तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ
जेव्हा सूर्य होता अधीर संध्येच्या चुंबनासाठी
अन चंद्र झुरत होता रजनीच्या मिठीसाठी
उनाड वार्याचीही तापली होती रंध्रे उगाच
अन समुद्र झेपावत होता किनार्याकडे बेभानसा.....
वणव्याच्या आगीत सापडलेल्या रोपट्यासारखी
जेव्हा सभ्यता अन शुचिता गेली होती करपून
सर्वांगाला माझ्या पडू लागले होते विळखे
तारुण्याच्या अतृप्त विषारी वासनांध सर्पांचे
तुझ्या डोळ्यातल्या निळाईत डोकावून
कविता करायची सवड होती कोणाला
जेव्हा अधीर झाली होती गात्रे अन
जाणवू लागले होते जडत्व क्षणोक्षणी
डोळ्यात डोळे अन श्वासात श्वास
मिथ्या ही सृष्टी नि नुसतेच भास
लाटांमागून लाटा काळ्या खडकांवर
उघडली कवाडे अन ताणले फास
उडवत ठिकर्या सार्या संकोचाच्या
बेफामपणे सुटले वारू धावत पटलांवर
अन खेचला गेलो मी अथांग अवकाशात
सोडत समाजाच्या सार्या गुरुत्वाकर्षणांना
काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची..
असं नाहीये, काकाक मध्ये
असं नाहीये, काकाक मध्ये प्रतिसाद मिळतात, कविता विभागात आपल्या चुका कळतात

यात चुका आहेत असे नाही, पण आपण दोघेही चुकीचे असु शकतो, काही चुका असतील तर त्या सुधारायला तेवढीच मदत होइल ना. खरेच टाक.
बरोबर बोललास विशाल...यात
बरोबर बोललास विशाल...यात चुकाच असणार हे गृहीत धरूनच मी कैच्याकै मध्ये टाकले होते. पण तु एवढा आग्रह करतोयस तर टाकतो...
सूचनेबद्दल धन्स रे
काळ्याशार डोहात सूर
काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेलो मी तुझ्यात जेव्हा
विश्वाच्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर
आणि शोधू लागली पावले नव्या सृजनाची..>>> मस्त रे..चँप! जबरदस्त मिलनाची वेळ!
Pages