तुझ्या आणि माझ्या भोजनाची ती वेळ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 October, 2010 - 01:11

आशुचँप, मित्रा ... तुझ्या " तुझ्या आणि माझ्या मीलनाची ती वेळ" या नितांत सुंदर कवितेला माझा आचरट झब्बू Proud क्षमस्व Happy

तुझ्या आणि माझ्या जेवणाची ती वेळ
उदर होते अधीर फुकटच्या खादगीसाठी
हाताला सोडवत नव्हती वाटी बासुंदीची
अन भज्यांचीही तापली होती रंध्रे
साखरभात केशरी हिंदकळत होता जरासा.....

वर्षानुवर्षे भुकेल्या क्षुब्ध उपाश्यासारखी
जेव्हा सभ्यता, शुचिता गेली होती संपून
जबरी मम पोटाला पडत होते विळखे
पेटलेल्या जठराग्निच्या हावरट सर्पांचे

ताटातल्या वाटीतली मलई सोडून,
कविता करायला सवड होती कोणाला
अधीर झाली होती गात्रे आणि ...
वाढू लागले शरिराचे जडत्व क्षणाक्षणाला

श्रीखंड सोहळे अन पूरीचा घास,
मिथ्या ही सृष्टी नि भलतेच भास,
वाट्यामागून वाट्या सरल्या पोटात,
उघडले वदन अन घेतला मुखी ग्रास...

उडवत ठिकर्‍या सार्‍या लज्जा-संकोचाच्या
बेफाम मारला हात आडवा अन लाडवावर,
अन खेचला शर्ट शेजारी बसल्या भार्येने,
थांब , असुदे लाज, भुकेला घाल जरा आवर

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेला सगळा आहार माझ्यात जेव्हा
पोटातल्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर...
माझ्याच डोळ्यांसमोर....
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !

नवकवि-इडंबनकार इरसाल म्हमईकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Rofl

काळ्याशार डोहात सूर मारल्यासारखा
सामावून गेला सगळा आहार माझ्यात जेव्हा
पोटातल्या समस्त अणू-रेणूंनी धरला फेर...
माझ्याच डोळ्यांसमोर....
आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !
Biggrin

Rofl Biggrin

विशाल्या "हावरटासारखा" खातोय आणि वहिनी त्याचा शर्ट खेचतायत....... डोळ्यासमोर आले..... Proud

तू कौतुकचा "मित्र" शोभतोस........ :तृप्ततेचा ढेकर देणारा बाहुला:

जबरदस्त केवळ जबरदस्त.....
:हहपुवा:
अशक्य आहेस तु बाबा... Biggrin

आणि शोधू लागले पत्रिका उद्याच्या भोजन-आमंत्रणाची !
>>> Rofl

विशल्या, वार लावून जेवतोस की क्कॉय Proud

विशल्या, वार लावून जेवतोस की क्कॉय>>>>>

बामण आहे मी निंबे, विसरलीस काय? बादवे तुझ्याकडे होइल काय सोय.... आणि हो बरोबर दक्षीणा
(रोकडा) ही लागतो मला Proud