अज्जुकाची निनावी कथा वाचताना सुचलेली कविता इथे पोस्ट करतो आहे... म्हंटल तर संबध आहे म्हंटल तर नाही..
रोज नवे मुखवटे बदलताना आपण आपल्यालातर विसरुन जात नाही ना... असूही किंवा नसूही... पण अनोळखी जगात वावरताना...
अनोळखी जगात ओळखीच असं कुणीच नाही
मीही आपणहून माझी ओळख सांगत नाही
मी दडपण मुक्त होत नवी ओळख पांघरुन घेतो
माझ्यातल्या अनोळखीला धरुन
माझ्यातला मी सोडुन देतो
मी भरुन घेतो एक दिर्घ श्वास
आणि पवलावर पावलं आपटावीत म्हणून घेतो एक उडी
छे! नाही जमत...
माझ्यावरच मी हसतो
आणि माझ्यावर हसणार्यांवरही
हा आनंद कसला?
मी ह्यांना ओळखत नाही म्हणून?
की हे ज्याच्यावर हसता आहेत
ते त्याला ओळखत नाही म्हणुन?
हसू देत, मीही हसतो..
पण का?
माझी नविन ओळख झाली म्हणुन?
की मी माझी पुसली म्हणुन?
मग मनात विचार येतो
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो
पुन्हा कपाळ सुरकूतं
मन जरास कुरकूरत
माझं अनोळखी मन
माझ्यावरच गुरगूरतं
हे सारं जगच असं
येथे मुखवट्यांचीच जास्त जंत्री
हे अंतिम सत्य अंगिकारत
मी माझ्या सुरुकूत्यांवर मारतो ईस्त्री...
सुरुकूत्याही जाता जाता
पाठ माझी थोपटतात
मी पुन्हा एक उडी घेतो
आणि पावलांवर पावलं आपटतात...
मी आनंदाने मुठ आवळत
मुठ मागे खेचून घेतो
अन अनोळखी डोळ्यातले
कौतुकाचे भाव टिपुन घेतो
ह्या अनोळखी जगात
माझी खरी ओळख असते
जगाला पटो न पटो
माझीच मला ओळख पटते
मग सारं अनोळखी जग हिंडुन
मी ओळखीच्या दारावर थबकतो
माझा मुखवटा सावरतानाच...
दार उघडताच हबकतो
मी घोघर्या आवाजात विचारतो
'ओळखलं का मला?'
ते 'हो' म्हणताच
माझच हसु येत मला... माझच हसु येत मला..
-सत्यजित.
माझी मी पुसली म्हणून..
सत्यजित फार मार्मिक लिहिलयं.
हे सारं जगच असं
येथे मुखवट्यांचीच जास्त जंत्री
हे अंतिम सत्य अंगिकारत
मी माझ्या सुरुकूत्यांवर मारतो ईस्त्री...
सहीच!
सुंदर
सत्या,
बर्याच दिवसांनी तुझी कविता वाचायला मिळाली. छान आहे! ५ वर्षांपूर्वी "मीरा" लिहिणारा सत्या आणि ही कविता लिहिणारा सत्या दोन्ही मस्त आहेत मुखवटा असला तरी आणि नसला तरी!
लोकांसाठी
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो
मला वाट्लं मीच स्वतःपासून लांब जायला बघते.......अगदी माझी भावना वाटली. हे एखाद्या एब्स्ट्रएक्ट पेंटींगसारखं...सगळंच छान आहे...कोणता रंग छान म्हणू?.....
लोकांसाठी
लोकांसाठी का मी खोटं जगतो?
माझी ओळख जपायला
मीच माझ्या पासुनच लपुन बसतो
मला वाट्लं मीच स्वतःपासून लांब जायला बघते.......अगदी माझी भावना वाटली. हे एखाद्या एब्स्ट्रएक्ट पेंटींगसारखं...सगळंच छान आहे...कोणता रंग छान म्हणू?.....
आज तू
आज तू जेवढा मिळालस तेवढा सर्वच वाचून काढला. तब्येत एकदम खुष !! मजा आया .
Hats off Raje !
Hats off Raje !