शंभर
शुकी ब्रुकच्या "The Joy of Teaching" या Caltech Project for Effective Teaching (CPET) अंतर्गत झालेल्या talk ला आज गेलो होतो. शिक्षकांचे काम कसे शिकवण्याचे (आणि न की मुल्यमापनाचे) असते याबद्दल थोडी चर्चा झाली, त्याचप्रमाणे context दिली तर content मिळवणे कसे सोपे जाते याबद्दलही थोडे बोलणे झाले (बरोबर अनेक अवांतर पुस्तके होतीच).
ईटलीतील Reggio Emilia या ठिकाणी Loris Malaguzzi या प्राथमीक शिक्षकाने The Reggio Approach to Early Childhood Education ची स्थापना करुन एक क्रांती घडवुन आणली. Loris Malaguzzi ची एक कविता तिथे ऐकायला मिळाली त्याचा हा किंचीत स्वैर अनुवाद.
मुलं शंभराची बनली असतात.
मुलांच्या शंभर भाषा असतात.
शंभर हात
शंभर विचार
शंभर प्रकार विचार करायचे
खेळायचे, बोलायचे.
शंभर, नेहमीच शंभर
प्रकार ऐकण्याचे
आश्चर्य करण्याचे
प्रेम करण्याचे
शंभर आनंद गाण्याचे
आणि समजण्याचे
शंभर विश्वे शोधायला
शंभर विश्वे बनवायला
शंभर विश्वे स्वप्ने पहायला.
मुलांच्या शंभर भाषा असतात
(आणि आणीक शंभर शंभर शंभर जास्त)
पण ते नव्याणव चोरतात
शाळा आणि समाज
डोकं शरीरापासुन वेगळे करतात.
ते मुलांना विचार करायला शिकवतात
हातांशिवाय
करायला डोक्याशिवाय
ऐकायला आणि न बोलायला
आनंदाशिवाय समजायला
स्नेह दाखवायला आणि उल्हासीत व्हायला
केवळ दिवाळी-दसर्याला.
ते मुलांना सांगतात
आधीच असलेली जगे शोधायला
आणि असलेल्या शंभर पैकी
चोरतात नव्याणऊ.
ते सांगतात मुलांना
काम आणि खेळ
सत्य आणि कल्पनाविलास
विज्ञान आणि कल्पना
आकाश आणि पृथ्वी
विवेक आणि स्वप्न
नाही जात
हातात हात घालुन.
आणि अशा तर्हेने मुलांना
सांगतात ते की शंभर नाहीतच.
मुल म्हणतं:
शक्यच नाही. आहेतच शंभर!
!
!
अरे वा !
अरे वा !
उत्तमच
उत्तमच
अप्रतिम कविता!
अप्रतिम कविता!
काल अजुन एक मुद्दा choice
काल अजुन एक मुद्दा choice बद्दलचा होता. जेंव्हा शुकी पहिल्यांदा इस्राईल मधुन अमेरिकेला आला तेंव्हा एकदा एक मुलगा त्यांच्याकडे आला असतांना याने त्याला विचारले की तुला आईसक्रीम हवे का. तर मुलाने उलट विचारले: "कुठल्या प्रकरचे?" इथे हा प्रकार लहानपणापासुन खुप जास्त आहे. नको त्या प्रकारात खोटा चॉईस. त्यासंदर्भात असलेल्या शीना अय्यंगारच्या टेड टॉकचा दुवा येथे देतो आहे, जरुर पहा/ऐका:
http://www.ted.com/talks/sheena_iyengar_on_the_art_of_choosing.html
कविता आवडली.
कविता आवडली.
कविता आणि लिंक दोन्ही मस्त.
कविता आणि लिंक दोन्ही मस्त.
छानय.
छानय.
छान कविता! लिंकही आवडली.
छान कविता! लिंकही आवडली.
वा! धन्यवाद, आशीष. नेहमी
वा!
धन्यवाद, आशीष. नेहमी काहीतरी बुद्धीला खाद्य देतोस.
धन्यवाद आश्चिग. कविता, शीना
धन्यवाद आश्चिग. कविता, शीना अयंगारचे भाषण पण आवडले.
खूप दिवसांपूर्वी मी सुगाता मित्राचे हे भाषण ऐकले होते आणि त्यांच्या Whole in the wall प्रयोगाबद्दल वाचले होते. शिक्षणाचा विषय चालू आहे म्हणून हा त्याचा दुवा
http://www.ted.com/talks/sugata_mitra_the_child_driven_education.html
अस्चीग.. खूप सुंदर आहे
अस्चीग.. खूप सुंदर आहे कविता.. सुगता मित्रा आणि शिना चे व्हिडियो पण मस्त..विचार करायला लावतात
मस्त
मस्त