट कोई हमदम न रहा या गाण्याच्या कडव्यात, शाम तनहाईकी है आयेगी मन्जील कैसे म्हणताना त्याम्चे स्वर अतीतीव्र सप्तकासही सहज स्पर्श करून येतात. "झिदगी का सफ़र है ये कैसा सफ़र" या सम्पूर्ण गाण्यात त्यान्नी टिकवलेला आर्त पण तितकाच गम्भीर स्वर केवळ महान आहे. मै शायर बदनाम या नमक हराम मधिल गीतात एखाद्या कवीच वैफ़ल्य आवाजातून प्रकट करताना किशोरदान्नी घेतलेले pause विलक्षण आहेत. स्वताच्या गायकीवर पडद्यावरील चित्र सहज उभे करू शकणारा असा गवई विरळाच.
जसे पडद्यावरील पात्र तशी कीशोरदांची गायकीची शैली, अदा त्या साच्यात त्यांन्नी ओतली आहे: प्यार का मौसम मधला भारत भूषण (तुम बीन जाऊ कहा), शराबी मधिल बेवडा अमिताभ (इन्तहा, दे दे प्यार दे), नमक हलाल मधिल वात्रट अमिताभ (आज रपट जाये), अमर प्रेम मधिल हळवा राजेश खन्ना (कुछ तो लोग कहेंगे), गाईड मधिल झुलणारा देव आनंद (गाता रहे मेरा दिल), ड्रीम गर्ल मधला लडीवाळ आशिक धरमेंद्र (पल पल दिल के पास), तोहफा मधला अवखळ (कायम उड्या मारणारा) जीतेंद्र (प्यार का तोहफा तेरा), दीवार, त्रिशूल मधला शशी कपूर (मैने तुझे मांगा तुझे पाया है), घर चित्रपटातील विनोद मेहेरा (आपकी आखो मे कुछ), सीता और गिता मधील संजीव कुमार (हवा के साथ साथ), खेल खेल मे, सागर मधला रिशी कपूर, अशी कितितरी उदाहरणे आहेत ज्यात पडद्यावरील कलाकाराचा "आवाज" किशोरदा पूर्णपणे जगलेत.

१९५० पासून ते जवळ जवळ १९९० पर्यंत चार दशके गुरूने त्याच्या सुरातील जादू चित्रपटसृष्टीवर कायम ठेवली. गुरूच्या यशात सलिल चौधरी, SD बर्मन, पंचम, कल्याणजी आनंदजी, बप्पीदा, राजेश रोशन, या संगीतकारांचाही महत्वाचा वाटा आहे. त्ञाच बरोबर लता दिदी, आशा ताई, गिता दत्त, या महान गायिकांचाही तितकाच मोठा सहभाग आहे. पण एक मान्य करावच लागेल की संगीतकाराने बान्धलेली चाल, गीत यावर या महान गायकाचा परीस स्पर्श हा अनेक गीते अजरामर करून गेला. गुरूची गाणी श्रोत्याशी "संवाद" साधतात हे त्यांच फार मोठ यश आहे असे मि मानतो.

गुरूची अनेक अजरामर गीते आहेत, सन्ख्या, आकडेवारी, लोकप्रियता, मान सन्मान, इत्यादी अनेक गोष्टी बहुचर्चीत व सर्वश्रुत आहेत त्यावर मि काहिही लिहीणे म्हणजे त्या अथान्ग समुद्रात आचमनाचे पाणी सोडल्यागत होईल यापेक्षा काही वैयक्तीक अनुभव व इतर गोष्टी लिहीणे अधिक उचित ठरेल.

गुरू हा माझाही सन्गितातील गुरू आहे, किव्वा मी तसे मानतो. वयाच्या साधारण दहाव्या वर्शापासून प्रथम गीते casstte वर ऐकली ती अमर प्रेम मधली अन नन्तर शाळा, महाविद्यालय, करता करता अनेक गोष्टि बदलल्या पण गुरूचे सूर मात्र कायम जवळ ठेवले. मला आठवते अभियांत्रिकी शिक्षणाच्या "सुवर्ण" कालात रोज झोपताना उशाशी गुरूच्या असंख्य गीताची आक्षरशः कोटी पारायणे झाली आहेत. कितिही ऐकले तरी अवीट... भारतात बरीच वर्षे तर गेले सात आठ वर्ष अमेरीकेतही अनेक कार्यक्रम इत्यादीतून गुरूची गाणी गाण्याची सन्धी मिळत गेली त्यातून अनेक भेटी गाठी ओळखी होत गेल्या अन लक्षात आले की गुरू चे अनेक चाहते आहेत, लहानान्पासून थोरान्पर्यन्त अगदी परवा एका इथे अमेरिकेत जन्म घेतलेल्या पन्धरा वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाने, एका कार्यक्रमात मला मेरे नैना सावन भादो म्हणायची फ़र्माईश केली तेव्हा मी थक्क झालो होतो.

मिशीगन मधे असताना अमित कुमार बरोबर रन्गमन्चावर गायची सन्धी मिळाली नन्तर एकदा क्लीवलन्ड मधे तो आला असताना मस्त गप्पा मारत बसलो होतो तेव्हा त्याच्याकडून " बाबा " म्हणजे किशोरदान्च्या अनेक विक्षीप्त पण अद्भूत कहाण्याही ऐकल्या. (कधी त्यान्च्या नक्षेकदमवर पाऊल टाकणारा अन तितकीच गुणवत्ता लाभलेला अमित कुमार मात्र दारूच्या व्यसनापायी उध्वसत झालेला, गाताना त्याचे ते मधेच हापणे, श्वास कमि पडणे वगैरे जवळून पाहिले तेव्हा मात्र पन्नाशी उलटल्यावरही किशोरदानी टिकवलेल्या सुराच, गळ्याच, गायकीच अपार कौतूक वाटल अन प्रचन्ड आदर निर्माण झाला). सान्ता क्रूझ, खार येथील हर्शद साडा नावाचे गृहस्थ भेटले होते इकडे. किशोर दान्चे एकेकाळी मुम्बईत पालक, म्हणून त्यान्नी काम केले. अनेक गवई, वादक इत्यादीन्च्या सहवासात राहिलेल्या या माणसाकडे किशोरदान्च्या खान्डवा बन्गल्याच्या चाव्या असत. बर्मन दादा, तसेच पन्चम, कल्याणजी भाई इत्यादिन्बरोबर गाणे ध्वनिमुद्रीत करताना किशोरदानी केलेला खट्याळपणा, कधी भान्डणे तर कधी लहरीपणा याचे किस्से त्यान्नी सान्गितले तेव्हा इतका महान गायक, कलाकार काही वेळा दुसर्‍या कलाकाराला इतका त्रास देवू शकतो यावर विश्वास बसला नाही. मोठ्यान्च्या मोठ्या गोष्टि तद्वतच बहुदा गुरूचा विक्षीप्तपणाही मोठाच.

संगीतच्या या प्रान्तात दरमजल करताना पन्डित नारायण राव देशपान्डे (पन्डित भिमसेन्जीचे 1950 पासूनचे शीष्य, भारत सरकारकडून 1972 मधे सूरमणी किताब मिळवलेले अन स्वता पडितजीन बरोबर अनेक वर्षे जगभर गायनात साथ केलेले, पुण्यात गन्धर्व ला गायलेले एक महान कलावन्त) यान्ची ओळख झाली. त्यान्च्या कार्यक्रमातून त्यान्ना तबल्यावर सन्गत करता करता हिन्दी गाण्याच्या, गायकान्च्या गोष्टी निघाल्या अन पन्डितजीन्चे (देशपान्डे)आवडते एकच गायक म्हणजे किशोर दा. किशोरदान्ची गाणी ऐकायला सहज वाटतात तितकीच ती गायला किती कठीण आहेत हे त्यान्च्याकडूनही ऐकल्यावर माझ्यातील गायक, गुरूचा शिष्य पुन्हा एकदा नतमस्तक झाला.

गुरूच्या या जन्मतिथी निमित्त हे सान्गताना आनन्द होतो की पन्डीत देशपान्डे यान्चे बरोबर एक नविन सीडी उपक्रम लवकरच ध्वनिमुद्रीत करत आहोत. यात पन्डितजिन्नी काही रागान्वरील छोट्या चीजा गायल्या असून त्यावर आधारीत किशोरदान्ची गाणी मी गायली आहेत. शास्त्रीय सन्गितावर आधारीत चित्रपटातील गाण्यात गुरूने कशा प्रकारे काही गाण्याचि अन्गे वापरली आहेत अशाप्रकारचे एक सादरीकरण आहे. निदान आजकालच्या हिडीस आणि विदृप (ऐकायलाही व बघायलाही) रिमिक्स गीतान्पेक्षा मूळ गाण्याची लोकप्रियता व गोडी टिकवत, आपल्या तोकड्या प्रयत्नान्नी एक प्रकारे या महान कलावन्ताला दिलेली मी ही गुरूदक्षीणा समजतो. गुरूच्या गीतान्ची पूजा, साधना, सादरीकरण गेली अनेक वर्षे केले पण फ़ूल ना फ़ुलाची पाकळी म्हणून गुरूदक्षिणा देण्याचा योग आज आला.

आपणही मोठ्या मनाने या गुरूदक्षिणेला प्रोत्साहन द्याल व या प्रयत्नाचे खुल्या दिलाने स्वागत कराल अशी आशा करतो. नजीकच्या भारत भेटीनन्तर ही सीडी ध्वनीमुद्रीत करून पूर्ण झाली की इथेच आपल्याला कळवेन तोपर्यन्त, गुरूचा आशिर्वाद तुमच्याही कार्यक्षेत्रात लाभो हीच सदिच्छा!

(ता:कः ध्वनिमुद्रण व इतर काम अजूनही अपूर्ण असल्याने तूर्तास हा प्रकल्प अपूर्ण आहे...)

जाता जाता: ३१ ऑक्टोबर २००८ ला मुम्बई ला यशवंतराव चव्हाण सभागृहात, मधुर आवाजाच्या यशस्वी गायिका माननीय सौ. मृदुला दाढे जोशी यान्च्याबरोबर संगीताचा-गायनाचा कार्यक्रम झाला. अगदी २ आठवड्याच्या नोटीस वर कार्यक्रम झाला. पण म्रुदुला ताइंबरोबर भन्नाट ट्युनिंग झाल्याने रसिकांन्ना प्रचंड आवडला. आम्ही दोघानी १९५० पासून १९७०-८० पर्यंतची कीशोर- आशा, लता अशी ड्युएट्स आणि सोलो गीते जवळ जवळ अडीच तास सादर केली. त्या निमित्तानेही आजही या महान गायकाबद्दल सर्व जनमानसात किती आदर, कौतूक अन अपार प्रेम आहे हे जवळून अनुभवल. गुरू च्या गाण्यांची अशी सेवा-भ़क्ती करण्याच भाग्य नजीकच्या काळात पुन्हा लाभणार आहे.. तुम्हा सर्वाना आग्रहाचे निमंत्रण नक्की येईल.

तूर्तास जमेल तसे या कार्यक्रमाचे फोटो वा विडीयो अपलोड करेन.

विषय: 
प्रकार: 

अप्रतिम, योग. चिमण्या गोखलेंना तुम्ही दिलेल्या प्रतिसादात ही लिंक मिळाली आणि पुन्हा एकदा किशोरकुमार हा एक मनस्वी, कलंदर माणुस अनुभवायला मिळाला. धन्यवाद.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

Unequaled, yoga. The link you only Goklenna Cimnya Dilelya Pratisadat Kisorkumar Ha मिळाली Ani Punha once upon a time a thoughtful person, Klnder Anubwayla मिळाला Manus. Thank you.
Rikvest Mridula Joshi Dade Yancha phone? एका Karkramasathi मिलेल
Thanks.

गोखलेंना तुम्ही दिलेल्या प्रतिसादात ही लिंक मिळाली >>>> हो ना, नाही तर किशोरदांवरचा एक भन्नाट लेख मी मिसलाच होता की.........

आभास कुमार गान्गुली उर्फ़ किशोर कुमार उर्फ़ दादा उर्फ़ किशोर दा उर्फ़ गुरू, जो खर्‍या अर्थाने प्रत्त्येक सप्तकातील सूर जगला अन त्याच्या नन्तर अनेक कुमार आले, गेले, येतील जातील पण या सम दुसरा झाला नाही, होणारही नाही. >>>>> +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००