१९ ऑगस्टला मिळालेली पतेतीची आयती सुट्टी.. मग कशाला घरी बसुन आळस देत वाया घालवा.. लगेच नेटवर कुठले ट्रेक करता येईल बघु लागलो नि तोच एक फोटो समोर आला..
खल्लास.. बरेच दिवसापासुन इथे जायचे राहिले होते..म्हटले आता इथेच जायचे.. लगेच मित्राला फोटोसकट माहिती मेल केली नि तोपण खुष झाला !
सारे काही अचानकपणे घाईमध्ये आदल्यारात्री ठरले !
कलावंती दुर्ग हा एक सुळकाच आहे. नेटवर मिळालेल्या माहितीप्रमाणे हा सुळका बाजुलाच लागुन उभ्या असलेल्या प्रबळगडाचे उपांग असुन त्याला कलावंतिणाचा महाल म्हणुनही ओळखले जाते.
प्रबळगड हा मोंगल्यांच्या ताब्यात होता. प्रबळगडाचा किल्लेदार कुणी राजपुत होता आणि त्याचे कोण्या कलावतीवर प्रेम होते. तिने निघुन जाउ नये म्हणुन त्याने तिला प्रबळगडाच्या सुळक्यावर ठेवले. तेव्हापासुन तो सुळका ’कलावतीचा महाल’ म्हणून ओळखला जाउ लागला.
ह्या सुळक्याचे आणि ठाकरवाडीतील ठाकरांचे जिव्हाळ्याचे नाते असून दरवर्षी शिमग्याच्या सणाला सर्व ठाकर एकत्र येउन या सुळक्यावर ठाकरनृत्य करतात !
याच गडावर उमाजी नाईक या स्वातंत्र्यवीराने १८६२ मध्ये इथे वास्तव्य केल्याचा उल्लेख नेटवर मिळतो..
इथे जाताना पनवेल गाठावे लागते.. तिथुनच ठाकुरवाडीला जाणारी एसटी पकडावी लागते.. ठाकुरवाडी हे कलावंतीणदुर्गच्या पायथ्याशी विसावलेले गाव.. पनवेलहुन सकाळची शेवटची एसटी ७.०० वाजता आहे नि मग थेट दोन तासांनी ९.४० ची आहे.. त्यामुळे ७ ची एसटी पकडण्याचे ठरले..
पण पहाटे उठण्यास उशीर झाला नि मग रेल्वेमार्गे दादर ते कुर्ला नि कुर्ला ते पनवेल करता करता सकाळचे ८ वाजले ! चांगलाच उशीर झाला होता.. मी आणि माझा मित्र आता दोन तास काय म्हणुन एसटी स्टँडबाहेर असणारे रीक्षावाले आणि ५-१० मिनिटावर असणार्या सहा सिटर रिक्षाच्या स्टँडवर जाउन रिक्षाभाडेचा अंदाज घेतला.. सगळे जण शेडुंग फाट्यापर्यंत रु.१२० नि ठाकुरवाडीपर्यंत २०० रु. सांगत होते.. शेडुंग फाट्याहुन ठाकुरवाडी बरीच आतल्या बाजुस आहे हे आम्हाला माहित नव्हते पण रीक्षाभाडे बघुन अंदाज आला बरेच दुर असेल.. तसे आम्ही दोघेही केवळ नेटवरची माहिती घेउन जात होतो.. त्यामुळे खातरजमा करुनच पुढचा निर्णय घेत होतो.. एसटीने जाण्यासाठी तिकीट फक्त दहा रुपये हे ठाउक असल्याने आम्ही मागे फिरलो.. (दोघांऐवजी १० जण असतो तर सहा सिटर सोयिस्कर ठरली असती) वेळ जात नव्हता म्हणुन रस्त्यावरुन ये जा करणार्या ट्रक्-टेम्पोकडे लिफ्ट मागत होतो.. पण हाती निराशाच आली.. शेवटी पनवेल एसटी स्टँडसमोरच असणार्या "रायगड स्विटस" मध्ये आम्ही नाश्ता घेतला.. नि तिकडुनच जेवणासाठी समोसे घेउन एसटी स्टँड गाठले !
ठाकुरवाडीच्या अगोदर येणारे "झोया हेल्थ रिसॉर्ट" आम्हाला गाठायचे होते.. त्या रिसॉर्टच्या समोरुनच गडावर जाण्यास वाट आहे.. आमचा अंदाज होता ठाकुरवाडी म्हणजे त्याच गावातील एसटी स्टँड असेल.. खरे सांगायचे तर तसे काहि नाहिये..
एन पावसाच्या दिवसात उन्हाचे चटके खात बसची वाट बघत स्टँडवर थांबलो होतो.. गरमीने तर आमचा उत्साह पण कमी केला होता. शेवटी ९.४० ची एसटी १० च्या सुमारास आली नि आम्ही रवाना झालो.. गावचा आतापत्ता नसल्याने मी कंडक्टरच्या बाजुचीच सिट पकडली.. नि झोया रिसॉर्ट स्टॉप आला की सांगा म्हटले.. काहि मिनीटाच्या अवधीतच ड्रायवरच्या खिडकीतुन समोर दुरवर V च्या आकारातली डोंगररांग दिसली.. हा V म्हणजे कलांवतीण नि प्रबळगडामधील अंतर ! हाच V ठाकुरवाडीपर्यंतच्या प्रवासात आपल्याला साथ देतो.. फक्त तो जवळ येउ लागतो इतकेच.. आमची उत्कंठा वाढत होती.. पण खिडकीतुन झोया कुठे दिसतेय का ते पाहत होतो.. शेडुंग फाट्याहुन बस चक्क डावीकडील अरुंद डांबरी रस्त्यावरुन जाउ लागते.. ह्या वाटेच्या दोन्ही बाजुन भातशेतीचा पसारा असल्याने मस्तच वाटत होते..
काही अवधीतच झोया रिसॉर्ट लागले नि बस थोडीशी पुढे जाउन शेवटच्या थांब्यावर जाउन थांबली.. त्याच थांब्याच्या एका बाजुस छोटीशी वस्ती दिसली.. हिच ती ठाकुरवाडी !! त्याच वाडीच्या मागे शक्तिशाली वाटणारा डोंगर म्हणजेच प्रबळगड उभा ! नि त्याच्या डाव्या बाजुस असणारा सुळका म्हणजे कलावंतिण दुर्ग ! नि हो इथे स्टँड वगैरे काही प्रकार नाहिए.. गाडी तिथेच मोकळ्या जागेत वळण घेउन पनवेलसाठी माघारी फिरते.. एकंदर प्रवासात साधारण अर्धा तास जातो !
आम्ही झोया रिसॉर्टच्या गेटवर येउन तिथेच असलेल्या चौकीदाराला रस्ता विचारला.. त्या रिसॉर्टच्या गेटच्या समोरच काहि अंतरावर एक भलीमोठी वाट आहे.. त्याच वाटेने पुढे गेले असता "खाजगी भूभागबद्दलचा प्रवेश बंद" चा मोठा फलक दिसतो.. त्या फलकाखालुनच जाणार्या रस्त्याने पुढे गेले असता छोटेखानी नाल्याचा पुल लागतो.. आम्ही तिथुनच पुढे गेलो (वाटेवरील ह्या सार्या खुणांची माहिती नेटवरुन घेतली होती)..
ही वाट डांबर घालुन केली असल्याने आम्हाला जरा आश्चर्यच वाटले ! हा रस्ता निर्मनुष्यच आहे ! त्यामुळे आम्ही दोघे अगदी धमाल करत जात होतो..
( "V" Shape - डावीकडचा कलावंतीण नि उजवीकडचा प्रबळगड )
चढण उतारणीचा डांबरी रस्ता नि दोन्ही बाजुस हिरवे रान ! नि समोर उभे असलेली डोंगररांग.. रस्ता त्याच दिशेने जात असल्याने आम्ही निश्चिंत होतो.. फक्त वाढत्या उष्म्याने आम्ही त्रस्त झालो होतो.. पंधरा वीस मिनिटे चालल्यानंतर तो रस्ता डावीकडे वळतो.. नि आमच्या मनात शंका आली.. कारण कलावंतिणचा सुळका तर समोर दिसत होता.. पण अंदाज घ्यावा म्हणुन आम्हीसुद्धा डावीकडे वळलो.. पण तो रस्ता चुकीच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले नि लागलीच दुरवर दिसणार्या घराकडे (आधी दोन तीन पडझड झालेले बंगले लागतात) जाउन चौकशी केली..
तेव्हा कळले तो रस्ता डावीकडे वळताच पुढे रस्त्याला लागुन डावीकडे वडाचे झाड आहे.. त्याच झाडाच्या अगदी समोरुन छोटीशी पाउलवाट(ही आम्हाला दिसलीच नाही) रानातुन जाते.. ह्या वाटेचे वर्णन करायचे तर ही वाट संपुर्णतः लाल मातीची आहे.. अतिशय सोप्पी, साधी नि बरीचशी सरळ आहे.. पण नेहमीप्रमाणे असणार्या आजुबाजुंच्या झाडांचे छप्परसुद्धा ह्या वाटेला मिळत नाही.. त्यामुळे तळपत्या सुर्याने आमची चांगलीच पंचाईत केली. वातावरणही दमछाक करणारे होते नि त्यातच आमची वेळ चुकली होती.. अकरा साडेअकराला आम्ही पायपीट सुरु केली होती..
भर उन्हात आम्ही दोघे वळणे घेत वरती जात असणार्या वाटेने आम्ही पुढे सरकत होतो.. काही अंतर चालुन गेल्यावर लक्षात आले की कलावंतीण गाठायचे तर एक डोंगर पार करावा लागेल.. ! सरळसोट जाणार्या या वाटेचा मला तर कंटाळा आला होता.. म्हटले कधी एकदाचे पोहोचतोय.. माझा मित्र तर उष्म्याने हैराण झाला होता.. बरेचसे अंतर चालुन गेल्यावर एका वळणावरती माझे त्याच वाटेला फुटलेली दुसरी वाट दिसली... जेमतेम वितभर असणारी ही वाट सरळ चढणीची होती नि वर जात होती.. रानामुळे वरती कुठे जातेय ते कळत नव्हते.. पण हाच शॉर्टकट असावा असे मी गृहीत धरले नि पुढे गेलो.. पण माझा मित्र खालीच थांबला कारण उगीच पुढे वाट नसायची तर पायांची फुकटची वाट ! तसापण तो फारच दमला होता.. मी काहि अंतरावर जाउन त्याला दुजोरा दिला नि वरती येण्यास सांगितले.. पण सरळ चढणीचा शॉर्टकट त्याला भलताच भारी पडला ! एकेक मिनीटाने थांबत, धापा टाकत वर येत होता.. माझ्या नावाने लाखोली वाहिली हे सांगायला नकोच ! पण त्याची अवस्था बघुन पुढे जाणे जिकरीचे वाटत होते ! अर्ध्यावरती पण आम्ही पोहोचलो नव्हतो नि सुळक्याचा पायथा तर नजरेसच पडत नव्हता ! अशा धीम्यागतीने वर जाउन पुन्हा एवढे अंतर सांज होईस्तोवर कापायचे अशक्यच वाटु लागले ! पण मित्राने माघारी फिरण्यास असर्मथता दर्शवली नि काहि केले तरी जायचेच असा निर्धार केला !
काहि अवधीतच(लाँगकट च्या वेळेत !!!) आम्ही चढ पार केला नि डोंगर गाठला.. तिथेच पसरलेल्या हिरवळीवर आम्ही उताणे पडलो.. इथेच काहि ठिकाणी पडझड झालेले बांधकाम दिसते.. वरच्या बाजुस चार पाच पायर्या दिसतात.. त्या पायर्यांना लागुनच असलेल्या दगडावर शेंदुरने रंगवुन साकारलेले गणपती नि हनुमान नजरेस पडतात.. आम्ही जिथे झोपलो होतो तिथे जवळच एका उंचवट्यावर एकावर एक अशी मोठ्या खडकांची रचना आहे.. फोटोशुटसाठी परफेक्ट स्पॉट !! तिथेच मोबाइलमधुन टिपलेल्या मुद्रा..
---
आमचे फोटोसेशन चालु असतानाच एक इसम त्या शॉर्टकट मार्गे वरती आला.. तो देखील ट्रेक करणाराच होता.. पण एकटा आला होता !!!! हैदराबादला राहणारा.. मुंबईत कंपनीच्या कामानिमित्त आला होता.. पण नवल हेच की त्याचे वय जेमतेम ४३ वर्षे होते !!! लै भारी ! त्याची अवस्थादेखील वेगळी नव्हती ! तोपण इथुनच माघारी फिरण्याच्या विचारात होता.. आमची ओळख पाळख झाली.. म्हटले पुढे जायचेच नि तिघे पुढे जाण्यास निघालो !
त्या पायर्यांच्या दिशेने जाणार्या वाटेने पुढे गेलो नि काहि अंतरावर कपडे एका ओढ्यापाशी कपडे सुकत घातलेले दिसले.. तेव्हाच नजिकला वस्ती असल्याचा अंदाज आला.. पण पुढे जायचे कशे कळत नव्हते.. दोन तीन पुसटश्या वाटा दिसत होत्या. नि सगळ्या ट्राय करायच्या म्हणजे तेवढी ताकद उरली नव्हती ! शेवटी तिथुनच अनवाणी जाणार्या एका लहान मुलाला पुढील रस्ता विचारला.. संवाद साधला पण तो काही बोलत नव्हता.. वाटले शिकला नसेल म्हणुन खाणाखुणा करुन विचारले नि त्याने आम्हाला डोंगराच्या कडेने जाणारी ठळक पाउलवाट दाखवली..
पुन्हा काही गोंधळ नको म्हणुन त्यालाच आम्ही पुढे घेउन जाण्यासाठी सांगितले ! ती वाट लगेच एका वस्तीत घुसली ! जेमतेम दहा बारा कौलारु घरे असणारे हे गाव ! हीच ती माची.. प्रबळ माची ! इथुनच पुर्ण सुळका आमच्या नजरेस पडला ! इकडे काहि लोक जेमतेम सुशिक्षीत तर काही आदिवासी ढंगातली दिसली ! आमचे घशे एव्हाना कोरडे होते त्यामुळे एका घरात पाणी मागितले नि त्यांनीदेखील निसंकोचपणे पाण्याने भरलेली कळशी आणुन ठेवली ! विहीरीच्या त्या पाण्याची चव काही औरच होती.. विलक्षण गारवा होता त्यात ! तिथेच चौकशी केली असता कळले की या गावाला 'माची' म्हणतात.. एक शाळादेखील आहे तिथे.. नेहमीच्या जीवनपयोगी वस्तुंसाठी त्यांना हा अख्खा डोंगर पायपीट करुन खाली ठाकुरवाडीत जावे लागते !!! तेव्हाच त्या ठळक पाउलवाटेचे गुढ उमजले ! अशीच माहिती मिळवताना आम्हि त्या मुलाबद्दल पण विचारले तेव्हा कळले तो मुका-बहिरा होता खंडु त्याचे नाव.. त्याचे घर दुसरीकडे होते.. पण त्याला आम्ही सुळक्याच्या अगदी पायथ्यापर्यंत नेण्याची विनंती केली !
हया सुळक्यापर्यंत जाणारी वाट या गावामागच्या असणार्या झुडुपाजंगलामुळे दिसत नव्हती...
(माचीवरुन घेतलेला फोटो)
त्या खंडुच्या मागुनच आम्ही जात होतो.. अंतर तसे फारसे नव्हते.. १५-२० मिनीटाचे असेल.. पण वाट खडकाळ नि घसरणीची होती.. एका ठिकाणी माझाच दम गेला.. कितीही पाय रोवला तरी सुक्या दगडमातीवरुन घसरत होतो.. दोनेक मिनीटाच्या चढणीसाठी मी जवळपास दहा मिनीटे घेतली !!
काही क्षणातच आम्ही झाडीझुडुपे पार करुन सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो नि हुश्श केले !
तिथेच खंडुने आमचा निरोप घेतला (त्याने काहिही मागितले नाही पण आम्हीच त्याला आमच्या पेटपुजेत सहभागी केले.. तीस रुपये पण त्याच्या हातात ठेवले.. आमच्या ह्या मैत्रीपुर्ण वागणुकीमुळे खुललेला त्याचा चेहरा आम्हाला बरेचसे समाधान देउन गेला..)
आता पुढची वाटचाल आम्हीच करणार होतो.. नि ज्याच्यासाठी खास आलो होतो त्या पायर्या नजरेस पडल्या..
(हा फोटु प्रबळगडावरुन घेतला आहे. सौजन्यः नेट)
त्या सुळक्याच्या दगडातच ह्या पायर्या कोरल्या आहेत ज्या गोलाकार वळणे घेत वरपर्यंत घेउन जातात..
एका पायरीची उंची जवळपास दिडफुट असावी ! ह्या खालील फोटोवरुन अंदाज येइलच..
पाच सहा पायर्या चढुन गेल्यावर तर एक मोठी पायरी लागते ! ती पार करायची म्हणजे कट्ट्यावरती चढुन बसण्यासारखे !!! काही पायर्यांवर पावसामुळे शेवाळे तयार झाले होते.. पाउस नव्हता हे तसे आमच्या फायद्याचेच ठरले.. फोटोत दिसले तेवढे अवघड वाटत नव्हते पण वळणावरती थोडी खबरदारी घ्यावी लागत होती..
__________________
____
दहा पंधरा मिनीटातच पायर्या संपल्या नि ओल्या मातीची छोटीशी घसरट वाट लागली.. त्या वाटेने चढुन जाताच आमच्या तोंडातुन आनंदाचे चित्कार बाहेर पडले ! कारण आम्ही सुळक्याच्या शेंड्यावरती आलो होतो.. समोरच प्रबळगड हाकेच्या अंतरावर दिमाखाने उभा होता.. त्यामुळे आम्ही लागलीच आमचा इको साउंड चेक केला ! एकदम जबरदस्त इफेक्ट मिळतो इकडे !
ह्या शेंड्यावरती आलो असलो तरी "ऑन दी टॉप" अजुन बाकी होते.. म्हणजेच त्या शेंड्यावरची एकुलती एक असणारी वाट भल्या मोठ्या दहा पंधरा फुटी खडकापाशी जात होती..
तो रॉक पॅच सर केला की मगच आमचा ट्रेक संपुर्णम होणार होता ! तसे दिसायला अवघड वाटतो पण नीट पाहिले असता पकडीसाठी खाचे भरपुर आहेत ! मी लगेच हे आव्हान स्विकारले नि चढुन गेलो..
मागोमाग माझा मित्रदेखील वरती आला !
(रॉक पॅच वरुन शेंड्यावरचा घेतलेला फोटो.. बाजुचा प्रबळगड)
यावेळी मात्र आमचा आनंद द्विगुणीत झाला.. पण आमचा नविन हैदराबादी मित्र मात्र साशंक होता ! त्याच्या वयाला नि शरीराला झेपेल की नाही या संभ्रमात होता.. पण मला विश्वास होता की तो चढेल म्हणुन.. नि आम्ही त्याला वरती चढुन येण्यास प्रोत्साहन दिले.. शेवटी आमच्या सुचनेप्रमाणे तो वरती आलाच !!
पहिल्यांदाच त्याने rock climbing केली होती त्यामूळे तर तो एकदम खुष झाला.. आमचे आभार मानु लागला..
इथुनच सभोवतालचे नयनरम्य दॄश्य न्याहाळण्यात आम्ही मग्न झालो..
आम्ही इथवर केलेली वाटचाल ह्या टोकावरुन दिसत होती.. त्या कलांवतीवरच्या प्रेमाची कहाणी खरी की खोटी माहित नाही पण ह्या सुळक्याच्या टोकापर्यंत कोरलेल्या पायर्या बघुन तरी त्या राजपुताचे प्रेम खरे असावे असे वाटत होते !!!
आमच्याकडे आता फारच कमी वेळ उरला होता.. कारण ठाकुरवाडीवरुन सहाची शेवटची एसटी होती.. ती जर गेली तर बाकी वाहनाची सोय होणे फारच कठीण.. म्हणुन पटापट उतरण्यास सुरवात केली.. उतरताना मात्र जास्त खबरदारी घेणे योग्य.. त्यातच पावसाच्या ढगांनी अचानक आक्रमण करण्यास सुरवात केली.. आम्ही सगळ्या पायर्या खाली उतरलो तोपर्यंत सुळक्याचा वरचा भाग ढगात दिसेनासा झाला ! ते बघताच आम्ही सुटकेचा निश्वास टाकला ! अन्यथा उतरण्यास खुपच कठीण झाले असते नि वेळही बराच गेला असता !
आता आम्ही वाटेवरुन जवळपास धावतच होतो ! बस सुटण्याची भिती होती ! माचीवर पोहोचलो नि गडगटासह पावसाने आगमन केले.. आम्हीदेखील तसेच भिजत खाली उतरत जाण्याचे ठरवुन पावसाचे स्वागत केले ! उतरताना माचीवर रहाणारे ठाकरवाडीहुन राशन घेउन येताना वाटेत दिसत होते !! भर पावसात आम्ही वेगाने खाली उतरत होतो पण साधी सरळ पाउलवाट काहि संपत नव्हती .. हैदराबादी मित्रदेखील दम धरुन आमच्याच बरोबरीने येत होता.. (मान गये उस्ताद !) शेवटी आम्ही डांबरी रस्त्यावर पोहोचलो.. एव्हाना सहा वाजुन गेले होते पण आम्हाला आशा होती बसला नक्कीच उशीर झाला असेल..
नशिबाने ते खरे ठरले नि दुरवर बस येताना दिसली.. नाहि म्हटले तरी पंधरा वीस मिनीटांचे अंतर होते पण मोकळ्या प्रदेशामुळे बस दिसली.. ती बघताच हैदराबादी मित्राला "तु ये मागाहुन, आम्ही बस थांबवतो" म्हणत मी नि माझ्या मित्राने अक्षरक्षः धुम ठोकली ! त्यानेदेखील मागाहुन पोहोचण्यास फारच कमी अवधी घेतला.. शेवटी अनेक आठवणींना स्मरणात ठेवुन आम्ही ठाकुरवाडी सोडले ! बसच्या खिडकीतुन आता मात्र तो "V" ढगांच्या कल्लोळात दिसत नव्हता !! पण मनात नक्कीच घर करुन बसला होता !
जोरात ट्रेक्स चाललेत रे
जोरात ट्रेक्स चाललेत रे योग्या! मस्त!
अरे वा! फोटो नी वर्णन
अरे वा! फोटो नी वर्णन धम्माल!!
जबरीच रे! बघून तरी जाम अवघड
जबरीच रे! बघून तरी जाम अवघड असेल अस वाटत्य.
अभिनंदन
जबरी... फोटो एकदम थरारक आहेत!
जबरी... फोटो एकदम थरारक आहेत!
फोटो अतीशय सुंदर आहेत. वर्णन
फोटो अतीशय सुंदर आहेत. वर्णन पण झकास!
उत्साही जीव आहात!
सह्ही!!!
सह्ही!!!
तुझे _/ _/ पुढे कर तुला _/\_
तुझे _/ _/ पुढे कर तुला _/\_ करायचा आहे. आपल्याला काय बाबा हे जमणार नाही (केवढ्या उंच त्या पायर्या !!), तेव्हा तुझे उत्कृष्ठ रितीने केलेले फोटोसहितचे वर्णन वाचूनच स्वतःच ट्रेकिंग केल्याचा आनंद घेते
फोटो एकदम सुरेख. तुम्ही लोक
फोटो एकदम सुरेख. तुम्ही लोक ट्रेकचे व्यसनी दिसता. वर्णन वाचतांना तुमच्यासोबत हा ट्रेक केल्यासारखे वाटत होते. :).
मी सहा वर्षांपूर्वी
मी सहा वर्षांपूर्वी प्रबळगडावर गेलो होतो ( जून्या मायबोलीवर प्रबळगडाचे पाणी , असा लेख असेल ) त्यावेळी हा सुळका अप्राप्य असेल असेच वाटले होते.
प्रबळगडाची वाट पण आम्हाला सापडली नव्हती. आम्ही एका धबधब्यातून वर चढलो होतो. वर सपाटी आहे पण पाणी नाही ( ते असते तर तिथे माथेरान वसले असते ) आम्हाला त्या ठाकरानीच खाली उतरवले. रात्र आम्ही त्यांच्या वस्तीवरच काढली होती.
आता पुण्याला जातायेता तो दिवस आठवतो.
फोटो आणी वर्णन दोन्हीही बेष्ट
फोटो आणी वर्णन दोन्हीही बेष्ट ! बसल्या बसल्या ट्रेक घडला आम्हाला !
पुट्रेशु !
योगी , मस्तच रे !!
योगी ,
मस्तच रे !!
वा वा वा वा, अफलातून केलात रे
वा वा वा वा, अफलातून केलात रे ट्रेक झकास ठिकाण!
वर्णन पण छान केलय, फोटोमुळे मजा आली, अगदी तिथेच आपणही गेलोय असे वाटू लागले!
मस्तच
भारी फोटो व वर्णन. यो रॉक्स.
भारी फोटो व वर्णन. यो रॉक्स.
मस्त रे यो....मस्त माहिती
मस्त रे यो....मस्त माहिती दिलीस धन्यवाद. फोटोही सुरेखच आहेत.
पुट्रेशु
वाह रे योगल्या. मस्तच. !!
वाह रे योगल्या.
मस्तच. !!
वर्णन आणि फोटु भारी आहेत.
एवढ्या मोठ्या पायर्या!!
एका फोटुत अस दिसतय की तुझ्या पायात चप्पल आहे.
खरच??? पुढच्या वेळेस भेटलो की त्या चप्पलच दर्शन घेइन म्हणतो.
अनोळखी ठिकाणी कोणत्याही साधनांविना रॉक क्लायंबींग जपुन करत जा एवढीच सुचना रे.
सही!!!! हा देखील एकदम
सही!!!! हा देखील एकदम adventurous trek झाला की. कसल्या पायर्या आहेत!! बाभो!!!
फोटो एक नंबर सगळे!
वा, मस्त ट्रेक.. आपणही काडी न
वा, मस्त ट्रेक.. आपणही काडी न हलवता ट्रेक केल्यासारखं वाटल.. फोटोंने मजा आली.
यो.दगुडजी... आपुले
यो.दगुडजी... आपुले प्रस्तारोहण पाहोनी आम्ही समाधान पावलो... ऐसे दिडहात लांब 'रॉक्स' चढून उतरणे कोणे येरेगबाळे काम नोहे... आपुली जिद्द आणिक चिकाटी ऐसीच वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा
विजयादशमी पावेतो एखाद दुर्ग शिल्लक राखणे... सिम्मोलंघन करणे आहे... :p
धन्यवाद मित्रहो ! वाचुन
धन्यवाद मित्रहो ! वाचुन तुम्हाला ट्रेक केल्यासारखे वाटले हेच माझ्यासाठी खूप आहे.. कारण शक्य तेवढी माहिती नि तितकाच आनंद देण्याचा माझा प्रयत्न होता..
अश्विनी.. तू एकदा ट्रायल मारच ! नक्कीच जमेल
अरे झकास.. त्यात काय एवढ, फ्लोटसच घातली होती.. तुला सांगतो बरेच नवखे ट्रेकर्स नविन बुट घालुन ट्रेकला जातात नि धडपडतात, घसरतात.. जे मी भीमाशंकर ट्रेकवेळी पाहिले होते (नविन करकरीत बुट घालुन ट्रेक करणे नेहमीच धोक्याचे.. आधी त्या बुटांची थोडीफार सवय हवी तुमच्या पायांना.. अंदाज येतो मग) काहीजण बुटाला मोठा "सोल" असेल तर त्यांना चांगला ग्रिप असतो असा गैरसमज करुन घेतात.. पण निसरड्या वाटेवर ते सपशेल फसतात. मी जी फ्लोटस घातलीय ती साधीच आहे पण सोलसाठी वापरलेले मटेरियल नशिबाने चांगले आहे.. जे मला भीमाशंकर नि हा ट्रेक केल्यावर कळले.. पण हे फक्त पावसातल्या ट्रेक्ससाठीच बर का.. बाकी सुचनेबद्दल आभारी
इंद्रा.. _/\_ जशी आपली आज्ञा..
आम्ही वाट बघतोय... तुम्ही फर्मान सोडा मग निघतोच..
यो मस्तच !!
यो मस्तच !!
लय भारी रे योग्ज
लय भारी रे योग्ज
योग्या, मी आपला जेव्हाकेव्हा
योग्या, मी आपला जेव्हाकेव्हा कुठे जातो, तेव्हा काळे चामडी पुढे लोखण्डी वाटी असलेले "इन्डस्ट्रियल शूजच" घालतो!
(फक्त तिनशे साडेतिनशे रुपयात मिळतात अन टिकतातही दोनतिन वर्षे हा मूळ फायदा
अन कधीकाळी भाण्डणात कुणाला (कराटेच्या) लाथेने हाणायची पाळी आलीच नशिबात, तर लोखण्डीवाटी बरी पडते. )
अप्रतिम फोटो . स्वतः जिथे
अप्रतिम फोटो . स्वतः जिथे जाणं कधी शक्य नाहि तिथे गेल्याचा अनुभव फोटोतून आणि तुझ्या वर्णनातूनं मिळाला. पायर्या बघून अंगावर काटा आला . एका नव्या स्थळाची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.
भन्नाट आहेत फोटो अन वर्णनही!
भन्नाट आहेत फोटो अन वर्णनही! तिथे प्रत्यक्ष जाण या जन्मीतरी शक्य नाही मला. बापरे काय त्या पाय-या आहेत ! भलतेच धाडशी आहात बुवा ! पण मस्तच! घरी बसल्या येवढा छान अनुभव दिलात मनापासून धन्यवाद ! हॅट्स ऑफ तू यू सर ! _^_
योगेश , अगदी जबरदस्त ,
योगेश , अगदी जबरदस्त , वाचताना अक्षरःश गुंग झालो होतो. अगदी मस्त सफर घडवलीस.
धन्स दोस्तलोक्स
धन्स दोस्तलोक्स
सध्या कोनि चालले आहे का ?
सध्या कोनि चालले आहे का ?
hello yo.rocks... tumhi chan
hello yo.rocks... tumhi chan lihilat.... photos pn apratim aahet..aamhi ha trek august madhye kela hota.. aamchyabrobrcha ek frnd jyala hya gadachi mahiti hoti tyane agodar aamhala kaslich kalpana dili navhati.. nahitr aamhi geloch nasto.. aamhi sagle first time trek karat hoto.... maza ek frnd tyachya maitrinila gheun aala hota tyane tr hight keli tila sangitl panvel stationla utarlo na tr 10 min. gadavr n mag tithe hav tas photo session karu.... lolz
... bt jevha aamhi paythyala utrlo tyaveli vastusthiti samor aa vasun ubhi hoti n aamhi hi.......tarihi aamcha bodyguard jyane ha trek organize kelela tyane aamhala dhir dila n kasatri padat dhadpadat aamhi ekdache var pohchlo..... what a adventure......really ajun hi vishay nighala na tar angavar kata yeto...aamche photos ithe deta nahi aale bt tumhi mazya facebook account vr pahu shakta.. Rudraksh Birje