कच्चे धागे.... ते पक्की कुलुपं.....!
आज, सिडनी च्या जवळ एक हेलेन्सबर्ग या गावात एक भारतीय मंदिर आहे, तिकडे गेलो होतो. येताना एक सुंदर अन शांत बीच वर थोडा वेळ थांबलो होतो. तिथुन समुद्राला समांतर असा रस्ता वेलोंगोंग शहराकडे जातो. तो शोर्ट कट आहे. जी पी एस गंडले म्हणुन तो रस्ता पकडला..... वाटेत एक पुल लागला. तिथे थांबलो. तर एक नवा च प्रकार पहायला मिळाला...
पुलाच्या संरक्षक कठड्याला ज्या जाळ्या बसवलेल्या असतात तिथे प्रत्येकी एका गजाला एक अशी खुप सारी कुलुपे लावली होती. हे काय नवीन म्हणुन जवळुन बघितले तर, प्रेम व्यक्त करण्याचा एक नवा प्रकार सापडला. त्या प्रत्येक कुलुपावर अशी जोडप्यांची नावे होती! काही निव्वळ आठवणी तर काही लग्नाच्या दिवसाची नोंद केलेली!
भारतात अनेक मंदिरात लोक आपल्या इच्छापुर्ती साठी धागे बांधतात, काही प्रेमी युगुले ठराविक ठिकाणी धागे बांधतात.... तसाच काहीसा हा प्रकार...... बदल म्हंजे.......इथे धाग्या ऐवजी कुलुपे!
आपले आपले प्रेम एकदम...... लॉक कर दिया!
पुल
कुलुपे
कुलुप १
कुलुप २
भन्नाट रे चंपक, प्रेम म्हणजे
भन्नाट रे चंपक,
प्रेम म्हणजे प्रेम असत, कुठेही केल तरी ते सेम असत!
प्रेम हे आयुष्यातील सर्वात सुंदर बाब. मग त्याचे रुपांतर लग्नात होवो अगर नाही. म्हणुनच त्याच्या आठवणी जपव्यात असे प्रत्येकालाच वाटते. त्या आठवणी जपण्याची ही एक अतिशय सुंदर पध्दत. कदाचित त्या जपण्याच्या पध्दती वेगवेगळ्या असतील पण भावना सेम असतात. म्हणुन-
प्रेम म्हणजे प्रेम असत, जगाच्या पाठीवर सगळीकडेच ते सेम असत!!
अरे तू आणि चंपीनी लावलं का
अरे तू आणि चंपीनी लावलं का नाही तिथे एखादं कुलुप मग?
अरेच्या.. मी परवाच नेपल्समधे
अरेच्या.. मी परवाच नेपल्समधे हा प्रकार पाहिला.
गाइडनी सांगितलं की कुठल्याशा कादंबरीत शेवटी तो प्रेमवीर असं करतो म्हणे, 'त्यांच्या प्रेमाला कुलुप लाउन किल्ली खाली फेकुन देतात'... म्हणुन हल्ली सगळेच लोक हे करतात...
मला ही माहिती मिळाली... http://www.loverslock.com/About-Locking-Your-Love.html
काहितरी फॅड... आपल्याकडे कसे आले नाही अजुन?!!
चंपीने माझ्या तोंडाला एक भले
चंपीने माझ्या तोंडाला एक भले मोट्ठे कुलुप लावलेय!
आपल्याकडे हे का बांधत असतील
आपल्याकडे हे का बांधत असतील म्हणे.

चम्पी आणि चपंक दोघाच्या नावचे
चम्पी आणि चपंक दोघाच्या नावचे कुलुप लाउन यायचे तेथे पुढेचालुन मुलांना सागता आले असते.
चंपीने माझ्या तोंडाला एक भले मोट्ठे कुलुप लावलेय!
त्या कुलुपचा फोटो येउद्या मग.................................!
(No subject)
तिकडे कुलुपांच्या दुकानांत
तिकडे कुलुपांच्या दुकानांत पुरेल इतका स्टॉक आहे का ?
आम्हीपण कुलुपं लावावे म्हणतोय!(प्रत्येकीसाठी एक हो :-P).