आशुचँप, मित्रा ... तुझ्या " तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ" या नितांत सुंदर कवितेला माझा आचरट झब्बू क्षमस्व
तुझ्या आणि माझ्या जेवणाची ती वेळ
उदर होते अधीर फुकटच्या खादगीसाठी
हाताला सोडवत नव्हती वाटी बासुंदीची
अन भज्यांचीही तापली होती रंध्रे
साखरभात केशरी हिंदकळत होता जरासा.....
वर्षानुवर्षे भुकेल्या क्षुब्ध उपाश्यासारखी
जेव्हा सभ्यता, शुचिता गेली होती संपून
जबरी मम पोटाला पडत होते विळखे
पेटलेल्या जठराग्निच्या हावरट सर्पांचे
ताटातल्या वाटीतली मलई सोडून,
कविता करायला सवड होती कोणाला
अधीर झाली होती गात्रे आणि ...
वाढू लागले शरिराचे जडत्व क्षणाक्षणाला
श्रीखंड सोहळे अन पूरीचा घास,
मिथ्या ही सृष्टी नि भलतेच भास,
वाट्यामागून वाट्या सरल्या पोटात,
उघडले वदन अन घेतला मुखी ग्रास...
उडवत ठिकर्या सार्या लज्जा-संकोचाच्या
बेफाम मारला हात आडवा अन लाडवावर,
अन खेचला शर्ट शेजारी बसल्या भार्येने,
थांब , असुदे लाज, भुकेला घाल जरा आवर
काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेला सगळा आहार माझ्यात जेव्हा
पोटातल्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर...
माझ्याच डोळ्यांसमोर....
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !
नवकवि-इडंबनकार इरसाल म्हमईकर
काळ्याशार डोहात सूर
काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेला सगळा आहार माझ्यात जेव्हा
पोटातल्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर...
माझ्याच डोळ्यांसमोर....
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !
...मस्त
...मस्त
विशाल्या "हावरटासारखा" खातोय
विशाल्या "हावरटासारखा" खातोय आणि वहिनी त्याचा शर्ट खेचतायत....... डोळ्यासमोर आले.....
तू कौतुकचा "मित्र" शोभतोस........ :तृप्ततेचा ढेकर देणारा बाहुला:
तुफान विडंबन.. हसून हसून पोट
तुफान विडंबन.. हसून हसून पोट भरलं...जेवणाची वेळ टळून गेली...
(No subject)
जबरदस्त केवळ
जबरदस्त केवळ जबरदस्त.....
:हहपुवा:
अशक्य आहेस तु बाबा...
(No subject)
विशालभाऊ मुजरा!!!!! अशक्य
विशालभाऊ मुजरा!!!!!
अशक्य हसलेय
(No subject)
बिच्चार्या वैनी..
बिच्चार्या वैनी..
(No subject)
अशक्य आहेस रे बाबा तु
अशक्य आहेस रे बाबा तु
विडंबनबादशहा श्री विशालकु महाराजांचा विजय असो!!!!!!
(No subject)
कस्चं कस्चं (खोटं खोटं
कस्चं कस्चं (खोटं खोटं लाजणारी चालु बाहुली )
(No subject)
(No subject)
विश्ल्या, निदान ढेकर तरी
विश्ल्या, निदान ढेकर तरी द्यायचास भरल्या पोटी...
सही रे विशाल !
सही रे विशाल !
विशाल हास्य!!
विशाल हास्य!!
मज्जा मज्जा आहे नाही ?
मज्जा मज्जा आहे नाही ?
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
(No subject)
जबरी
जबरी
आणि शोधू लागले पत्रिका
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !
>>>
विशल्या, वार लावून जेवतोस की क्कॉय
विशल्या, वार लावून जेवतोस की
विशल्या, वार लावून जेवतोस की क्कॉय>>>>>
बामण आहे मी निंबे, विसरलीस काय? बादवे तुझ्याकडे होइल काय सोय.... आणि हो बरोबर दक्षीणा
(रोकडा) ही लागतो मला