Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारत आणि अमेरीकेत मिळणाऱ्या
भारत आणि अमेरीकेत मिळणाऱ्या उत्पादनांविषयी तुलनात्मक तक्रार आढळते. ती खटकते एवढंच >>>> काहीच्या काही हां मंजू. भारताबाहेर बहुतेक ठिकाणी मिळणार्या ग्रॉसरीबद्दल (लंडनचे ते वेंबर्ली की काय भाग सोडल्यास) मिळते आहे ते पदरी पाडा असाच सूर असतो. इथले लोकल प्रॉडक्ट्स (उदा: पास्ता सॉस, पीनट बटर इ) अर्थातच इथे चांगले मिळणार आणि त्याचे कंपॅरिझन केले तर खटकायला का हवे ?
(मी हे आधी वाचलच नव्हतं. आता मला तुझ्या "त्या" पोस्टीचा संदर्भ कळला.)
असो, पीनट बटर जेली सँडविच करायला जेली कुठल्या ब्रँडची/फ्लेवरची आणावी ?
खारे शंकरपाळे कसे बनवायचे हे
खारे शंकरपाळे कसे बनवायचे हे कोणितरी प्लीज सांगा ना
अमि, हा धागा बघा :
अमि, हा धागा बघा : http://www.maayboli.com/node/2597
सायोच्या पनीर माखनी
सायोच्या पनीर माखनी व्यतिरिक्त पनीरची कांदा लसूण न घालता एखादी रेसेपी माहित आहे का?
रात्रीसाठी बिना कांदा-लसूणाचा स्वैपाक करायचा आहे. भाच्चेसुनेची पहिली करवा चौथ आहे.
तिच्यासाठी माखनी दाल बनवतेय, त्यामूळे परत पनीर माखनी नको.
अल्पना, अमूलची पनीरपायनॅपल
अल्पना, अमूलची पनीरपायनॅपल चाट रेसिपी आहे त्यांच्या साईटवर : http://www.amul.com/recipes/paneer3.html
पनीर आणि अननस एकत्र खाणे
पनीर आणि अननस एकत्र खाणे योग्य आहे का (आयुर्वेदानुसार)?
अल्पना, संपर्कातून मेल
अल्पना, संपर्कातून मेल पाठवतेस का मला? तरला दलालच्या काही जैन पाकृ आहेत माझ्याकडे...
पनीरला थोडे क्रीम, कसूरी
पनीरला थोडे क्रीम, कसूरी मेथी, हळद, हिंग व मीठ लावून मूरवायचे. मग ग्रील करायचे. नॉन स्टीक तव्यावर पण परतता येईल. वरुन लिंबू रस व चाट मसाला घालून खायचे.
अल्पना, मला 6 च्या आत मेल
अल्पना, मला 6 च्या आत मेल केलीस तरच उपयोग गं...
आत्ता आठवल मला घरी जाऊन
आत्ता आठवल मला घरी जाऊन घरातले बेबी कॉर्न संपवायचे आहेत. पटकन बेबीकॉर्नचे काय करता येईल ते सांगा.
मंजू धन्यवाद. संपर्कातून मेल
मंजू धन्यवाद. संपर्कातून मेल केली आहे.
जागू, सुप बनवता येइल.
जागू, सुप बनवता येइल. स्टरफ्राय वेजीमध्ये वापरता येइल. पास्ता मध्ये वापरता येइल.
स्वाती सुप कस बनवायच ?
स्वाती सुप कस बनवायच ?
जागू, लोण्यावर जरा बेबीकॉर्न
जागू, लोण्यावर जरा बेबीकॉर्न परतून वरून मीठ, तिखट/ मिरपूड किंवा चाटमसाला भुरभुरून घातला तरी खायला छान लागतात. आणि मुख्य म्हणजे पटकन संपतात.
जागू, उभे कापून माश्याच्या
जागू, उभे कापून माश्याच्या तूकडीसारखेच तळता येतील. म्हणजे कसं वेगळं वाटणार नाही. काय ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/20093 हि लिंक जागु
दिनेशदा सिताफळाची रबडी कशी करतात? आणि काय करता येईल.
स्वाती, अरुंधती धन्यवाद.
स्वाती, अरुंधती धन्यवाद.
दिनेशदा मस्त आयडीया आहे.
दिनेशदा मस्त आयडीया आहे. संकष्टी असल्यासारखी वाटणार नाही.
हसरी रबडी शोधावी लागेल.
जागू... मी ते ''हसरी रबडी''
जागू... मी ते ''हसरी रबडी'' असे एकत्र वाचले.... काही कळेचना... हसरी रबडी ही नक्की कोणती पाकृ ते!
हसरी रबडी >> हसरी, तुझा आयडी
हसरी रबडी >> हसरी, तुझा आयडी मस्तय.
सिताफळ रबडी-- दुधाची नेहमी
सिताफळ रबडी-- दुधाची नेहमी प्रमाणे रबडी करुन घ्यायची..सिताफळाचा १/३ पल्प आणि थोडीशी थंड रबडी एकत्र करुन मिक्सर मधे फिरवुन. घ्यायची...उरलेला सिताफळा चा गर व ही फिरवलेली रबडी बाकी रबडीत अलगद मिक्स करायची..पिस्ता-बदाम काप घालुन फ्रिज मधे थंड करायची..यात वेलची,/इसेन्स्/जायफळ घालु नये..
अशीच अंगुर रबडी पण करता येते..
सिताफळ रबडी मी पुण्यात
सिताफळ रबडी मी पुण्यात कोथरुडला एका हॉटेलात खाल्लेली. मस्तच लागते.
खरे तर मी कुठलेही फळ्+दुध हे कॉम्बो अजिबात खात नाही (कारण आयुर्वेद), पण ही रबडी इतकी झकास होती की मी परत एक पॅक मागवला.
पनीर आणि अननस एकत्र खाणे योग्य आहे का (आयुर्वेदानुसार)?
माहित नाही. पण दुध आणि अननस एकत्र केले तर मात्र दुधाचे तिथेच पनीर होईल हे नक्की
आज सकाळीच सिताफळे खात होते
आज सकाळीच सिताफळे खात होते तेव्हा सिताफळ रबडीची आठवण झाली आणि मग सिताफळाचा गर अगदी सहजपणे वेगळा कसा करता येईल असा प्रश्न मनात आला. इथे कोणाला माहित आहे का सहजपणे, जास्त वेळ आणि गर वाया न घालवता गर आणि बिया कशा वेगळ्या करता येतील?
साधना, जेवणाच्या काट्याने
साधना, जेवणाच्या काट्याने सिताफळाचा गर वेगळा करता येतो. काहि मिक्सरच्या व्हीपर ब्लेडने ते काम होते.
रबडीत, किसलेले सफरचंद किंवा संत्र्याचा गर पण घालतात. दोन्ही फळे गोड असावीत.
रबडी किंवा मिल्कशेकसाठी
रबडी किंवा मिल्कशेकसाठी सिताफळं पूर्ण पिकलेली घ्यावीत. सिताफळाचा गर मिक्सरमध्ये घालून इंचरवर (म्हणजे सर्वसाधारणपणे डावीकडे) मोजून चार सेकंद तीनदा फिरवायचं. आणि मग गाळण्यावर टाकून ढवळायचं. गर खाली आणि बिया गाळण्यावर... गाळण्याखाली पातेलं ठेवायला विसरू नकोस
आपल्या ह्या पोस्टी युक्ती सुचवा/ सांगा मध्ये हव्यात.
मंजे आज करुन बघते. बियासुद्धा
मंजे आज करुन बघते. बियासुद्धा रगडल्या गेल्या नाही म्हणजे मिळवले
मंजू मी पण करुन बघते आजच.
मंजू मी पण करुन बघते आजच. आहेत घरात भरपूर सिताफळं आणि दुधपण. काल रात्रीच सिताफळ रबडीबद्दल इथलं पोस्ट वाचून करायचा विचार केला होता, पण गर काढण्याच्या कंटाळवाण्या कामामूळे विचार बाद केला.
मंजू कालच्या रेसेपीबद्दल परत एकदा धन्यवाद. मी काल मटर पनीर बुर्जी केली होती. त्या रेसेपीमधून मसाल्याच्या टीप्स घेतल्या. त्याशिवाय काल कांदा-लसूणासिवाय दाल माखनी, चना दाल तडका, माणी (लाल भोपळ्याची कढी, दही / ताक न घालता) वैगरे पण केलं होतं. आता सवडीने एक एक रेसेपी टाकेन.
अरुंधती साधना सकाळिच काय
अरुंधती
साधना सकाळिच काय सिताफळ खातेस ? मी मस्त वाकटी फ्राय खाउन आले.
काल मी रवा बेसन लाडू मावेत केले. आज बेसनचे आणि मुगाचे लाडू करणार.
@मंजू मिक्सर मधे ब्लेड कोणतं
@मंजू
मिक्सर मधे ब्लेड कोणतं वापराय्चं?
चटणीसाठी वापरतो ते नेहमीचं
चटणीसाठी वापरतो ते नेहमीचं ब्लेड चालतं.
Pages