Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:55
प्रवेशिका २ : यमकांचं गमक
ना सुचूनही लिहिलेल्या त्या कविता,
खोडूनही ना फाटेल असा तो कागद,
फिरफिरून तासली तरि नाही जी झिजली
ती पेन्सिलही नि:शब्द अशी पडलेली.
जेव्हा….
तारीख दिलेली उलटुन गेलि असेल
तेव्हा त्या कागदावर….
काव्यप्रसववेदनांचे वांझोटे बिंब पडेल
अन् त्यातूनच मग वाचू शकेल वाचक
मज कधी न जमलेल्या यमकांचे गमक
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली.
आवडली.
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!